योगायोग
पु. ल. नी आपल्या बहारदार शैलीत लिहिलेले कनिष्टभगिनीविवाहयोग आदि योग आठवत असतील ना तुम्हाला? याला कदाचित संगणक प्रभाषेत डिजाईन पॅटर्न्स म्हणता येतील. तसेच काही योग मला आढळू लागले आहेत. तर आता नमनघटतैलयोग संपवुन मूळ योगांकडे वळते.
कसोटीपर्जन्ययोग - अर्थात सामना सुरु झाला की हमखास पाऊस पडणे. हे इतके हमखास आहे की सरकार खास दुष्काळी भागात सामनॆ भरवण्याचा विचार करत आहे. संस्कृतीरक्षकांनी आक्षेप न घेतल्यास, तो विचार तडीस जाईल ही कोणी सांगावे? ह्या योगाचे इतर अवतार येणेप्रमाणे: सिनेमाला जायचे म्हणुन ऑफिसमधुन लवकर निघायचे ठरवले की क्लायंटने कॉन्फरन्स कॉल करणे. समारंभाला जायला आपण छान जामानिमा करुन बाहेर पडल्यावर समॊरच्या वाहनाने आपल्या पोषाखावर खडीवर्क करणे, किंवा चप्पल तुटणे. आलं ना लक्षात? या योगाचा आपल्या महत्वाच्या कामांवर (उदा. दांडी मारण्यासाठी थाप मारणे) परिणाम होऊ नयॆ म्हणुन आपण काळजी घेतॊ, अभेद्य व्युहरचना करतो. पण हा योग एका नाजुक आघाताने आपल्याला चारी मुंड्या चीत करून टाकतॊ.
सणअभ्यासपरीक्षान्याय - परीक्षा या नेहमी अशा ठेवायच्या की त्या सणाला लागून आल्या पाहिजेत. त्यातही भीषण विषय तर असे त्या सणाला टेकुन पाहिजेत. आप्त जन सॊने लुटत आहेत आणि आपण बीजगणितात लुटले जातोय. हा तर शिक्षणखात्यात कायदा म्हणुनच नमुद असावा अशी आम्हाला दाट शंका आहे. कोणतीही परीक्षा या न्यायापासुन सुटलेली नाही बरका! पहिल्या चाचण्या गणपतीला लागून. सहामाही परीक्षा - तुम्ही म्हणाल दिवाळी तर सुट्टीत येते - पण नवरात्र-दसरा आहेत ना तिला टेकू द्यायला. दुस-या चाचण्या ख्रिसमसला घेरुन आणि वार्षिक परीक्षा होळी - गुडीपाडव्याच्या कडेवर.. अभियांत्रिकी परीक्षांच्या प्रेपलीव्स नेहमी इतरांच्या सुट्ट्यांमध्ये. ते सगळे क्रिकेट खेळतात आणि आपला मात्र फायनाइट ऑटोमेटाच्या खटाटॊपात जीव मेटाकुटा!
बरं आपलं शिक्षण संपलं (आहाहा ..) तरी सुटका नाही हो .. आता लेकीच्या अभ्यास परीक्षात परत तीच गत. तुम्हाला सांगते, परवाच्या गुडीपाडव्याला शेजारच्या आजींना नुतनवर्षाभिनंदन म्हणायच्या ऐवजी नुनमतीदिग्बॊई म्हणाले मी! मग आसामी भाषेत असेच म्हणतात असे म्हणुन साजरे केले. पीळ नुसता!
तर असे हे दोन यॊग. तसेच प्रथमउड्डाणसहप्रवासीयॊग, व्यवस्थीतकागदपत्रगहाळयोग हे इतर काही... पण त्यांच्या बाबत पुन्हा केंव्हातरी...

Comments