Happy Birthday - V2

गेल्या वर्षभरात पुण्यात एक नवीन फ़्यॅड सुरू झाले आहे. गल्लीपासुन दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पुढा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ़लक लावायचे. साहेबांचा एक फोटो, आणि खाली शुभेच्छुकांचे ७ - ८ फ़ोटो. सगळे चौक - मोक्याच्या जागा ह्या फ़लकांनी व्यापल्या आहेत. माझ्या मते फ़लांसाठी 'बरे' दिसणारे फ़ोटो काढण्याचे स्पेशल 'पॅकेज' ओफ़र करत असणार स्टुडिओवाले! आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे सहसा या फ़लकांवर तारीख नसते लिहीलेली. त्यामुळे तो फ़लक महीनोमहीने 'ताजा' राहतो.
ह्या फ़लकांची सवय होते आहे तो वर त्यान्चे वर्जन २ बाजारात आले आहे. ह्या वर्जनमध्ये, शुभेच्छुकांच्या फ़ोटोला काट देण्यात आलि आहे, रिकाम्या झालेल्या जागी, एकतर साहेबांचा मोठा पोस देउन काढलेला फ़ोटो आणि एक 'गहिरी' कविता...
'वाट चालताना, पाठीवर हात फ़िरवणरे कोणीतरी हवे असते,
प्रत्येक नावेला पुढे नेणारे शीड हवे असते,
तुम्ही तो हात ते शीड आमच्यासाठी झालात
दीर्घयू व्हा आणि नौका पुढे न्या
" सूं सूं.... "

हे v2फ़लक कोण sponcerकरत असेल असे तुम्हाला वाटते?

Comments

Nandan said…
कविता आणि फलक? - सखाराम गटणेने आपली आवड आणि वडिलांचा व्यवसाय यांची सांगड घातल्यासारखे वाटते आहे. :-)
Manjiri said…
धन्यवाद नंदन, तुमची उपमा मोठी चपखल अहे.
Kaustubh said…
माननिय, श्री. आप्पासाहेब भोकरे उर्फ़ तात्याश्री,
यांच्या ४७व्या वाढदीवसानिमीत्त,
हार्दिक, अभीष्टचिंतन.

शुभेच्छू,

मा. श्री. संतोष कोंबरे,
श्री. विनायक ऎनापुरे,
श्री दिलीप डोणजे-पाटील.

(सर्व शुद्धलेखनासहित)

पुण्यातील हे फ़लक ही माझ्यासाठी एक मोठी करमणूक आहे. :)

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण