गाना बनै ले हुनर से मियाँ!

वा! वा! हिमेशवा वा! म्हणजे बिलकुल लाजवाब! काय गाणं पेश केलंस तू!
आजपर्यंत मी समजत होतो की गाण्यांमध्ये शब्दांच्या अर्थांचे पापुद्रे तयार करणे फक्त मलाच जमते. चड्डी घातलेले फुल, चांद कटोरा घेउन चाललेली रात भिकारन सारख्या श्रोत्यांना धक्का देणा-या प्रतिमा, टाइम्स ऑफ इंडिया चं गाणं, किंवा चॉकसे चॉंदपर लिखना या सारखे नवीन प्रयोग करणं हि माझी मक्तेदारी होती. हां कहते हैं बांद्रा के उस पार किसी शक्स ने एक दो तीन कोशीश की थी। पर हर लफ्ज कोई लडकीको देखा तो लिखनेवाली नज्म तो नही होती। खैर वह कहानी फिर कभी...।
पण गड्या तू जे केलेस त्याला मिसाल नाही. एक शब्द - तनहाईयाँ - त्याला आपल्या सानुनासिक स्वरांचा असा झटका दिलास, तन-हैय्या! आणि तो शब्द म्हणजे अर्थांचे आणि अर्थांतरांचे जणु एक झुंबर झाला. गाणा-याचं तन म्हणजे बाह्य रूप म्हणजे जणु एखादा अडलेला बैल नव्हे सांड. त्याला हैय्या हैय्या करणारं जग. बैलानं कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रतिक्रीयेला न जुमानणं. त्यामुळे इतर कळप पुढे निघुन गेला. हैय्या हैय्या करणारा गुराखी ही निघुन गेला. या तनहाईत बैल एकटाच उरला ...
खरं सांगतो, एकसो सोला चाँद की राते जागलो तरी मला नाही जमणार ही किमया. तू तर माझ्या ही पुढे गेलास.
हे बलिवर्द-विक्रिडित, ही गुराखी प्रतिमासृष्टी एका असंबधित शब्दाला रेकुन - मेरा मतलब है, फेकुन तू तयार केलीस. गीत बुढे नही होते, उनके चेहरोंपे झुर्रीयाँ नही गिरती। हां जब उस तबेले से आवाज आयेगी तो कह देंगे कुछ गीत तो गीत ही नही होते। वो होते हैं हम्मागीत ऊफ़ महागीत।

Comments

Nandan said…
हा, हा. मस्त! दुर्दैवाने हे गाणे अजून ऐकण्यात आले नाही. कुठल्या चित्रपटातील आहे? बलिवर्द-विक्रिडित खासच. :)
Raina said…
masta lihila aahes. ekdum avadla.

aaiga- he kuThla gaana aahe te shodhavech laagel mala ata. :-))
Chyaa- ithe rahun tya himesh chi navin muktaphale lagech aikave lagat nahi he nashibach mhanaycha.
Manjiri said…
धन्यवाद, नंदन, रैना,
हिमेश म्हणजे एक ध्यान आहे!
तो आता एका नविन चित्रपटात काम करतोय, नायकाचं !!! आणि अर्थात गाणी त्याचीच. "आपका सुरुर" चित्रपटाचं नाव. आणि तनहाइया हे त्यातलं गाणं. It was so exasperating that I had to write this!

Thanks once again.
Chandya said…
मंजिरी - सहीच लिहिले आहेस !!
ह.ह.पु.वा !

बलिवर्द-विक्रीडित - काय शब्द आहे राव!

मला हे वाचून एकदम ते विडंबनकार गुज्जूभाई, ते मेरी मर्जी नावाचे गाणे म्हणणारे, त्यांची आठवण आली. त्यांनी छैया छैय्या गाण्याचे विडंबन केले होते

जिन-के सर दो सींग चार पाव
पावके पीछे पुछ्भी होगी

इ.इ.
परत एकदा ह.ह.पु.वा
ह्या रेशमियां नरपुंगवावर ब-याच लोकांनी लिहीले आहे.
हे पण त्यातलेच एक बघ:
http://greatbong.net/2006/11/16/him/
yogesh said…
:)
Prajakta said…
मंजिरी, माझ्या कवितेवरिल अभिप्रायाबद्दल धन्यवाद! मी नवीन लेख लावलाय- आवडल्यास कळव.
रेशमियाच्या गाण्यांचा त्रास इतक्या लोकांना होतो- पण तुझ्यासारख्या खुसखुशीत शैलीत सगळ्यांनाच ते वर्णन करता येत नाही :)
Manjiri said…
धन्यवाद प्राजक्ता!
baryach diwasat kahi lihila nahi tumhi? amhi vachak niyamit bheT dett asato, ghya ata kahi lihayacha manavar. :-)
Deep said…
तनहाईयाँ हे गाणं काही मी ऐकलेलं नाही :( हिमेसभाईचे णमस्ते लंडन पासून आम्ही फ्यान आहोत पण हे गाणं आजवर ऐकण्यात आलं नाही. (अन् आता ऐकणार नाही) बरं मज पामराला प्लीज जरा हे बलिवर्द-विक्रिडित काय प्रकरण काय आहे ते सांगशील का?

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण