बेस्टं

परवाच लंपनचं 'शारदा संगीत' वचुन सोडलं की हो! एकदम बेस्टं बघा. एकदम दोन्ही हाताचे आंगठे आणि बोटं चिकटवुन बेस्टं
हे पुस्तक म्हणजे, विद्या यावी म्हणुन पुस्तकाच्या पानात कुंकु लावलेलं मोराचं पीस ठेवलेलं असतना? तसं वाटलं. मोराच्या पीसासारखं दिमाखदार आणि विद्या येणार या विश्वासासारखं 'निरागस' की काय ते असतं तसं दोन्ही एकदम. असा मॅड सारखा विचार डोक्यात आला.

Comments

Nandan said…
तंतोतंत. एक हजार सातशे तीन वेळा वाचूनही हे पुस्तक मॅडसारखं आवडत राहतं बघा. तुम्ही वनवास, पंखा आणि झुंबर वाचली का हो? वाचून सोडा एकदा आणि त्यावरही लिहा. वाचायला नक्कीच आवडेल.
Manjiri said…
जरुर नंदन. अत्ताच पंखा घेउन आलेय वाचनालयातुन.
parag said…
शारदा संगीत अप्रतिम आहे. शेवटची गोष्ट वाचताना पापण्यांच्या कडा कधी ओलावतात ते समजत नाही. अतिशय तरलपणे मांडतात संत. झुंबर मला तितकेसे नाही भावले.
Manjiri said…
पराग,

खरं आहे तुमचं म्हणणं, झुंबर बद्दल बोलण्याचा हक्क मी सध्या राखुन ठेवते, a sort of a rainchek. परत वाचल्यावर बोलु.

आभार,
Manjiri said…
This comment has been removed by a blog administrator.
Manjiri said…
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said…
have you seen the fifth book written by Prakash Sant? Has it been published at all?
Suahant said…
लंपनची सर्व पुस्तके अतिशय वाचनीय आहेत. झुंबर मधील शेवताचो स्पर्श हे गोष्ट खूप छान आहे.
अजून खूप लिहा
You are a good writer
Manjiri said…
Thanks Sushant!

Popular posts from this blog

तुमचा स्कोर किती आहे?

जन हित मे जारी

वाळवण