हे वाचले ...

पद्मगंधा दिवाळी अंकात मारुती चितमपल्लींची सुरेख दीर्घ मुलाखत वाचली. त्यांनी सांगितलेल्या अरण्यकथा वाचुन कुतुहल वाढलॆ आहे. लवकरच त्यांचे आत्मचरीत्र वाचायला हवे. पद्मगंधा ही वाचनीय होता. रवीमुकुल यांना धन्यवाद द्यायला हवेत.

इरावतींचे गंगाजळ परत वाचले. इरावती, दुर्गाबाई, गौरी, जी.ए, हे सर्व माझे नित्य पाठाचे लेखक आहेत. त्यांचे लेखनाच्या मधुन मधुन आवृत्या करायच्या. कारण काही काळानॆ त्यांच्या लेखनातलॆ काही पदर हरवतात माझ्याकडुन. आणि काही वेळा मी अजुन थॊडी शहाणी(!) झालॆ असल्याने नवीन पदर सापडतात. या वेळी प्रकर्षानॆ जाणवलॆ ते त्यांचॆ म्हातारपणावरचॆ विचार. त्यांच्या तार्कीक विचारांनी अंगावर एकदम काटा आला.

मिलींद बॊकील यांची शाळा आणि झेन गार्डन. शाळा इतकी वास्तवाला धरुन होती की ते पुस्तक वाटेच ना मला. माझ्याच वर्गातल्या एखाद्या बावळट मुलाने ( शाळेत सगळीच मुलॆ अगदी चवळटबा असतात हे आद्य सत्य आहे!) ते लिहीलॆ असे वाटले मला! झेन गार्डन रेखीव आहे.

डॉ. राम भोसले यांच्यावरचे, "दिव्यस्पर्शी". ह्या पुस्तकाचा एक उतारा मी एका दिवाळी अंकात वाचला होता, मग सगळे पुस्तक वाचले. अद्भुत आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात एवढ्या घडामॊडी / योगायॊग घडु शकतात? पण सत्य कल्पिताहुन सुरस असते कधी कधी! लेखन मात्र फार बाळबॊध वाटले. विषयवस्तु चमत्कृतीपूर्ण असल्याने एवढे जाणवत नाही.
Wheel Of Time च्या जगात, काही माणसे, 'T~avern' असतात, त्यांच्य़ा भॊवती नियती आपले धागे विशेषत्वाने विणते. डॉ. भोसले हे आपल्या जगातले T~avern आहेत.

Robert Jordan - Wheel of Time - first 4 parts. Jordan ने आपले विश्व मॊठ्या फुरसतीने घडवले आहे. तॊ J R R TOlkins चा वारसदार म्हणता येईल. पण JRR चे LOTR हे classic आहॆ. तर, WOT, जास्त सुरस. सुष्ट-दुष्ट-यांच्या gray shades WOT मध्ये अधिक विस्ताराने रंगवल्या आहेत. मराठीत नाही असे जग निर्माण केले कुणी. आत्तापर्यंत माझॆ ४ - १००० पानी खंड वाचुन झाले अजुन ६ आहेत. पण वाचन ही जिवनावश्यक गरज असल्याने मी ते वाचणारच हे सांगणे न लगे. पुस्तक हाती लागले, मग ते रेल्वॆ वेळापत्रक का असेना, वाचल्याशिवाय ठेवायचे नाही या ब्रीदाचे पाईक आहोत आम्ही!

Eric Sagal's Olliver's Story. महा गचाळ आहे! Eric चे Doctors आणि The Class वाचल्यावर त्याच्या कडुन असल्या Fluff ची अपेक्षा नव्ह्ती. LoveStory चा पुढचा भाग, Daniella Steelच्या पुस्तकांपेक्षा भिकार झालाय.

इंदिरा संतांचा काव्यसंग्रह गर्भरेशीम. काय सुरेख कवीता रचतात त्या. सहज आणि अर्थगर्भ.

Comments

Unknown said…
Mazehi ek swapna hote (Original : I had a dream too) : An autobiography of Dr. Verghese Courian of White revolution.

And Shishiratale Gulab (Original : Roses in December) : An autobiography by Hon. Justice Mohd. Karim Chhagala.

Both abovesaid books are worth reading.

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण