प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

एवढ्यात वाचलेली काही पुस्तके:

Before I say goodbye - Mary Higgins Clark
A whodunit with a dash of supernatural added to it. Over all an avarage book. Competently written. But I was not too impressed by it. One thing I always notice about the books written by women is that they write more details about the house hold items and men write more about the surroundings. Women tend to add sentimental touches to the book, even to a whodunit.

रजनीश द नौटी भगवान - कुलकर्णी.
लेखक ओशो सन्यासी असुन, त्याने ह्या पुस्तकात ओशोंच्या प्राध्यापकीपासुन ते १९९० साली त्यांच्या अंतापर्यंतच्या कारकीर्दीचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ओशोंची कारकीर्द एखाद्या धुमकेतुसारखी आहे. नेत्रदीपक अणि notorious. ओशोंनी तत्वज्ञानावर, अध्यात्मावर आणि वेगवेगळ्या धर्मांच्या शिकवणीवर मोठे मार्मीक विवेचन केले आहे. त्यांची वाङ्गमयसंपदा भली मोठी आहे. परंतु या सर्वाचा त्यांच्या आचरणाशी अजिबात मेळ जुळत नाही. असे वाटते की जणु हे लिहिणारे रजनीश आणि सतत विवादाच्या, controvesiesच्या जाळ्यात अडकलेले भगवान या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. कदाचित आजपासुन हजार वर्षांनी ह्या बाबतीत वाद होतील रजनीश एक की दोन!! लेखकाने हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे विचारात पाडनारे अहेत. पण पुस्तक वाचायला बराच नेट लावावा लगला. पुनरावृती फ़ार आहे. पुस्तक क्लीष्ट आहे.

ईजीप्तायन - मीना प्रभू मीन प्रभूंचे माझे लंडन धरुन मी वाचलेले हे चौथे प्रवास-वर्णन. त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्या आपल्याला ईजीप्त प्रवास घडवुन आणतात. वाचनीय!

Alchemist - Paulo Coelho
काही दिवसांपूर्वी पौलो चे नवीन पुस्तक प्रसिद्ध झाले झहीर नावाचे. त्यामुळे मला या पुस्तकाची आठवण झाली.वाचायचे राहुन गेलेल्या पुस्तकांपैकी एक. हे पुस्तक अवडण्याची एक फ़ॅशन आहे. Jonathon Livingston Seagullसारखी. त्या पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक ही रुपक आहे, - a fable, आपण पहिलेले स्वप्न, साकार करण्या विषयी. मूळ स्पॅनीश चे इंग्रजी भाषांतर. पुस्तकाची भाषा रुपकांना शोभणारी आहे. एकुण पुस्तक motivatingआहे, पण पुस्तकाला असा प्रचारकी किंव मिशनरी वास आला की ते बट्बटीत होते, त्यतली तरल गूढता नाहीशी होते. G.A.ची रुपके ह्या पेक्षा कितीतरी उजवी आहेत.

ही टीपणे केल्यावर मला "सखाराम गटणे" वाटु लगले आहे "कथावस्तु तीन स्थळी घडते..."

Comments

Manjiri said…
धन्यवाद गार्गी,
I hope you will visit often!
jonathan and Alchemist विषयी, ती पुस्तके मला खूप obviously रुपकात्मक वाटली आणि एखाद्या वात्रट कार्ट्याला कळ्ले की हा खेळ नसुन अभ्यास आहे, की तो कसा अजिबात दाद देत नाही तसे झाले माझे.
But ofcourse we can agree to disagree :)
thanks again.

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण