आट्यापाट्या
वाचायच्या छंदाचा, छापील "म्यॅटर" हा एक भाग झाला. पण हा छंद पुरवण्यासाठी इतरही अक्षर वाङमय उपलब्ध असते. माझ्या वाचनवेडाचा एक मोठा भाग पाट्या वाचणे हा आहे. अगदी अक्षरओळख झाल्यापासुन,वाहनात बसले की मिळेल त्या खिडकीला नाक लावुन वेगाने मागे पडणा-या पाट्या वाचणे हा एक लाडका उद्योग आहे. आणि आजवर तो अव्याहत चालु आहे.
बरं पाट्या वाचायच्या कश्या? तर काही लोक ’सकाळ’ पेपर वाचतात की नाही, पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोप-यातल्या आजच्या दुर्वांकुर (ही पुण्यातली जगप्रसिद्ध मराठी थाळी प्लेस (खानावळ म्हणायचे नाही!) ) च्या थाळी मेनुतील सिताफळ रबडी पासुन ते पार शेवटच्या पानावरच्या ... मुद्रणालयात छापुन प्रसिद्ध झाले पर्यंत. तशी प्रत्येक पाटी वरच्या श्री वगैरे देवनागरी किंवा कधी गुरुमुखीत लिहिलेल्या शुभंकरापासुन ते उजव्या कोप-यातल्या प्रोप्रा. भिका ढेकणे पर्यंत. ह्या आधारे दुकानदारांची आवडती दैवते आणि रंगा-यांचे शुद्धलेखन यावर प्रंबंध लिहायचे आमच्या मनात घाटत आहे. मुख्य चुका असतात त्या अनुस्वाराच्या आणि रफाराच्या. अंम्बाई आशीवार्द ह्या तर फारच कॉमन. आणि त्या मी चालता चालता उच्चारुन बघते आणि जो माझा चेहरा बावळट होतो म्हणता. तुम्ही बघा बरं उच्चार करुन. शिवाय न - ण ची अदलाबदल, इंग्रजी स्पेलींग्स ह्याबद्दल तर बोलणे नलगे.
पाट्यांच्या नावाची पण फॅशन असते आणि ती बदलत असते. जुन्या दुकानांची नावं ’धी न्यु’ नी सुरु होतात. ’धी न्यु अनिल बेकरी’ आणि केस कापायच्या दुकानाचं नाव खुपदा सन्मान असतं! बेक-यांची नावं इंग्रजी असतात - ग्रीन, वोल्गा इ.
नव्वद च्या दशकात पुण्यात, सामानाने ओसंडुन वाहणा-या टीचभर वाण्याच्या दुकानांना ’सुपर मार्केट’ नाव द्यायची फॅशन होती. साड्यांच्या दुकानांच्या नावाची एक वेगळीच त-हा. तीन अक्षरी ईकारान्त हा नियम. मग त्यात बसणारे जे काही निघेल ते नाव!
पण काही दुकानं मात्र अशी काही पाटी मिरवतात की बोलणच खुंटतं. दादरजवळ एका रस्त्यावर मला एका लॉंड्रीचं नाव वाचायला मिळालं ’सुरेश वस्त्र स्वच्छालय व रंगालय’! हे म्हणजे पुरणपोळीला हरभ-याच्या डाळीचा गोड पराठा म्हणण्यासारखं झालं!
ह्यानंतर मग दुसरा नंबर लागतो तो होर्डींग्सचा. ह्या जाहिरात फलकांच्या वर्गवा-या आहेत. वाढदिवस शुभेच्छा एक विशेष प्रकरण. तर काही जाहिराती मात्र आवर्जुन वाचण्यासारख्या असतात. लकडी पुलापाशी असणारी अमुलची खुसखुशीत जाहिरात एकदम मन प्रसन्न करते. किंवा रेसिडन्सी क्लबच्या चौकात लावायचे ती राजकारणावरची भाष्ये. ह्यात सगळ्यात केविलवाणा प्रकार म्हणजे सरकारी जाहिराती. लडाखच्या आमच्या प्रवासात छांग-ला खारदुंग-ला असे खंदे पास आम्हाला नापास करायचे जोरदार प्रयत्न करत असायचे - खोल द-यांचा रस्ता आणि वाटेवर या यमकजुळवण्या - "जानकारीही एड्ससे बचायेगी" नाहीतर "पढीये और बढिये"! अरे प्रसंग काय? तु लिहतोस काय! पण परिस्थीतीशी संबंध नसणे हे तर यंत्रणेचे लक्षण आहे ना!
हे सगळे मनोरंजन पुरेसे नसले तर विविध इमारतींची नावे हा पुढचा प्रकार. सरकारी इमारतींवर असलेली तीन भाषांमधली नावं - नाही चुकले - नामाभिधानं वाचली की आपल्याला मराठी येते, हिंदी समजते यावरचा विश्वास उडुन जातो. एका रेल्वे स्टेशनवर पाटी होती, ’उपरी उपस्कर’! म्हणजे काय, हे कुठल्या भाषेत आहे ह्या चा मला आजिबात बोध झाला नाही! आणि त्याचं इंग्रजी वाचायच्या आत गाडी हललेली! रेल्वे खात्याच्या संस्कृती जतनाला पण दाद द्यायला हवी हं कशाला काय नाव देतील सांगता येत नाही! एक उदाहरण, मला वाटतं कल्याण किंवा कर्जत स्टेशन जवळ आहे. दोन रेल्वे लाइनींमध्ये असणा-या रुमालाएवढ्या जागेत "वृक्षारोपण" केलेले आणि त्याचे नाव काय असेल? "लुंबिनी वन"! पु. लं. चं चैत्य शौचकुप आठवुन मी ही "बुद्धं शरणं" म्हणते!
सोसायट्यांना आणि बंगल्यांना दिलेली नावं हे आणि एक प्रक्रण. साध्याभोळ्या घरांची नावं कशी "..कृपा" "..इच्छा" "..आशीर्वाद" ने संपणारी असतात. अशा घरी गेलात तर काकु तुम्हाला नि:संकोच फोडणीची पोळी खातोस ना म्हणुन विचारतात आणि तुम्ही ही खुश होवुन काकु दही आणि लोणचं पण द्या असं मांडी ठोकत म्हणता! तर काही बंगल्यांची नावं उच्च वगैरे अभिरुची दर्शवणारी असतात - गुलमोहोर - रजनीगंधा नाहीतर आपण कसे बहुप्रवासीत आहोत हे दाखवणारी अखनुर - चिनार - प्रवदा! ह्या सगळ्यात माझ्या डोक्यात राहिलंय ते काकाकुवा मॅन्शन! एकदम "मेन्शन नॉट’ आहे बुवा!
फ़्लॅट घेताना इतके निकष लावतो आपण की सोसायटीचं नाव हे तसं खालच्याच नंबरावर असतं पण परवा मी एका सोसायटीचं नाव "बाबुराव रेसिडेन्सी’ बघितलं आणि चोवीस एक कुटुंबं तरी तिथे रेसिडेन्ट होती! अपनेसे नही जमता भय्या! तुम्ही म्हणाल की नावात काय आहे! पण तसं नाही बरका! आईबापांनी सुड घ्यायला दिल्यासारखी ’कुंतल" सारखी अति तलम किंवा ’विश्वंभर" सारखी संस्कृतीरक्षक नावं ज्यांनी शाळेत डिफेंड केली आहेत ना, त्यांना विचारा नावात काय असंतं ते. आणखी एका कुलाब्यातल्या अपमार्केट "अपार्टमेंट कॉम्प्लेक्स" चं नाव आहे ’विधी’! कुठले ते विचारायचा फार मोह होतो अश्यावेळी! तशी सध्या इमारत नावं काहीही असतात, कात्रजजवळ बनणा-या एका स्कीमचं नाव "झीग्रत" आहे. "बाबिलोनियन संस्कृतीचे पुण्यावर आक्रमण" असे हेमंत व्याख्यानमालेत एक पुष्प गुंफायला हरकत नाही.
पुणेरी पाट्या आणि ट्रकसाहित्य तर नेटवर प्रसिद्ध आहेच. पण त्यातली चित्रकला थोडीशी उपेक्षित राहिली असे मला वाटते. "कूतरयापासून सावध" च्या शेजारी काढलेला प्राणी आदिवासी चित्रांच्या तोडीचा असतो! आणि नाकात बोट खुपसणा-या "वेलकम" बायका तर ट्रकसाहित्याची भारतीय संस्कृतीला देण आहे! शिवाय "घर कब आओगे" शेजारी पृष्ठभागातुन झाड उगवलेली पंजाबी कुडी हे प्रसिद्धीपथावरचे आगामी चित्र आहे! रसिकांनी नजर ठेवावी.
तर अश्या या पाट्या -- प्रसाधन गृहाच्या हात वाळवायच्या यंत्रावरच्या ’हे हात वाळवायसाठी आहे, रुमाल वाळवायला वापरु नये" या पाटीपासुन ते अशोकस्तंभावरच्या सत्यमेव जयते पर्यंत जळी-स्थळी पसरेलेल्या. कधी मनोरंजन करणा-या तर कधी अंतर्मुख. पण जिथे जाईन तिथे सोबत करणा-या मैत्रिणी!

Comments
"घर कब आओगे" शेजारी पृष्ठभागातुन झाड उगवलेली पंजाबी कुडी>> अन् हे निरिक्षण जबरदस्त :)))) बघायलाच पाहिजे
@गौरी - खरंय तुझं - आणखी मजा असते ती सरकारी तीन भाषांच्या पाटयांवर - तेच शब्द तीन लिप्यात लिहिलेले असतात.
@दीप - तुझ्या सर्व कॉमेंट्सबद्दल आभार! खुप बरं वाटतं की कोणीतरी आपलं लिहिलेलं वाचतंय! अरे बलिवर्द म्हणजे बैल म्हणुन बलिवर्द विक्रिडीत म्हणजे बैलाचा खेळ. लेखावरुन संदर्भ तुझ्या लक्षात येईलच!
@सहजच - इतर लिप्यातील पाट्यांबद्द्ल अगदी सहमत. माझेही बंगालात गेले की र - ट - फ लावणे चालते. अरेबिकपुढे हात टेकणे समजु शकते :) पण एक गम्मत सांगते उर्दु पाटी बघितली ना की मी उगाच तिच्यावरुन उजवीकडुन डावीकडे नजर फिरवते :) जणु कळणारच आहे.
तुझा लेख वाचून जाग्या झालेल्या काही हृद्य आठवणी ---
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक अगदी मोडकळीला आलेलं किराण्याचं दुकान होतं ज्याचं नाव होतं 'समाधान एम्पोरियम'!
पुण्याहून नारायणगावला काकांकडे जाताना चाकणजवळ एका बिल्डींगचं नाव दिसायचं 'सुदामाचे पोहे अपार्टमेंट'. ते वाचण्याकरता आम्हीही प्रत्येक प्रवासात खिडकीला नाक चिकटवून बसायचो.
घरांच्या नावामध्ये 'श्रमसाफल्य' विसरलीस! :D
aai ga!! kaay haslo mi hey vaakya vaachlyaavar..
talking about road signs.. the ones in uttaranchal or manali-leh roads.. put up by the BRO.. some of them are absolutely double-meaning.. sample this
"be gentle on my curves" :))
u do have comment moderation ON, right? :)
’उपरी उपस्कर’ ही माझ्याही अगदी लख्ख लक्षात राहिलेली पाटी आहे. ते ’overhead equipment'ला म्हणतात. साधारणपणे त्याच्यापुढे एक ‘कर्षण’ असतं (overhead traction equipment) साठी. असं वाटलं मला.