उद्रेक
च्या मारी! कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़, मनातलं सगळं किल्मीष करुन टाकावं साफ़. तोडून टाकावी सगळी चांगुलपणाची कुंपणे सोडून द्यावे आपली चंगली इमेज जपणे... (आपल्यालाच फ़क्त तसं वाटत असतं नाहीतरी) हासडाव्या चार कचकचीत शिव्या! (येत नसतील तर निदान ओठांची भेदक हालचाल) आणि चिरडावी तमाम तत्वं पिचपिचीत! कधी कधी स्वत:ला करून टाकावं माफ़. सतत बनणं सोडून द्यावं आपलेच बाप!