शब्दकेली
मराठीचे एवढे समॄद्ध शब्दभंडार असुनही माझ्या मते काही भावना आणि व्यक्तिविशेष शब्दापासुन वंचित आहेत. किंबहुना त्यांना इतर भाषेतही वाली नाही. (पण कुणी सांगावे एस्किमो भाषेत बर्फ़ाला २१ शब्द आहेत म्हणे!). परंतु मराठीतली ही त्रुटी भरुन काढण्यासाठी, त्यांना नावे ठॆवण्याचा खेळ म्हणजॆ शब्दकेली. तुम्हाला वाटलेच तर 'शब्दकाला' म्हणा हवं तर...
मुलाहिजा फर्माईये ...
दांबई - एखादे रटाळ व्याख्यान किंवा संभाषण ऐकताना आलेली जांभई दाबायचा केलेला प्रयत्न आणि तदनुषंगाने होणारी जबड्याची हालचाल.
यमकविता - आपल्याला कविता होते या गॊड गैरसमजापायी नकवींनी केलेली यमकजुळवणी.
नाडपट - पायजम्याच्या नाडीचे एक टॊक नेफ्यात लोप पावल्यावर बोटाने ती नाडी बाहेर काढायची केलेली यडपट खटपट. ( जाता जाता..'कागदी होडीच्या शीडवर बसलेल्या पक्ष्याच्या चड्डीची नाडी' नामक लेखनकार्य मराठीत काही वर्षांपुर्वी झाले आहे त्याची अधिक माहिती आहे का कुणाला?)
हौसाष्टक - मुहुर्ताची वेळ व्हायची आहे, भटजींनी आपला गळा साफ करुन घेतला आहे. अशा वेळी मुलीच्या मावस आजीनी रचलेली आणि मुलीची आत्या, मावशीची नणंद आणि मानलेली चुलत आजी यांनी किन-या, थरथरत्या आवाजात म्हटलेली मंगलाष्टके. ह्या रचनेत, समस्त परिवाराची नावे जुळवणे, वधु वर यांच्या नावावर कोट्या करणे यांची मनोहर उदाहरणे आढळतात.
कॊटीबासकर - उच्चारलेल्या प्रत्येक शब्दावर कोटी (पक्षी पी. जे) करण्याचा मोह अजिबात न आवरू शकणारा मनुष्य. बहुतांशी त्याच्या मित्रवर्तुळात पी. जे, त्याच्या आद्याक्षराने ऒळखले जातात. उदा एम. जे.
ताटलाग - भात, उपमा, पोहे पसरट ताटलीत घेउन खाताना, पदार्थाच्या शेवटच्या घासाचा चमच्याने केलेला पाठलाग.
हिंक - येउ घातलेली पण हुलकावण्या देणारी शिंक.
मोटमिंगरु - पेकाटात अजिबात दम नसताना उगीच मोटरसायकलचे 'फटफटी' हे नाव सार्थ करणारा आवाज, चालवतानाची घुसखोरी, च्या जोरावर 'शाईन' मारण्याचा प्रयत्न करणारं बुटकं माणुसरुपी शिंगरु.
फुकटाळी - डास मारण्याच्या प्रयत्नात फुकट वाजवलेली टाळी
रेलहर - रेल्वे प्रवासात गाडी कोणत्याही स्टेशनावर, कधीही आणि कितीही कमी वेळासाठी थांबली की तमाम पुरुषांना येणारी गाडीतुन खाली उतरायची हुक्की.
रेळजी / रेलजी - रेलहरीमुळे, उतरलेल्या आणि गाडी सुरु झाल्यावर, परत न दिसलेल्या पुरुषांबद्द्ल, 'राहिले वाटतं खाली' अशी क्षणभर वाटलेली (पुरुषांच्या मते निराधार) काळजी.
कानसेंट्रेशन - अतिशय एकाग्रतेने कान कोरणा-या माणसाच्या चेहे-यावरचे अजागळ भाव.
हा शब्दकोश करण्याचे काम वेगात सुरु आहे, मराठी भाषेचे भवितव्य केवळ आमच्यावर अवलंबुन आहे ह्याची जाण आहे आम्हाला.

Comments
सुंदर शब्दकोष आहे. हे कार्य जोरात सुरू ठेवा, :) वाचतांना मजा आली.
"हौसाष्ट्क, दांबई ,कान्सेंट्रेशन" खासच
काही दिवसांपूर्वी मी या लग्नातल्या मंगलाष्टकांच्या स्पर्धेवर थोड खरडल होत... तेव्हा "हौसाष्टक" हे समर्पक शिर्षक सापडायला हव होत..:)
या पुढे तुमचा शब्दकोश refer करत राहिन.