Posts

हे वाचले ...

पद्मगंधा दिवाळी अंकात मारुती चितमपल्लींची सुरेख दीर्घ मुलाखत वाचली. त्यांनी सांगितलेल्या अरण्यकथा वाचुन कुतुहल वाढलॆ आहे. लवकरच त्यांचे आत्मचरीत्र वाचायला हवे. पद्मगंधा ही वाचनीय होता. रवीमुकुल यांना धन्यवाद द्यायला हवेत. इरावतींचे गंगाजळ परत वाचले. इरावती, दुर्गाबाई, गौरी, जी.ए, हे सर्व माझे नित्य पाठाचे लेखक आहेत. त्यांचे लेखनाच्या मधुन मधुन आवृत्या करायच्या. कारण काही काळानॆ त्यांच्या लेखनातलॆ काही पदर हरवतात माझ्याकडुन. आणि काही वेळा मी अजुन थॊडी शहाणी(!) झालॆ असल्याने नवीन पदर सापडतात. या वेळी प्रकर्षानॆ जाणवलॆ ते त्यांचॆ म्हातारपणावरचॆ विचार. त्यांच्या तार्कीक विचारांनी अंगावर एकदम काटा आला. मिलींद बॊकील यांची शाळा आणि झेन गार्डन. शाळा इतकी वास्तवाला धरुन होती की ते पुस्तक वाटेच ना मला. माझ्याच वर्गातल्या एखाद्या बावळट मुलाने ( शाळेत सगळीच मुलॆ अगदी चवळटबा असतात हे आद्य सत्य आहे!) ते लिहीलॆ असे वाटले मला! झेन गार्डन रेखीव आहे. डॉ. राम भोसले यांच्यावरचे, "दिव्यस्पर्शी". ह्या पुस्तकाचा एक उतारा मी एका दिवाळी अंकात वाचला होता, मग सगळे पुस्तक वाचले. अद्भुत आहे. एका व्यक्तीच...

योगायोग

पु. ल. नी आपल्या बहारदार शैलीत लिहिलेले कनिष्टभगिनीविवाहयोग आदि योग आठवत असतील ना तुम्हाला? याला कदाचित संगणक प्रभाषेत डिजाईन पॅटर्न्स म्हणता येतील. तसेच काही योग मला आढळू लागले आहेत. तर आता नमनघटतैलयोग संपवुन मूळ योगांकडे वळते. कसोटीपर्जन्ययोग - अर्थात सामना सुरु झाला की हमखास पाऊस पडणे. हे इतके हमखास आहे की सरकार खास दुष्काळी भागात सामनॆ भरवण्याचा विचार करत आहे. संस्कृतीरक्षकांनी आक्षेप न घेतल्यास, तो विचार तडीस जाईल ही कोणी सांगावे? ह्या योगाचे इतर अवतार येणेप्रमाणे: सिनेमाला जायचे म्हणुन ऑफिसमधुन लवकर निघायचे ठरवले की क्लायंटने कॉन्फरन्स कॉल करणे. समारंभाला जायला आपण छान जामानिमा करुन बाहेर पडल्यावर समॊरच्या वाहनाने आपल्या पोषाखावर खडीवर्क करणे, किंवा चप्पल तुटणे. आलं ना लक्षात? या योगाचा आपल्या महत्वाच्या कामांवर (उदा. दांडी मारण्यासाठी थाप मारणे) परिणाम होऊ नयॆ म्हणुन आपण काळजी घेतॊ, अभेद्य व्युहरचना करतो. पण हा योग एका नाजुक आघाताने आपल्याला चारी मुंड्या चीत करून टाकतॊ. सण‌अभ्यासपरीक्षान्याय - परीक्षा या नेहमी अशा ठेवायच्या की त्या सणाला लागून आल्या पाहिजेत. त्यातही भीषण विषय तर...

हरवलॆ ... गवसले..

ब-याच दिवसांनी एखादे विसरलेले गणे ऐकायला मिळाले की पुन:प्रत्ययाचा एक वेगळाच आनंद मिळतॊ नाही? एखादं गाणं सारखॆ सारखॆ ऐकुन अतिपरीचयात‍ अवज्ञा होते कधी कधी. पण थोड्या दिवसाने ते गाणे ऐकले तर परत लाडके बनते. माझी लेक लहान होती तेंव्हा मी तिची काही खेळणी अशीच वरच्या कपाटात ठेवुन द्यायचे. मग काही आठवड्याने तो "हॅलोप्रसाद" भेटला की काय खुष व्हायची ती! प्रणयाची गोडी ही विरहाने वाढते. साध्या साध्या प्रसंगात, प्रिय व्यक्तिची अनुपस्थिती टोचायला लागतॆ. मला वाटते की आपल्याकडे असणा-या गॊष्टी गृहीत धरतॊ आपण,त्यांची योग्य किंमत करत नाही. विरहाने परत जाणीव होते, काखेतल्या कळश्याची. फक्त तो विरह कायमचा न घडॊ एव्हढीच प्रार्थना.

फास्टर फेणेचे बाबा

म्हणजे आपले भा. रा. भागवत हो! काय सॉलीड लिहिलय ना भागवत काकांनी? फुरसुंगीचा चँपियन सायकल स्वार बन्या आणि त्याच्या धडपडी. मोठी धमाल यायची वाचायला. ते फक्त फा फे चे बाबा नव्हते पण ह्या कार्ट्याची प्रसिद्धी जास्त असल्याने ते त्याचे बाबा म्हणवले जाणार. दर बालवाडी दिवाळी अंकात, त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कथा असायची. इतर बाबतीत 'किशोर' पुढे लिंबुटिंबु वाटणारा बालवाडी या एका गोष्टीने बाजी मारुन जायचा. भागवतांचे बिपीन बुकलवार ( book lover?) आणि त्याची दोस्त मंडळी आहाहा - ती दिवाळीची सुट्टी ... एका हाताने फराळचे बकाणे मारत वाचलेल्य त्या गोष्टी ... कोणी १० निकारागुआ चे स्टॅम्प दिले तरी नसते एक्स्चेंज केले मी ते क्षण. भा रां नी दिलेला आणि एक मोठा आनंदाचा ठेवा म्हणजे त्यांनी अनुवादित केलेल्या ज्युलस् वर्न च्या विज्ञान कथा. चंद्रावर स्वारी आणि इतर तर आहेतच पण सगळ्यात बेस्ट, मुक्काम शेंडेनक्षत्र आणि सुर्यावर स्वारी. 'Off on a comet' चा अनुवाद दॊन भागात. साधारणतः भाषांतरात येणारा बोजडपणा, या पुस्तकात अजिबात नाही. जणु मराठीत जन्माला आलेले कथानक. वातावरणसकट शेंडेनक्षत्रावर बसुन स...

दिल चीज क्या है?

सुमेधाच्या उमरावजान ह्या नोन्दीमुळे मनात आलेले काही विचार, ह्या चित्रपटाने तीन स्त्रियांना पुन:प्रसिद्धी मिळवुन दिली. उमरावजान स्वत:(ती एक कल्पनिक स्त्री का असेना...), रेखा आणि आशा भोसले. या तिघींच्या कौशल्याची एक नवीन मिती dimensionचाहत्यांसमोर आली. उमरावजानची एक संवेदनाशील कवयित्री म्हणून एक नवीन ओळख झाली. ऱेखाच्या अभिनयसामर्थ्याची पेहचान झाली. आशाजींचा मधाळ आवाज आपल्या चाकोरीबाहेर पडुन खय्याम यांच्या संगीतातुन खानदानी अत्तरासारखा दरवळला. या तिघी नाजनीन अहेत, divaआहेत. आणि या तिघीही विरहिणी अहेत, अश्या जोडीदाराच्या शोधात जो जन्माची साथ देइल. ज़ो मध्येच डाव सोडुन उठुन नाही जाणार... तिघींना जणु एकच प्रश्न पडलाय, हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है अब तो हर वक्त यही बात सताती है हमें....

नम्र नोंदी

नम्र नोंदी ह्या टिपणस्थळी नमूद केलेली सर्व मते माझी वैयक्तिक मते असुन त्यांचा मी ज्या संस्थेत काम करते तिच्या मतांशी अथवा माझ्या परिवाराच्या मतांशी काही संबंध नाही इथे केलेले सर्व हिरव्यावरचे पांढरे, माझेच लेखन आहे. इतर लेखकांचे लेखन उद्ध्रुत केल्यास तसा अवश्य उल्लेख करीन ही टिपणवही 'मंजिरी' शुद्धलेखन पद्धती अनुसरते. :) आपणास ज्या शुद्धलेखनच्या चुका भासतात त्या खरेतर 'मंजिरी' पद्धतितील त्या शब्दांचे पाठभेद अहेत. (पो. ध. ह.) वडिलांनी प्रचलित शुद्धलेखन शिकवण्याचे थोर प्रयत्न केले पण माझ्या अल्पमतीला केवल 'म. शु प.' मानवते तसदिबद्दल क्षमस्व. (पो. ध. ह.) म्हणजे पोट धरुन हसते - जे LOLचे मराठी समांतर रूप होय. कोण्या शस्त्रीबुवांची पदवी नव्हे ह्या नोंदींचे कोणत्याही ख-या अथवा काल्पनिक पुणेरी पाटीशी साधर्म्य आधळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

उद्रेक

च्या मारी! कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़, मनातलं सगळं किल्मीष करुन टाकावं साफ़. तोडून टाकावी सगळी चांगुलपणाची कुंपणे सोडून द्यावे आपली चंगली इमेज जपणे... (आपल्यालाच फ़क्त तसं वाटत असतं नाहीतरी) हासडाव्या चार कचकचीत शिव्या! (येत नसतील तर निदान ओठांची भेदक हालचाल) आणि चिरडावी तमाम तत्वं पिचपिचीत! कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़. सतत बनणं सोडून द्यावं आपलेच बाप!

Well said!

Dr. Sreeram Lagu, a noted marathi theater personality, in his autobiographical book 'Lamaan' -लमाण - made an interesting observation about Indian loos. He says, - and I paraphrase as I do not have the book in front of me. 'No matter the affluence or lack thereof of the Indian living establishments, be it palaces, homes, lodges, hotels, the loos are always the dirtiest places of all. I think that the Indian logic behind that is the place is used to divest oneself of the bialogical waste, will be 'dirty' anyway so what is the need for it to be clean? जिथे जाऊन घाणच करायची आहे, ती जागा स्वच्छ असायची काय गरज आहे? Aptly said sir! Both the observations, about the loos and the indian psyche, are on the mark!

प्रश्न

उत्तर जर न साहवे विचारु नको प्रश्न जननिंदेचे भय जिला तिने भजु नये कृष्ण

Happy Birthday - V2

गेल्या वर्षभरात पुण्यात एक नवीन फ़्यॅड सुरू झाले आहे. गल्लीपासुन दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पुढा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ़लक लावायचे. साहेबांचा एक फोटो, आणि खाली शुभेच्छुकांचे ७ - ८ फ़ोटो. सगळे चौक - मोक्याच्या जागा ह्या फ़लकांनी व्यापल्या आहेत. माझ्या मते फ़लांसाठी 'बरे' दिसणारे फ़ोटो काढण्याचे स्पेशल 'पॅकेज' ओफ़र करत असणार स्टुडिओवाले! आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे सहसा या फ़लकांवर तारीख नसते लिहीलेली. त्यामुळे तो फ़लक महीनोमहीने 'ताजा' राहतो. ह्या फ़लकांची सवय होते आहे तो वर त्यान्चे वर्जन २ बाजारात आले आहे. ह्या वर्जनमध्ये, शुभेच्छुकांच्या फ़ोटोला काट देण्यात आलि आहे, रिकाम्या झालेल्या जागी, एकतर साहेबांचा मोठा पोस देउन काढलेला फ़ोटो आणि एक 'गहिरी' कविता... 'वाट चालताना, पाठीवर हात फ़िरवणरे कोणीतरी हवे असते, प्रत्येक नावेला पुढे नेणारे शीड हवे असते, तुम्ही तो हात ते शीड आमच्यासाठी झालात दीर्घयू व्हा आणि नौका पुढे न्या " सूं सूं.... " हे v2फ़लक कोण sponcerकरत असेल असे तुम्हाला वाटते?

सुवर्णध्वजा

पुण्यात वसंताचे आगमन झाले आहे! तसे सुचीत करणारी सुवर्णध्वजा मी आजच पाहिली. आमच्या officeसमोरचा सोनमोहोर लख़लख़ीत फ़ुलला आहे. वसंत आला ह्याची ख़बर मला तोच देतो दरवर्षी. सोनमोहोर, पेल्टोफ़ोरम, लॅबरनम ही सगळी वसंत, ग्रीष्मात फ़ुलणारी पिवळ्या फ़ुलांची झाडे. पण प्रत्येकाला स्वताचे एक व्यक्तिमत्व आहे. वसंताची पहिली चाहुल सोनमोहोराला लागते. अजुन बकीचे दोन्ही गडी आपले राखाडी शुष्क हिवाळी रुप गुरफटुन बसलेले असतात. पलाश काय तो जागा झालाय. पण ते भाग्यवान वनवासी. इथे शहरात सोनमोहोर. सोनमोहोरची फुले लखलखीत पिवळ्या रंगाची. पेल्टोफ़ोरमची तपकिरी रेषांची. लॅबरनमची झुंबरासारखी लटकलेली. लॅबरनम नाजुक नार. तिला आपलाच बहर सोसवत नाही. दमुन जाते अगदी. आमच्या गोरेगावच्या शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा तांबड्या मातीचा अवेन्यू होता. त्याच्या दोन्ही बाजुना पेल्टोफ़ोरमच्या रांगा होत्या. उन्हाळ्यात त्या फ़ुलांचा सडा पडायचा मातीवर. तपकिरी मातीवर पिवळ्या रंगांची रांगोळी आणि प्रत्येक झाडाचे आपले अर्धवर्तुळ. जिवंत निसर्गचित्र वाटत असे ते. तर ... सोनमोहोर फ़ुललाय, रुतुंचे चक्र पुढच्या आ-याला आले आहे. आता येणार मौसम - मोग-याचा, गुल...

कवडसे...

Image
Flickers Originally uploaded by Manura . जणू उन्हाचा फ़ुलोरा...भाजरेपणाचा स्पर्श नसणारा... खिडकीच्या फ़टीतून चोरपावलाने प्रवेश करून भोवताल उजळून टाकणारा... थन्डीने गारठलेल्या मनाला ऊब देणारा... कधी पाण्यावरुन उडी घेउन नाचणारा... ग़ुलजारच्या कवितेत चमकणारा... चुलबुला ये पानी अपनी राह बहना भूलकर लेटे लेटे आईना चमका रहा हैँ फ़ूलपर

तरुणाई एक निरीक्षण

पुण्याच्या फ़र्ग्युसन रोडवर तरुणाईचा सागर नेहमी उचंबळत असतो. रोस डे, फ़्रेंड डे वगैरेला तर ह्या सागराला उधाण येते. परवा परवा पर्यंत या तरुणाईचा बालेकिल्ला होता, वैशाली. SPDP, cold coffeeआणि गप्पा छाटण्याचे "एकमेव" ठिकाण, इतरत्र कोठेहि शाखा नसलेले. पण सध्या मात्र या तरुण गटात फ़ूट पडली आहे. "अभी तो मैं जवान हूं" असे म्हणणारे Not so young अश्क्या आणि मध्या अजून वैशलीत भेटतील, पण नची आणि शची मात्र Cafe coffee dayत पडीक असतात. नुसते टाईम पास करायला अलेले टपोरी CCDच्या बाहेर घुटमळत आहेत आणि आहेरे गट - ज्याला य़प्पी म्हणतात, (म्हणजे बापकमाई ऐवजी आपकमईवर माज करणारा), बरिस्तात ब्लॅक कोफ़ी घेत असतो... जाता जाता: जाणकार असे म्हणतात की बरिस्ताची hot coffeeआणि desertsतर CCDची cold coffeeचांगली असते. तुमचे मत जरूर नोंदवा

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

एवढ्यात वाचलेली काही पुस्तके: Before I say goodbye - Mary Higgins Clark A whodunit with a dash of supernatural added to it. Over all an avarage book. Competently written. But I was not too impressed by it. One thing I always notice about the books written by women is that they write more details about the house hold items and men write more about the surroundings. Women tend to add sentimental touches to the book, even to a whodunit. रजनीश द नौटी भगवान - कुलकर्णी. लेखक ओशो सन्यासी असुन, त्याने ह्या पुस्तकात ओशोंच्या प्राध्यापकीपासुन ते १९९० साली त्यांच्या अंतापर्यंतच्या कारकीर्दीचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ओशोंची कारकीर्द एखाद्या धुमकेतुसारखी आहे. नेत्रदीपक अणि notorious. ओशोंनी तत्वज्ञानावर, अध्यात्मावर आणि वेगवेगळ्या धर्मांच्या शिकवणीवर मोठे मार्मीक विवेचन केले आहे. त्यांची वाङ्गमयसंपदा भली मोठी आहे. परंतु या सर्वाचा त्यांच्या आचरणाशी अजिबात मेळ जुळत नाही. असे वाटते की जणु हे लिहिणारे रजनीश आणि सतत विवादाच्या, controvesiesच्या जाळ्यात अडकलेले भगवान या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. कदाच...

रामूस्त्रिया

म्हणती "हो जा रंगीला रे" रामूस्त्रिया ... नृत्यामिषे विचित्र अंगविक्षेप रामूस्त्रिया ... लाडे लाडे "आम्मी नाई जा गडे" रामूस्त्रिया ... कंपनीचा एकच छाप रामूस्त्रिया ... अभिनेत्री की कठपुतळ्या रामूस्त्रिया ...

"shouharat"

J.R.R. TOlkiens in his "Lord of the Rings" writes about Numenors, There are three classes to people, High men of the west, Numenoreans, Middle peoplw, Men of the twilight, such as Rohirrim and the wild, Men of Darkness. And then he talks that now the High Numenoreans who were enhanced in arts and gentleness have become more like the middle men, wa they also love war and valour as things good in themselves, both a sport and an end. " We see this happening thruout our history that the highest honour is given to war and valour as ean end in itself. But this should be held as merely means to keeping the peace. But if you look at the current situation the actors and entertainers - who are "pretending" most of the time - are on the pedstel. What does it say about us as people?

Robin Hood

The legend of Robin Hood is well loved. Everybody loves good triumphing over bad. Ayn Rand questioned is Robin Hood "Good"? How can you make a hero out of a thief? He was giving to the poor that is fine but he was a thief, it was not his money to give. The robbery can not be justified just because he was giving the money to the need. The end can not justify his means. But if the powers that be are unjust or not fair, you will have to use the means that are available to you. They say that history is always written by the victors. I would say that history that we know is the version by the servivors. And both may not be the same.

Tarane Bane to Fasane Banenge

I have grown up on the staple diet of hindi film songs. As the “incrimin” tonic was essential part of my growth, so were the film songs. It all started with listening to 11 AM program on “Vividh Bharati”. That program used to play the songs known only to less than 5 people including the music director and the singer! I heard  lots of old gems on that program and started liking them after repeated listening. In fact I preferred them to the cacophony of sounds that was passed on as music in the then hit movies. To confess though, I liked some of the new songs too, but now when I listen to them, I shudder to think that I used “gungunao” them for days at end. But I digress. This enjoyment of old songs was also boosted by the songs played on Chayageet and Chitrahaar. The same old rule applied here as well. A guy called “Va. Ra. Kant” was the producer for Chayageet. I used to wonder “Wa can’t he play popular songs?”  I started appreciating the songs, the subtlety o...

Sand of time

Days go by ... I have not looked at the sky Taking it for granted. Juhi on my windowsill trying to catch my eye I do not spare it a glance Taking it for granted My daughter mentions that she is taller by an inch and I keep reading her homework taking her for granted Seasons complete one more cycle and I just change the calendar taking my life for granted

MidLanding

MidLanding I am on the midlanding as far as the languages are concerned. I did my schooling in Marathi till 10th and then opted for science that mandated English as the medium. I read quite a lot in both the languages and I am comfortable in both. But when it comes to expressing my self, I feel inadequate in both the languages. When the Language in use is English, I catch myself translating the marathi phrases and sentence/ verb formations like I did not bring the number or this time there is too much of cold!!! And when I converse in Marathi, I translate from English! " Tu majha pay odhu nakos bare" (Do not pull my leg)!! or at other times I can not find the marathi word with the right shade of meaning. What is the marathi word for conviction? So you see I am privileged to understand the thoughts expressed in both the languages. to read my favorite PU la and then his favorite P. G. Wodehouse and then to appreciate and agree with Pu la on what he writes about P....