कोणी गोविंद घ्या कॊणी गोपाळ घ्या

कळवण्यास आनंद होतो की या संकेतस्थळाला आपल्या अभिव्यक्तीला साजेसे नाव मिळते आहे.
याच्या पुर्वीच्या अवतारात, "The tree that shelters two souls" चा उद्देश आत दडलेल्या उर्मीना वाट देणे हा होता. वाटचाल चालु असताना, मराठीत नोंदी करण्याची शक्यता आणि मराठी वेबलॉग्सच्या श्रुंखलेचा रसिक आणि 'समछंदी' मेळावा भेटला. त्या योगे, गेली वीस एक वर्षे मिटून ठेवलेली वही परत उघडली. लिहावे असे वाटु लागले.
या नवीन बहराचे नवीन नाव ...
मोगरा फुलला

Comments

अरे वा! फुले वेचिता बहरू रचनांसी येऊ द्या! :)
Sumedha said…
नाव काहीही असलं तरी तुझं लिखाण खूप आवडते!

या नव्या स्वरूपाला शुभेच्छा!
Manjiri said…
धन्यवाद शैलेश, सुमेधा,
अदिती said…
मंजिरीताई,
तुम्ही खूप छान लिहिता हो... मला खूप आवडले तुमचे लेखन. अगदी शाळेच्या समृद्ध दिवसांची आठवण झाली. खूप मस्त वाटलं. अगदी भरून आलं...
--अदिती
Manjiri said…
धन्यवाद अदिती!

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक