Posts

संगम साहित्य

Image
थोरांची चरित्रे, दांडी मार्च, चौरीचुरा आणि चलेजाव 3 वेळा, महायुद्धांची कारणे व परिणाम शिकता शिकता प्राचीन भारताचा इतिहास शिकायचा राहून गेला. हराप्पा मोहेंजोदारो नंतर एकदम कृष्णदेवराय व्हाया थोडेसे चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य आणि किंचीत चक्रवर्तिन अशोक - देवानां पिय पियदस्सी! बाकी अंधार परशुराम - अगस्ति नंतर nothing "happening"! गुगल बाबांच्या कृपेने आता जेंव्हा  गतकाळाबद्दल चौकश्या करते तेंव्हा काय काय "happening" हाती लागते. - with a disclaimer - that this is the info that I gathered on net, and have not verified - हे हाती लागलेले माहितीचे कण परत विरुन जाऊ नयेत म्हणून ही टिपणे ... पावसाच्या कवितांचा स्वैर मागोवा घेताना,  तामीळ साहित्याचा एक भाग आहे संगम साहित्य. त्यामध्ये डोकावले. इ स पूर्व दुसरे शतक ते इ स दुसरे शतक, हा संगम साहित्याचा काळ. चोल, चेर आणि पांड्य राज काल. तामीळ कवींचे तीन संघ (संगम) या काळात बनले. त्यांनी उत्तम साहित्य संकलित केले. ते आहे संगम साहित्य. पहिला संगम अगस्ति ऋषींच्या अध्यक्षतेत. ज्याचे आता काहीच उपलब्ध नाही. दुसरा संगम तोलकाप्पीयरांचा ...

राजविवाह आणि कविता

प्रिन्स हॅरी आणि मेगन चा लग्नसोहळा  जगाच्या साक्षीनं थाटात पार पडला. ह्या सोहळ्यातल्या भावलेल्या काही गोष्टी ... 1. हॅरीच्या पणजीने (Queen mother)  सुरु केलेली परंपरा - वधुच्या हातातला पुष्पगुच्छ सोहोळ्यानंतर, अनाम वीराच्या समाधीवर ठेवला जातो. 2. खिदळणारा निरागस दातपडका पेजबॉय 3. राजकवयित्री कॅरॉल ऍन डफीची ह्या प्रसंगानिमित्त लिहिलेली कविता, मी केलेला हा त्याचा स्वैर अनुवाद ... खाजगी असावी, खडकाळ लांब वाटचाल अंतिम ताटातूटीची; वाटेतल्या माणसांनी हात उंचावलेच, तर ते मोबाईल फोन नसावेत, ना त्यांचे चेहरे, कॅमेरे; म्हणून चढवला तुझ्या काळजाने आपला युनिफॉर्म चल तर, एक आशिर्वचन, एक शुभचरण आणि लांब वाट संपली जिथे मायेची अळूमाळू पुष्पवृष्टी   घंटानी निनादत नजराणा, हो, त्या सगळ्यांनी  पाहिले - आणि घेतले तुझे नाव. डायनाच्या अंतयात्रेत चालणारा लहानगा हॅरी, त्याच्या वाटेत आता एक खुबसुरत मोड आला आहे. The original poem It should be private, the long walk on bereavement’s hard stones; and when people wave, their hands should not be...

तुमचा स्कोर किती आहे?

सध्या इंग्रजी पुस्तकप्रेमी वर्तुळात एक शंभर पुस्तकांची यादी फिरत आहे. वाचायला हवीत अश्या पुस्तकांची यादी.  आपण किती वाचली आहेत हे ताडून बघण्यासाठी.  इंग्रजी पुस्तकांचा स्कोर तयार झाल्यावर, प्रियाच्या डोक्यात मराठी पुस्तक यादीची कल्पना उगवली. प्रिया यादीपटू आहे. पुस्तकांची, गाण्यांची वगैरे यादी करुन त्यांचा फडशा पाडण्यात ती वाकबगार आहे. तो वारसा तिला आमच्या आई-बाबांकडून मिळाला असणार. माहेरी आमच्याकडे, वाण्याची यादी करायला वापरायची आमच्यासाठी कस्टमाईज्ड मास्टर लिस्ट आहे!   तर, प्रियाने चॅलेंज केल्याने, तिने आणि मी मराठी पुस्तकांची यादी केलीय.   त्याआधी यादी करायच्या नियमांची यादी केली, ती येणेप्रमाणे:  १. ही यादी आमची आहे, आम्हाला जी पुस्तके वाचलीच पाहिजे असे वाटते त्या पुस्तकांची यादी आहे.  २. एका लेखकाचे १ फार फार तर २ पुस्तके या यादीत घेतली आहेत. नाहीतर, पु.लं ची सगळी, लंपनची सगळी अशी यादी वाढत गेली असती. ३. संत  वाड़्मय याद्यांच्या पलिकडले आहे, त्यामुळे ते ह्या यादीत नाही ४. पुस्तकांचा यादीतला क्रम यादृच्छिक (random) आहे.   ५...

जन हित मे जारी

💥💢💥💦💢💥💢💥💦 सर्व विवाहित व अविवाहित स्त्रियांनी आणि पुरुषांनी वाचली पाहिजे अशी बातमी, संवेदनाशील असाल तर लगेच फॉरवर्ड कराल. बघूया कोणाकोणाला फॉरवर्ड करायची हिम्मत आहे! 💥💢💥💦💢💥💢💥💦 भारतीय जनतेपासून लपवून ठेवलेले हे एक खळबळजनक आणि अतिशय गुप्त असे सत्य, केवळ भाग्यवानांना उघड होत आहे. तुम्हाला माहित आहे का?  व्हॉट्सऍप वर फॉरवर्ड होणारे मौल्यवान मेसेजेस "जनहितमेजारी" नावाची एक गुप्त संस्था टंकलिखित करते. तिची स्थापना प्रत्यक्ष वेदव्यासांनी केली आहे. मौलिक ज्ञान आम जनतेला पोहोचावे हे या संस्थेचे ध्येय आहे.  या संस्थेची कर्मचारी भरती तीन वर्षातून एकदाच होते, त्याबद्द्ल अतिशय गुप्तता बाळगण्यात येते. ह्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा मेसेज कोटा देण्यात येतो. त्यांनी लिहिलेल्या मेसेजेस ची संख्या, त्यांचा दर्जा  व त्यांचा व्हॉट्सऍप वर होणारा प्रसार ह्यावर कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते.  जसजशी कर्मचाऱ्यांची प्रगती होते तसतशी त्यांची जनहितेच्छुक, जनहितवादी, जनहितकुशल (ह्या पदाच्या 1, 2, 3 अश्या सबग्रेड्स आहेत), जनहितपारंगत अश्या पदांवर बढत...

वाळवण

भारतीय मनामध्ये - आपला नंबर पहिला लागणार नाही - ही सगळ्यात मोठी असुरक्षितता असते. सगळ्या ठिकाणी आपले भारतीयत्व ह्या असुरक्षिततेमुळे सिद्ध होत राहते. सिग्नल सुटल्यावर, आगगाडी फलाटात शिरल्यावर, विमान जमिनीला टेकल्यावर ... सगळीकडे. पण ह्या खालोखाल भारतीय मनातली दुसरी असुरक्षितता कुठली आहे माहीत आहे का?  ती आहे आपले धुतलेले कपडे न वाळण्याची!  घरातल्या कोणीही वाळत घातलेले कपडे काढताना ते दमट असल्यची शंका जरी व्यक्त केली तर तो गृहिणीला  आपला अपमान वाटतो. आत्तापर्यंत मी स्वतःला या असुरक्षिततेपासुन मुक्त समजत होते. पण परवा परदेशी, परकं वॉशिंग मशीन, बेभरवशाचा ड्रायर यामुळे, अपार्टमेंट सोडायला चारच तास राहिले आणि कपडे अजून दमट आहेत, हे लक्षात येताच, माझ्या मनातल्या भारतीय गौरीची दुर्गांबा झाली! तिने रणांगणाचा सर्वे केला, खिडक्या, गज, असणारं उन्ह, दहाव्या मजल्यावर वाहणारे वारे, याची दमट छोट्या आणि मोठ्या कपड्यांशी सांगड घातली, आणि त्या रैनबसेर्‍याच्या सर्व पृष्ठभागांचा योग्य वापर सुरू  केला. कपडे वाळले का हा प्रश्न तुम्हाला पडू नयेच. त्या बसेर्‍याचा मालक त्याक्षणी तिथे उगवल...

झुलता झोका जाओ आकाशाला ...

Image
राई - आमचं इटुकलं स्वप्न. थेंबभर पाणी, मुठभर माती आणि डोळयात मावेल तेव्हढं आकाश एकत्र करुन बंधलेला इमला. इथे आमचे नानाविध प्रयोग सुरु असतात. पीक पिकवायचे. मग पीक आले की ते साठवायचे आणि संपवायचे. खतं आणि रोपांचे, birdbath ते Avocado उगवण्यापर्यंत सगळे.  त्यापैकी माझ्या डोक्यात ब-याच दिवसापासुन असलेला कीडा म्हणजे ताड-माड उंच असणा-या उडळीच्या झाडाला एक  पाटीचा झोपाळा बांधण्याचा. ब-याच दिवसापासुन अभयला भुणभुण लावली होती. (अभय - माझा नवरा - practical - down to earth - असण्याची सगळी जबाबदारी त्याच्याकडे सुपुर्त आहे, म्हणजे मी दिवास्वप्ने बघायला मोकळी). त्याने झोपाळा बांधण्य़ातल्या सर्व अडचणी दाखवुन दिल्या तरी आमच्या दोघांच्या डोक्यातुन ती कल्पना काही जाईना.  शेवटी ह्या आठवड्यात हा कोढाणा सर करायचा असा निश्चय करुन राईकडे कुच केली.  झोपाळ्याची fabricated ऐसपैस पाटी, आणि दोरखंड घेउन.  हे उपर्निदेशित उडळीचे झाड, झाड कसले वृक्षच तो, चांगलाच उंच आहे. पहिली फांदीच मुळी 20 फुटावर. कोणीही झाडावर चढणारे मिळाले नाही.  मग प्लान बी अमलात आला.    दगडाला प्...

सुलभा देशपांडे

मुंबईच्या वेशीवर असलेलं आमचं गोरेगाव छान टुमदार होतं. आत्तासारखं टॉवरमय आणि कॉर्पोरेट नव्हतं झालं अजुन. पूर्वेला आरे कॉलनीची हिरवाई आणि छायागीतच्या जुन्या गाण्यात दिसणारं पिकनिक पॉइंट अजुन डौलात होते. रोजचं शाळा ते घर पायी होतं. मुंबईला जायचं ते सठी सहामाही मॉन्सुनबरोबर उसळणाऱ्या नरिमन पॉइंटच्या पर्वतप्राय लाटात भिजायला नाहीतर 253 नंबरच्या डबलडेकरने जुहुला जायला. हो आणीक एक चैनीचा कार्यक्रम असायचा, पार्ल्याला दीनानाथला जाउन बालनाट्य बघण्याचा. हा एक सोहळा असायचा, त्या साठ ी तिकीट काढुन आणणे, बरोबर आजुबाजुच्या चार पोरींना घेउन जाणे, सगळ्या गॅंगला बस - लोकलने सुखरुप पार्ल्याला नेणे आणणे, हे सगळे आमचे आई बाबा हौसेने करायचे. पार्ले ईस्टला उतरुन भाजी मार्केट पार केलं की दीनानाथ. रुबाबदार नाट्यगृह. गुबगुबीत खुर्च्या, मखमली पडदे, सगलं कसं राजबिंडं, त्या मनाने बालगंधर्व, यशवंतराव गरीब वाटतात मला. सोय वाटतात, चैन नाही वाटत. वयाचा फरक असेल कदाचित. तिथे सर्व खुर्च्यांच्या रांगात बाल प्रेक्षकांची किलबिल आणि लगबग चाललेली असायची. नाट्यगृहालाही मजा वाटत असेल. इतर वेळी ठेवणीतल्या साड्या- ग...

