गप्पा

अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली,
'चला या घरी'
'आई पाच मिंटं'
असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा!
`रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?'
असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा.
शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' ची जागा `स्टुप्पीड' ने घेतली आहे.
आमची आई आणि आमच्या हंसाबाई यांचं आठवड्याला एकतरी गप्पष्टक झडायचंच. आई खुर्ची नाहीतर पलंगावर आणि हंसाबाई भिंतीशी अंगाची जुडी करुन जमिनीवर बसलेल्या. आईने खास गोड चहा केलेला, आई घुटक्या घुटक्याने आणि मावशीबाई भुरक्या-भुरक्याने तो पित असायच्या. हंसाबाई म्हणजे आईच्या मीनाकुमारी होत्या - ट्रॅजडीक्वीन! त्यांच्या नुसत्या वाळत टाकायचे कपडे झटकण्याच्या स्टाईलवरुन आई ओळखायची की चहा गोड करायला हवा. त्यांच्या बोलण्याला एक कोळी-आगरी हेल होता. 'काय सांगु बाई आमच्या चंद्रीचं ना नशीबऽच फुटकं ....' म्हणजे तासाभराची निश्चिंती! आणि नंतर, 'हं! पुरुषांची जातच मेली नतद्रष्ट!' ही 'स्ट्रे बुलेट' कुठुन आली हे पेपर वाचत बसलेल्या बाबांना काही उमगायचं नाही.
गप्पा कोणाच्या रंगतील आणि कोणाच्या नाही ते काही सांगता येत नाही आनंद मधल्या गाण्यात गुलजार ने लिहिलंय तसं
कही तो ये दिल कभी मिल नही पाते
कहीपे निकल आये जनमोंके नाते
पण गप्पांचे फड खरे रंगतात ते रात्री. मनजुळणी झालेला ग्रुप असावा -- दोन दिवसाने भेटतो का दोन वर्षांनी याने ज्या नात्यांच्या पोतात काहीच फरक पडत नाही एव्हढी ज्याची वीण घट्ट असते ती मनजुळणी -- तर असा ग्रुप असावा. रात्र हलके हलके चढत जावी. सर्व मंडळींनी अपडेट द्यावा. अनुपस्थितांची माफक निंदा व्हावी. कॉमन टारगेट्स उदा विचित्र शेजारी अथवा खडुस सर यांची यथेच्छ निंदा व्हावी. वादविवाद व्हावेत. जेवणाचे हात वाळुन जावेत. दोन चारदा कॉफीची फर्माइश व्हावी. कुठुन तरी येणा-या रातराणीच्या वासासारख्या गप्पा लहरत जाव्यात.
रात्रीच्या गप्पांना एक वेगळा खुमार असतो. जगातला सगळा वेळ आपल्यापाशी असल्याचा निवांतपणा असतो, बाकीचं जग झोपल्याचा एकांत असतो. अंधाराने सगळ्यांना कुशीत घेतल्याने एक जवळीक असते. काही विषय धीटपणे चर्चिले जातात. काही गुपिते सांगितली जातात, काही अश्रु पुसले जातात. इतर गप्पा जर ठुम-या असल्या तर या गप्पा बडा ख्याल असतात, तब्येतीने एकायच्या, अनुभवायच्या ....
छायी रतिया कारी कारी

छोडके सारी दुनियादारी

सुनो अब बतिया हमारी ...

Comments

Y3 said…
वा: अप्रतीम..
parag said…
जिवाभावाच्या मित्रांच्याही गप्पा फाटकातच रंगतात. अर्थात्, "suppid", 'बावळट' हे त्यात नसते. :) आणि मित्रांच्या गप्पांतली मजा ही, की कधी घरात गेले तरी जो काय चहा, खाणे असेल ते संपवून लगेच मंडळी फाटकात. निरोपाच्या 'तासभर' गप्पा फाटकात असे नाही. अथपासून इतिपर्यन्त संध्याकाळच्या सगळ्याच गप्पा फाटकात. उन्हाळ्यातील रात्रीच्या गप्पांना मात्र गच्चीसारखी जागा नाही.
Manjiri said…
धन्यवाद y3.

Parag,
खरय तुमचं म्हणणं माझ्या नव-याच्या मित्रमंडळींची पण अशीच त-हा आहे. गप्पा फाटकात. सगळ्या.
घरी "उच्चारस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" होते असे वाटते का? :)
प्रमोद देव said…
साधाच विषय! पण अतिशय मार्मिक वर्णन! खुप आवडलं!
छान लिहीता हो तुम्ही. किती सहजसुंदर कथन आहे. मजा आली वाचायला.

शुभेच्छा.

---अगस्ती
Anonymous said…
kharach chan lihilay....

मनजुळणी झालेला ग्रुप असावा -- दोन दिवसाने भेटतो का दोन वर्षांनी याने ज्या नात्यांच्या पोतात काहीच फरक पडत नाही एव्हढी ज्याची वीण घट्ट असते ती मनजुळणी

he tar manapasun aawadal, nahve bhaval.. jehva aasa group aasato, tehva aayushya kahi vegalch aasat..
Anonymous said…
Sahaj - Sundar asacha mala ya paricchedacha varnan karava lagel. Sachin jasa rangat asla ki khelto, kumar gandharwanchi gani jashi sahaj rangat jat manala wed lavtat, tasach kahisa vachtana zala. Ya anubhawasathi dhanyavad!
Manjiri said…
Thanks!
raya said…
'ek coffee'
nimitta gappa

'ek gaan'
nimitta gappa

ajun kahi
nimitta gappa...

atta itkach...
malaa yaa gappa adawya alya...
Mrudula Tambe said…
Ani gharguti anaupacharik karyakramat pangatit jevan zalyavar haat sukeparyant honarya gappa visaralat ki kaay?
Aboli said…
'स्ट्रे बुलेट' he he he..

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण