फास्टर फेणेचे बाबा
म्हणजे आपले भा. रा. भागवत हो! काय सॉलीड लिहिलय ना भागवत काकांनी? फुरसुंगीचा चँपियन सायकल स्वार बन्या आणि त्याच्या धडपडी. मोठी धमाल यायची वाचायला. ते फक्त फा फे चे बाबा नव्हते पण ह्या कार्ट्याची प्रसिद्धी जास्त असल्याने ते त्याचे बाबा म्हणवले जाणार.
दर बालवाडी दिवाळी अंकात, त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कथा असायची. इतर बाबतीत 'किशोर' पुढे लिंबुटिंबु वाटणारा बालवाडी या एका गोष्टीने बाजी मारुन जायचा. भागवतांचे बिपीन बुकलवार ( book lover?) आणि त्याची दोस्त मंडळी आहाहा - ती दिवाळीची सुट्टी ... एका हाताने फराळचे बकाणे मारत वाचलेल्य त्या गोष्टी ... कोणी १० निकारागुआ चे स्टॅम्प दिले तरी नसते एक्स्चेंज केले मी ते क्षण.
भा रां नी दिलेला आणि एक मोठा आनंदाचा ठेवा म्हणजे त्यांनी अनुवादित केलेल्या ज्युलस् वर्न च्या विज्ञान कथा. चंद्रावर स्वारी आणि इतर तर आहेतच पण सगळ्यात बेस्ट, मुक्काम शेंडेनक्षत्र आणि सुर्यावर स्वारी. 'Off on a comet' चा अनुवाद दॊन भागात. साधारणतः भाषांतरात येणारा बोजडपणा, या पुस्तकात अजिबात नाही. जणु मराठीत जन्माला आलेले कथानक. वातावरणसकट शेंडेनक्षत्रावर बसुन सूर्यावर स्वारी करायला गेलेला प्रुथ्वीचा तुकडा. त्यावरची अजब प्रजा. मॉमात्र चा अभिमानी बेन झुफ, नीना आणि पाब्लो, 'निल डेस्पेरेन्डम' म्हणणरे प्रो. रोझेत, कंजुष ईसाक, टिपीकल इंग्रज मे. ऑलिफॉन्ट... माझा बालपणीचा काळ सुखाचा करण्यात भा रां चा वाटा सिंव्हाचा आहे.
एकदम 'टॉक!'

Comments
Lahaanpani Faster Fene mala yevdhe avdayche ki te vachun me ekda fursungi la jaun alo hoto..:-)
-- khar aahe. 100% sahmat.
धन्यवाद,
राहुल, याला म्हणायचे खरा वाचक, कशी वाटली फुरसुंगी? शॆरलॉक हॊम्स नाही वाचायला मिळाले त्यांचे.
फास्टर फेणे वाचताना खरंच सॉलीड मजा आलेली.. पण काही महिन्यांपूर्वी मी फा.फे. मिळवायचा प्रयत्न केला खूप अगदी पुण्याच्या ABC मधे पण नाही मिळालं :(.. कुठे मिळालं तर मला नक्की कळवणं..
fa fe barobarach bipin bukalwar pan tevdhach changla hota. durmiL tikitachi sahasyatra, akkache ajab ichchhasatra vagere pustaka kevaL apratim hoti. me ti ajunachi awarjoon sangrahi thevli ahet ani ajunahi mala ti wachayla khoop awadtat...
Utkarsha prakashan (deccan gymkhana) madhe hopefully he sagLi pustaka miLaweet. Aajkal nastil miLat tar kharach khoop waiit watel...mazyakade 80's ani early 90's madhe vikat ghetleli sagLi pustake ajun ahet (fa fe ani bipin bukalwar mainly).
Fa. Fe., Gotya, Chingi hee saglee pustake PATH FINDER (Pune, Nilayam Talkies javal milat aahet). 2/3 varshanpasoon upalabdha navtee, paN aataa aalee aahet.
... Amitraj
Thanks for referring to the two classics of Jules Verne - suryavar swari and mukkam shendenakshatra..
Tried looking for your email id but couldn't locate in your profile.
- Chintamani
आजकाल फा.फे. माहित असणारे लोक सापडणे फार दुर्मिळ झाले आहे. मग बिपीन बुकलवार आणि नंदू नवाथे माहित असलेली व्यक्ती सापडणे जवळपास अशक्य.... पण या ठिकाणी या पात्रांना ओळखणारे एवढे लोक आहेत हे वाचून खूप बरे वाटले ....
वर उल्लेखलेले रशियन हेरावरचे पुस्तक आता संक्षिप्त रुपात उपलब्ध आहे - 'बादशाही जासूद'.
मुंबईच्या राजा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ज्यूल व्हर्नच्या २५ पुस्तकांपैकी ते एक आहे. ही पुस्तके पुण्यामध्ये उपलब्ध आहेत
भा.रा. तर माझे दैवत आहेत. आवर्जून उल्लेख करावा अशी तीन त्यांची पुस्तके म्हणजे 'भुताळी जहाज', 'जयदीपची जंगलयात्रा' आणि 'तैमूरलंगचा भाला' . ज्यूल व्हर्न , होम्स व्यतिरिक्त त्यांनी Laura ingalls wilder च्या ४ 'क्लासिक्स'चा ( Little House in the Big Woods आणि अन्य ३ ) देखील अनुवाद केलाय (मोठ्या रानातले छोटे घर, आनंदी आनंद गडे इत्यादी ) त्याची नवी आवृत्ती राजा प्रकाशनाने प्रकाशित केली आहे
याच दैवताला वंदन करण्यासाठी मी एक ब्लॉग पोस्ट लिहिलेली आहे...
http://prasadgates.blogspot.com/2011/05/blog-post.html
नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका....
@ संदीप लिमये : तुमच्याकडे बिपीनचे 'घड्याळाचे गुपित' हे पुस्तक उपलब्ध आहे का ? कारण सध्या बाजारात हे सोडून बिपीनची सारी पुस्तके उपलब्ध आहेत (एखाद दुसरे वगळता सगळी उत्कर्ष प्रकाशनाची आहेत )