Relevance

चौदा सोळा वर्षाची असेन , उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे आजोळी मुक्काम होता . मावस - मामे भावंडे जमुन हुंदडण्याचे विविध प्रकार आजमावत होतो . त्यातलीच एक टूम , पद्मावती कडुन तळजाई टेकडी चढायची . वरच्या पठारावरुन चालत जाउन , मागच्या बाजुने पर्वती चढायची मग पाय - यानी उतरुन , बस पकडुन परत . माझ्या आठवणीतलं पद्मावतीचं देऊळ , गावातल्या नांदत्या गाजत्या वाड्यासारखं होतं . फरसबंद अंगण , विहीर , अंगणात मोठे वृक्ष , मध्ये देउळ ,  भवताली छोट्या देवळांची ओळ . भाविकांची माफक वर्दळ .   आपल्या तान्ह्याला पहिलं देवदर्शन करायला घेउन आलेली एखादी पहिलटकरीण आणि तिच्या सोबतीला आई , वहिनी नाहीतर बहिण .  कांजिण्या झालेल्या मुलांच्या आयांनी ठेवलेला दहीभाताचा नैवेद्य . आणि या सगळ्यांवर मायेने आणि अधिकाराने पाखर घालणारी देवी .  तर आम्ही सगळे टेकडी चढुन पठारावर पोचलो . डोळे मिटुन घ्यावे असे वाटणारा भणाण वारा . कानात वारा भरलेल्या वासरांसारखे सुटलेले आम्ही सगळे .  पठार सगळं मोकळंच .  उन्हाळ्यात वाळल्या गवताचं आणि लाल पायवाटांच माळरान .  वाटेने पर्वतीकडे जाता जात...

लालीची गोष्ट

गोरेगावला    पाच    नंबरच्या    ब्लॉकमध्ये    मल्याळी    कुटुंब    राहायचं . दोन वर्षाची लाली आणि तिचे आई बाबा .  दोघे नोकरी करायचे . आई घराबाहेर असायची तेवढ्या वेळ लालीला सांभाळायला एक बाई घरी यायची व्यवस्था केली होती त्यांनी .  एका रविवारी लालीच्या आईने तिला सफरचंद भरवायला घेतले .  लालीला समोर बसवुन , फोडी केल्या , सालं काढली ,  आणि फोड लालीसमोर धरली , तर लालीने नेहमीचं असल्याप्रमाणे , साल उचललं आणि खायला सुहरवात केली . आईने परत फोड पु ढे केली . लाली म्हणाली , ' ते नाही , हे खायचं असतं ' . आईला ब्रम्हांड आठवलं , तपासाअंती कळलं की सांभाळणारी बाई तिला सालं खायला द्यायची आणि स्वत : फोडी खायची .  एखाद्या च - यासारखी ती आठवण राहिली आहे माझ्या मनात …   सध्या आपल्या समाजाचं लाली सारखं झालंय . आपण ही  नुसत्या सालीच खातोय .   खेळ खेळत नाही बघतो . बातम्या नाही मतं ऐकतो . देशाभिमानाचं भरतं आलं तर पोस्ट्स बनवतो नाहीतर फॉरवर्ड / लाईक करुन आपण किती देशाभिमानी अशी स्वत : ची पाठ थोपटतो ....