एकावर एक फुकट!

आज कामावरुन परत येत होते. सिग्नलपाशी थांबले होते. तर समोरच्या रिक्शाच्या पाठीमागे लिहिलेली जाहिरात वाचली -
"धबधबे विकत व भाड्याने मिळतील!!"

माझ्या डोक्यात संवादांची एक बाजु लिहुन तयार ...
"मी तळेकर बोलतोय, नायगराचे किती पडतील हो? नाही म्हणजे तुम्ही पाण्याच्या हिशोबाने तो भाड्याने देणार का रूंदीच्या? एक्सॅक्ट डायमेन्शन्स काय आहेत हो नायगराचे? काय म्हणता कॅनेडियन नायगाराचे वेगळे पैसे? ही म्हणजे शुद्ध लूट चालवलीय तुम्ही!"

"अहो धबधबे - एक गिरसप्पा पाठवुन द्या आज सांजच्याला. आं देउ की पैसे ते काय कुठे वाहुन चाललेत होय? काय चार्ज लावताय? काय मे महिन्यात एवढे? त्या गिरसप्याला पाणी तरी असतं का मे महिन्यात? पंचासुद्धा भिजत नाही हो! काय म्हणता? भिजतो? काय चावटपणा आहे हा? तुम्हाला धबधबे विकायचेत की नाहीत? बर जाउ द्या! तुमचं पण राहिलं आमचं पण! बरोबर भिलार फुकट देउन टाका!"

"अहो धबधबे, म्हणजे मला असं विचारायचं होतं, अहो किती जोरात बोलताय? काय म्हणता? फार आवाज आहे धबधब्यांचा? अस्सं. तर काय हो, पॅकेज ऑफर म्हणुन काश्मीर धबधब्याबरोबर मंदाकिनी पण देता का तुम्ही?"

माझी कल्पना आता वाहावत चालली आहे तेंव्हा आटते!

Comments

Deepak said…
वा! छानच लिहिलय!

".... पॅकेज ऑफर म्हणुन काश्मीर धबधब्याबरोबर मंदाकिनी पण देता का तुम्ही?" ... कल्पना आवडली..!
Yawning Dog said…
Ultimateeee...toofaaaaaaan
Mast lihile ahe khoop...hasun hasun murkundya valalya
सखी said…
:) :) mastt!!
Monsieur K said…
absolutely hilarious :)))
bindhast said…
sundar....
tumachi lihianyachi shaili avdali...
contact karayala mail id shodhtiy pan disalach nahi...mhatale comment taku...kam houn jail...
te mhantat na ek punekar nehmi dusarya tevadhyach khadoos punekarachya shodhat asto....
Manjiri said…
धन्यवाद मंडळी, तुम्हाला माझं कल्पनेचं कारंजं आवडलं हे वाचुन छान वाटलं!

बिनधास्त, नीता, माझ्या ब्लॉगला तु लिंक टाकलीस, त्याबद्द्ल आभार. असे कौतुक झाले की मूठभर मास चढ्ले. बाकी तुझ्या comments madhye लिहिले आहे.
Anonymous said…
It's anniversary time now... A month has gone back since you last wrote. I think you owe a blog to your readers now! Pls write...:)

- laniP

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक