उद्रेक

च्या मारी!

कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़,
मनातलं सगळं किल्मीष करुन टाकावं साफ़.

तोडून टाकावी सगळी चांगुलपणाची कुंपणे
सोडून द्यावे आपली चंगली इमेज जपणे...
(आपल्यालाच फ़क्त तसं वाटत असतं नाहीतरी)

हासडाव्या चार कचकचीत शिव्या!
(येत नसतील तर निदान ओठांची भेदक हालचाल)
आणि चिरडावी तमाम तत्वं पिचपिचीत!

कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़.
सतत बनणं सोडून द्यावं आपलेच बाप!

Comments

Sumedha said…
मस्तच!

कधी न कधी सगळ्यांनाच बहुतेक असं बंड करावंसं वाटतं. पण आतून कुठून तरी भिती वाटत असते. कारण आपली शिकवण आड येते, "समाजनियम", शिष्टाचार आड येतात. पण बंड करायचं धाडस केलंच, तर मात्र त्याबद्दल नंतर पश्चात्ताप करू नये! बंड करण्याइतकंच, किंवा त्याहूनही अधिक धाडस त्याचे परिणाम स्वीकारायला लागतं, नाही का?

मी फारच गंभीर झाले का?

कविता एकदम सही आहे हं!
Manjiri said…
आभार सुमेधा.
hemant_surat said…
कितीही केला उद्रेक
तरी तो स्वतःलाच जाळतो.
चांगला(?) माणूस प्रत्येक
माझ्या दूरच पळतो!
अरे ही काय केली मी शब्दांची फ़ेक,
नंतर आपलाच जीव आपल्याला खातो.
वाईटांवर तर परिणाम होत नाही एक,
वर तोही आपल्याला वाटेल ते बोलतो.
ईछ्छा असूनही द्याव्यात शिव्या अनेक,
चेहरा हसरा ठेवून वेळ मारून नेतो!

आपल्या कवितेमुळे ह्या ओळी सुचल्या.
हेमंत पाटील- सूरत
abhijit said…
मला कोलंबसाचे गर्वगीत या कवितेची आठवण झाली तुझी कविता वाचून.

किंवा तुतारी....

स्वत:ला जे आवडतं ते करताना लोक काय म्हणतील याला फ़ारसं महत्व देऊ नये या मताचा मी आहे. छान आहे कविता.

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण