तुमचा स्कोर किती आहे?

सध्या इंग्रजी पुस्तकप्रेमी वर्तुळात एक शंभर पुस्तकांची यादी फिरत आहे. वाचायला हवीत अश्या पुस्तकांची यादी.  आपण किती वाचली आहेत हे ताडून बघण्यासाठी. 

इंग्रजी पुस्तकांचा स्कोर तयार झाल्यावर, प्रियाच्या डोक्यात मराठी पुस्तक यादीची कल्पना उगवली. प्रिया यादीपटू आहे. पुस्तकांची, गाण्यांची वगैरे यादी करुन त्यांचा फडशा पाडण्यात ती वाकबगार आहे. तो वारसा तिला आमच्या आई-बाबांकडून मिळाला असणार. माहेरी आमच्याकडे, वाण्याची यादी करायला वापरायची आमच्यासाठी कस्टमाईज्ड मास्टर लिस्ट आहे!  

तर, प्रियाने चॅलेंज केल्याने, तिने आणि मी मराठी पुस्तकांची यादी केलीय.  

त्याआधी यादी करायच्या नियमांची यादी केली, ती येणेप्रमाणे: 
१. ही यादी आमची आहे, आम्हाला जी पुस्तके वाचलीच पाहिजे असे वाटते त्या पुस्तकांची यादी आहे. 
२. एका लेखकाचे १ फार फार तर २ पुस्तके या यादीत घेतली आहेत. नाहीतर, पु.लं ची सगळी, लंपनची सगळी अशी यादी वाढत गेली असती.
३. संत  वाड़्मय याद्यांच्या पलिकडले आहे, त्यामुळे ते ह्या यादीत नाही
४. पुस्तकांचा यादीतला क्रम यादृच्छिक (random) आहे.  
५. भाषांतरित पुस्तकांना यादीत घेतले नाही. नाहीतर यादी वैश्विक झाली असती. पण त्यामुळे भा रा भागवतांची जुल्स वर्न ची भाषांतरे, शांता शेळकेंचे चौघी बहिणी सारखी सुरेख पुस्तके वगळावी लागली. कदाचित भाषांतरांची वेगळी यादी करावी - पाडस, तोत्तोचान, G A ची कॉनरॅड ची भाषांतरे, बिमची गोष्ट.... असो. 

या यादीचा उद्देश काय? तर अर्थात - भपका - आम्ही किती वाचले याचा :). 
jokes apart, चांगले काय वाचले याचा आढावा घ्यावासा वाटला, इतरांची मते जाणून घ्यावीशी वाटली म्हणून हा यादीप्रपंच. 
 आणि तुम्हाला ही संधी तुम्ही किती वाचली हा नंबर कॉमेंटमध्ये टाकून मिरवायची! तुमच्या पुस्तकप्रेमी मित्रांबरोबर ताडून बघायची! 
तुम्ही जर यादी केलीत तर कुठली गाळाल आणि का, कुठली यादीत घालाल आणि का? हे पण लिहा. 

तर आता प्रत्यक्ष यादी

  1. व्यक्ती आणि वल्ली    -पु.. देशपांडे
  2. छावा शिवाजी सावंत
  3. स्वामी रणजित देसाई
  4. पण लक्षात कोण घेतो हरी  नारायण आपटे
  5. ययाती वि.. खांडेकर
  6. श्रीमान योगी रणजित देसाई
  7. वीर धवल नाथ माधव
  8. रणांगण विश्राम बेडेकर
  9. युगांत इरावती कर्वे
  10. काजळमाया जी.. कुलकर्णी
  11. तुबांडचे खोत श्री.ना.पेंडसे
  12. पार्टनर- .पु.काळे
  13. दुनियादारी सुहास शिरवळकर
  14. काळा पहाड- बाबूराव अर्नाळकर
  15. चिमणराव व गुंड्याभाऊ चिं.वि. जोशी
  16. ओसाडवाडीचे देव - चिं.वि. जोशी
  17. श्यामची आई सानेगुरुजी
  18. बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर
  19. स्मृतीचित्रे लक्ष्मीबाई टिळक
  20. माझा प्रवास गोडसे गुरुजी
  21. एक एक पान गळावया गौरी देशपांडे
  22. कळ्यांचे निश्वासविभावरी शिरूरकर
  23. आहे मनोहर तरी सुनिता देशपांडे
  24. नटसम्राटवि.वा.शिरवाडकर
  25. चानी चिं.त्र्यं. खानोलकर
  26. दौलत ना.सि. फडके
  27. कोसला भालचंद्र नेमाडे
  28. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव
  29. बलुत दया पवार
  30. लमाण डॉ. लागू
  31. शाळा मिलिंद  बोकील
  32. हंस अकेला -  मेघना पेठे
  33. रारंग ढांग -प्रभाकर पेंढारकर
  34. वासुनाका भाऊ पाध्ये
  35. माचीवरील बुधा गो. नी. दांडेकर
  36. कोण्या एकाची भ्रमणगाथा गो.नी.दांडेकर
  37. मृत्युंजय शिवाजी सावंत
  38. शेहनशाह ना.. इमानदार
  39. राउ -  ना.. इमानदार
  40. पानिपत विश्वास पाटील
  41. आणि ड्रॅगन जागा झाला अरुण साधू
  42. सिंहासन अरुण साधू
  43. अकरा कोटी गॅलन पाणी अनिल बर्वे
  44. धुक्यातून लाल ताऱ्याकडे अनंत कानिटकर
  45. कलिकामूर्ती गो.ना.दातार
  46. मर्मभेद शशि भागवत
  47. ब्र कविता महाजन
  48. जैत रे जैत -गो.नी.दांडेकर
  49. ऋतूचक्र -  दुर्गा भागवत
  50. बँरिस्टर जयवंत दळवी
  51. माझे लंडन मीना प्रभू
  52. मागोवा नरहर कुरुंदकर
  53. वनवास -प्रकाश नारायण संत
  54. काळ्या कपारी नारायण धारप
  55. भालू बाबा कदम
  56. मिरासदारी .मा. मिरासदार
  57. फास्टर फेणे - भा. रा. भागवत
  58. गोट्या - ना.धो. ताम्हणकर
  59. रामनगरी - राम नगरकर
  60. घाशीराम कोतवाल - विजय तेंडुलकर
  61. चंद्रमाधवीचे प्रदेश - ग्रेस
  62. ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
  63. झेंडूची फुले - केशवकुमार
  64. ओमियागे - सानिया
  65. मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमरशेख
  66. बालकवींची समग्र कविता - बालकवी
  67. विशाखा - कुसुमाग्रज
  68. मर्ढेकरांची कविता - बा सी  मर्ढेकर
  69. सलाम - मंगेश पाडगावकर
  70. स्वेदगंगा - विंदा करंदीकर
  71. समिधा - साधना आमटे
  72. प्रकाशवाटा - डॉ प्रकाश आमटे
  73. माझा साक्षात्कारी हृदयरोग - अभय बंग
  74. चकवाचांदणं - मारुती चित्तमपल्ली
  75. झिम्मा - विजया मेहता
  76. मी दुर्गा खोटे - दुर्गा खोटे
  77. जोगिया - ग दि माडगुळकर
  78. स्वामी - रणजीत देसाई
  79. जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे
  80. धागे उभे आडवे - डॉ. अनिल अवचट
  81. खोल खोल पाणी - रत्नाकर मतकरी
  82. सांगते ऐका - हंसा वाडकर
  83. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
  84. एम.टी.आयवा मारु - अनंत सामंत
  85. युगंधरा- डॉ. सुमती क्षेत्रमाडे
  86. जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर
  87. एक होता कार्वर - वीणा गवाणकर
  88. प्रिय जी.ए. - सुनिता देशपांडे
  89. लाईमलाइट - अच्युत गोडबोले
  90. कऱ्हेचे पाणी - प्र के अत्रे
  91. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्ण्मेघ कुंटे
  92. रमलखुणा - जी.. कुलकर्णी
  93. जोर्तिमयी - योगिनी जोगळेकर
  94. माझी जन्मठेप - वि.दा. सावरकर
  95. उथव -रा.भि.जोशी
  96. मालनगाथा - इंदिरा संत
  97. कणेकरी - शिरीष कणेकर
  98. झोंबी - आनंद यादव
  99. आनंदी गोपाळ - श्रीपाद जोशी
  100. गर्भश्रीमंतीचे झाड -पद्मजा फाटक


Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण