तरुणाई एक निरीक्षण

पुण्याच्या फ़र्ग्युसन रोडवर तरुणाईचा सागर नेहमी उचंबळत असतो. रोस डे, फ़्रेंड डे वगैरेला तर ह्या सागराला उधाण येते.
परवा परवा पर्यंत या तरुणाईचा बालेकिल्ला होता, वैशाली. SPDP, cold coffeeआणि गप्पा छाटण्याचे "एकमेव" ठिकाण, इतरत्र कोठेहि शाखा नसलेले. पण सध्या मात्र या तरुण गटात फ़ूट पडली आहे. "अभी तो मैं जवान हूं" असे म्हणणारे Not so young अश्क्या आणि मध्या अजून वैशलीत भेटतील, पण नची आणि शची मात्र Cafe coffee dayत पडीक असतात. नुसते टाईम पास करायला अलेले टपोरी CCDच्या बाहेर घुटमळत आहेत आणि आहेरे गट - ज्याला य़प्पी म्हणतात, (म्हणजे बापकमाई ऐवजी आपकमईवर माज करणारा), बरिस्तात ब्लॅक कोफ़ी घेत असतो...
जाता जाता: जाणकार असे म्हणतात की बरिस्ताची hot coffeeआणि desertsतर CCDची cold coffeeचांगली असते. तुमचे मत जरूर नोंदवा

Comments

Amit Awekar said…
parphekTT observation.
Dk said…
CCDची cold coffeeचांगली असते** :)))



**in a good company!
अण्णाच्या टपरिवरचा चहा जास्त चांगला असतो !!
:D

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक