अनुस्वाराच्या निमित्ताने
मिलिंद च्या 'अनुस्वार' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले. ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच. पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती.
पण त्या आधी -- मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या.
१. माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही. तो अनुनासिक आहे. ओठाचा वापर न करता त्याचा उच्चार करता येतो.
२. हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे.
३. अनुस्वाराप्रमाणे 'र' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत. आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात. जसे क्र आणि कृ - उ उलटा फिरवलेला. शिवय तोर्यात असे न लिहिता तो-यात असे लिहीलि जाते. आणि जिथे कंपित मधला अर्धा म पुढ्च्या क वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा र मागच्या व वर.
४. माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे. म्हणुन मराठीत दंड न वापरता . पूर्णविराम (Fullstop चे भाषांतर?) वापरला जातो.
५. मराठी बाराखडीचा भाग असलेले कॅ आणि कॉ हे उच्चार आपल्याला कधीही मराठी शब्द लिहीताना लागतच नाहीत. ते फक्त इंग्रजी भाषेतले शब्द लिहायला उपयोगी पडतात. जसे कॅप्टन इ.
६. आपल्या बाराखडीत -ह्स्व आणि दीर्घ उ आणि इ आहेत पण ओ आणि ए नाहीत
७. आणि जोडाक्षरासाठी एक चिन्ह ही आणखी एक खासियत ... श्री, क्ष, ज्ञ ... आणि ज्ञ ची आणखी एक गंमत, तो मराठीत द्न्य आहे तर हिंदीत ग्य!
असो! या गमती कदाचित तुम्हाला फार obvious वाटत असतील पण मला मजा वाटते.

Comments
छान लिहिलाय लेख. एकतर खूप विचार करून लिहिला असावा किंवा तुमचं ऑब्झर्वेशन खूप keen आहे!
पण आख्ख्या भारतात केवळ मराठीने "कॅट", "डॉग" मधल्या कॅ आणि डॉ ला दाखवण्यासाठी नवे सिम्बॉल विकसित केले ह्याचा मला रास्त अभिमान वाटतो!
Language should be "alive"! It should be open for a change and all accepting and all-encompassing. Open for newer cultures, newer words, newer forms and newer pronunciations!
तेव्हाच आपण टिकून राहू आणि आपली भाषा देखिल!
हिमांशु (की हिमान्शु)? :-)
तुमचं म्हणणं बरोबर आहे भाषेने काळाबरोबर बदलायला हवं.
इंग्रजी हे या तत्वाचं उत्तम उदाहरण आहे. किती ठिकाणचे शब्द उचलुन त्यांना अत्मसात करुन ही भाषासुंदरी कशी भारदस्त झाली आहे!
-मंजिरी