आपुलकीचा अंत

सुहृदांबरोबर हवाहवासा वाटणारा प्रवास कामानिमित्त झाला की 'अपरिहार्य' सदरात जातो नाही? असाच एक ढकलाढकली करुन शेवटी 'अपरिहार्य' झालेला प्रवास माझ्यावर कोसळला. मी सवयीने प्रवासकर्त्या संगीताला फोन लावला,

'अग संगीता, मला दहा दिवसात San Hose ला जावं लागणार आहे. तिकिटं बघतेस का? '

संगीताचं उत्तर 'तू आपल्या TRTS मध्ये टाक ना.'
'काय?'
'Travel Request Tracking System ग, मग मी processing सुरु करते. फॉर्म पाठवते तो भरुन अप्रुवल घे. You are cutting too short OK?'
मला माझा पहिला प्रवास आठवला. माझ्या बॉस नं मला सांगितलं
'There is an SOS situation out there. तू हँडल करु शकशील. उद्या VISA, Fly the day after. तिकिटाचं मी बघतो. दोन दिवसांनी मी बारा तास पलिकडे असणा-या जागी computerसमोर! बॉस चा फोन, 'बरोबर पोचलीस ना बयो? खायचं रहायचं ठीक आहे ना?' आणि आता हे!
तसं हेही अपरिहार्यच आहे. नीश असणारी कंपनी आता चांगलीच जगङ्वाळ झाली आहे. ही लिखापढी त्या वाढत्या पसा-यात आवश्यकच आहे हे मलाही पटतं पण खटकतं हे ही खरंच!
आमची पुणेरी संस्कृती जपण्याची जबाबदारी पुण्याच्या दुकानदारांवर आहे हे तर सर्वांना माहीत आहे.
नंबर घातलेल्या, झिजुन चाललेल्या लाकडी फळ्यांच्या दरवाजांच्या धुळकट दुकानात बसलेले साठे आणि कंपनी तुम्हाला हव्या त्या घाटाचा ड्बा, तेलपोळीचा पत्रा आणि कवड्या पुरवणार,
दुधाच्या दुकानातले शारंगपाणी 'वहिनी तुम्हाला गाडी चालवता आलीच पाहीजे' असं दटावणार, आणि चितळे दूध संपलं असलं तर कात्रजच प्रकृतीला चांगलं असं प्रतिपादन करणार,
घरी सामान पोच करायला आलेला 'प्रपंच'चा क्षीरसागर (धाकली पाती) आजोबांसाठी गुलकंद आणणार, यादीत नसला तरी. आणि अर्धा तास 'शेअरबाजारा'वर गप्पा मारणार,
भाजीवाल्या बाई 'काय ताई ब-याच दिसांनी? परवा तुमची लई सय आली बगा. येकदम ताजं शॅलड आणलं होतं पन तुमचा पत्याच नाय!' असा ड्वायल्वाग मारणार.
पुष्करणी भेळेच्या दुकानात काळे मातीचे रांजण पाण्याला असणार आणि साडेसातची कामगार सभा ऐकायची सक्ती पण!

पण पण पण

या सर्वांवर धावा बोलत आहेत ही नवीन येणारी दुकानं - रिलायन्स फ्रेश आणि बिग बजार आणि सुभिक्षा. सुभिक्षा! दमड्या टिच्चुन वस्तु विकत घ्यायच्या दुकानाचं नाव सुभिक्षा! मला उगाचचं खांद्याला चौपदरी झोळी अडकवुन " ॐ भवती ..." केल्यासारखं वाटेल!
मला माहित आहे तुम्ही म्हणताय, बाई जरा पॅरानॉईड आहे. कुठे रिलायन्स आणि कुठे मंडई, पण रिटेल शॉप्स नी 'मॉम ऍंड पॉप' स्टोअर्सना झोपवलं हे अमेरिकेतलं सत्य आहे हे तुम्ही जाणता. एकदा price wars आणि game of volume सुरु झाले की हे अटळ आहे. अत्ताच, रिलायन्स मधल्या भाज्यांचे दर कमी, वजन चोख आणि माल रसरशीत आहे.
माझाही जीव रमतो या दुकानात, खोटं कशाला बोलु? निवडीला वाव, वातानुकुलन आणि थोडं मिरवणं मलाही भावतं पण तिथल्या भावशुन्य डोळ्यांच्या, भाषेचा गंध नसलेल्या विक्रेत्या पोरी मला परक्या वाटतात. 'चवळी कुठे आहे?' हे इंग्रजीत विचारावं लागतं च्यामारी! शॉपिंगला येणा-या बायांची कार्टी, शॉपींग कार्ट ढकलताना माझ्या घोट्यांचा नेम धरतात आणि त्या भवान्या 'नो बेटा' करत अंगावरुन निघुन जातात. डब्बल च्यामारी! आणि या सगळ्यात पुणेरी संस्कृतीवर संक्रांत येते ती वेगळीच!
हीच प्रगती आहे, हीच उंचावणारी जीवनप्रत आहे आणि मला ती हवीहवीशी आहे. मान्य, सगळं मान्य! पण माझ्या मनाला सागरगोटे, लंगडा बाळकृष्ण, अन्नपुर्णा हे पण हवय! म्हणुन तर माझं धुवट मन ठसठसतं,

पुढे पुढे जाताना,
ही मनात कसली खंत?
गुलबकावलीच्या रानी
होतो आपुलकीचा अंत!

Comments

Monsieur K said…
>> 'चवळी कुठे आहे?' हे इंग्रजीत विचारावं लागतं च्यामारी! शॉपिंगला येणा-या बायांची कार्टी, शॉपींग कार्ट ढकलताना माझ्या घोट्यांचा नेम धरतात आणि त्या भवान्या 'नो बेटा' करत अंगावरुन निघुन जातात. डब्बल च्यामारी!

aai ga! hasun hasun poT dukhaaylaa laagla aahe.

travelling at short notice; mom n pop stores being replaced by foodworld, big bazaar and other such malls - khara aahe, saglach aparihaary asta!

well written! wish you a happy journey. :)

~Ketan
Anonymous said…
San Jose not San Hose :P
Anonymous said…
एकदम मस्त! जुनं ही हवं आहे आणि नवंही...आपल्या संस्कृतीत मनापासून जगणाऱ्या आपल्या सारख्या लोकांची मात्र मानसिक कुतरओढ होतेय....

अमित
yogesh said…
'चवळी कुठे आहे?' हे इंग्रजीत का विचारावं लागतं? त्यांनी तसा बोर्ड लावला आहे का, फक्त इंग्रजीत विचारलं तरच वस्तू मिळणार असा?


रिलायन्स फ्रेशचं माहिती नाही पण बिग बाजार मधल्या भाज्या ह्या शिळ्या आणि अगदी मरगळलेल्या वाटतात. भाजी खरेदीसाठी मंडईत मस्त टवटवीत आणि हिरव्यागार भाज्या मिळतात.

सुभिक्षा मात्र एकदम बकवास आहे. प्रिन्टेड पेक्षा फक्त ५० पैसे कमी भावात देऊन "खर्चाविरुद्ध मोर्चा" काढत आहेत. ;)
Vishal said…
मस्तच!
" 'चवळी कुठे आहे?' हे इंग्रजीत विचारावं लागतं च्यामारी!"
अगदी हेच. एकीकडे उंचावणारं राहणीमान हवंहवंसं वाटत असताना दुसरीकडे अशी किंमत मोजून त्याची खरंच गरज आहे का असं वाटत राहातं.
Manjiri said…
धन्यवाद मंडळी, केतन, अमित, योगेश, आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

San Jose! बरोबर, मराठीत विचार केला ना की असं होतं :(

योगेश, इंग्रजीत विचारा असा बोर्ड नाही पण काय आहे, आपल्याला चवळी हवी असते ना, मग whatever works right?

Thanks for the wishes Ketan!
Anand Sarolkar said…
Don't crib! Just enjoy the differences between the two! Every system has it's own pros and cons!
Manjiri said…
I would, if I could be sure that one is not extinguishing the other! :)
फार सुरेख लिहिलंय. ’हो, आपल्याला इथली थोडी मिरवेगिरी आवडते’ अशा प्रामणिकपणामुळे त्यातला हळवेपणा अंगावर येत नाही. मजा आली.
Manjiri said…
Thanks Meghana!
Nandan said…
lekh aavadla. aadheech vachala hota, pan comment lihin lihin mhanun rahoonach gela hota. Barech diwas kahi naveen lihile nahi?
Manjiri said…
Thanks Nandan!
Yes, I need to write now but real life is encroaching on the time :)
MI EK BOKA said…
एक दिन बैठा समुंदर तीर पर
सुन रहा था बुलबुले की मैं कथा ।
एक कागज की दिखी किश्ती तभी
थी छुपी जिसमें पहाडों की व्यथा ।
बोझ इतना धर, मुझे अचरज हुआ,
चल रही है किस तरह यह धार में ।
वह हंसी, बोली, चलाती चाह है
आदमी चलता नहीं संसार में ।
-अज्ञात

लिखाणाची आवड वेळ काढायला लावेल...:-)
Manjiri said…
लाख पते की बात कही आपने!
आणि खरंच सांगते, ही आवड नुसती ढुश्या देत असते. आता तुमच्या सारख्या रसिकांचे प्रोत्साहन मिळाल्यावर लिहावे लागेलच!
धन्यवाद!
आता थोडा भोचकपणा, आपले लिखाण वाचण्याचा योग कधी येणार?

-मंजिरी.
Anonymous said…
mukta chintan aavadal. :) Shevatachyaa olee kunaachya aahet? Mahanor ka?
Manjiri said…
Thanks!
Nahi. Shevatachya oli majhyach ahet. :)
deepanjali said…
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
Monsieur K said…
manjiri,
kuthe gaayab aahes?
baryaach divsannni tujha blog baghitlaa - tar kaahich update naahi :(
still in san jose?
Manjiri said…
धन्यवाद केतन !
नाही परत आले :) पण रोजची धकाधक वेळावर फार हक्क सांगते आहे.
पण लवकरच नक्की :)
Vrushali said…
Khup chhan!

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण