Posts

Showing posts from December, 2016

झुलता झोका जाओ आकाशाला ...

Image
राई - आमचं इटुकलं स्वप्न. थेंबभर पाणी, मुठभर माती आणि डोळयात मावेल तेव्हढं आकाश एकत्र करुन बंधलेला इमला. इथे आमचे नानाविध प्रयोग सुरु असतात. पीक पिकवायचे. मग पीक आले की ते साठवायचे आणि संपवायचे. खतं आणि रोपांचे, birdbath ते Avocado उगवण्यापर्यंत सगळे.  त्यापैकी माझ्या डोक्यात ब-याच दिवसापासुन असलेला कीडा म्हणजे ताड-माड उंच असणा-या उडळीच्या झाडाला एक  पाटीचा झोपाळा बांधण्याचा. ब-याच दिवसापासुन अभयला भुणभुण लावली होती. (अभय - माझा नवरा - practical - down to earth - असण्याची सगळी जबाबदारी त्याच्याकडे सुपुर्त आहे, म्हणजे मी दिवास्वप्ने बघायला मोकळी). त्याने झोपाळा बांधण्य़ातल्या सर्व अडचणी दाखवुन दिल्या तरी आमच्या दोघांच्या डोक्यातुन ती कल्पना काही जाईना.  शेवटी ह्या आठवड्यात हा कोढाणा सर करायचा असा निश्चय करुन राईकडे कुच केली.  झोपाळ्याची fabricated ऐसपैस पाटी, आणि दोरखंड घेउन.  हे उपर्निदेशित उडळीचे झाड, झाड कसले वृक्षच तो, चांगलाच उंच आहे. पहिली फांदीच मुळी 20 फुटावर. कोणीही झाडावर चढणारे मिळाले नाही.  मग प्लान बी अमलात आला.    दगडाला प्...

सुलभा देशपांडे

मुंबईच्या वेशीवर असलेलं आमचं गोरेगाव छान टुमदार होतं. आत्तासारखं टॉवरमय आणि कॉर्पोरेट नव्हतं झालं अजुन. पूर्वेला आरे कॉलनीची हिरवाई आणि छायागीतच्या जुन्या गाण्यात दिसणारं पिकनिक पॉइंट अजुन डौलात होते. रोजचं शाळा ते घर पायी होतं. मुंबईला जायचं ते सठी सहामाही मॉन्सुनबरोबर उसळणाऱ्या नरिमन पॉइंटच्या पर्वतप्राय लाटात भिजायला नाहीतर 253 नंबरच्या डबलडेकरने जुहुला जायला. हो आणीक एक चैनीचा कार्यक्रम असायचा, पार्ल्याला दीनानाथला जाउन बालनाट्य बघण्याचा. हा एक सोहळा असायचा, त्या साठ ी तिकीट काढुन आणणे, बरोबर आजुबाजुच्या चार पोरींना घेउन जाणे, सगळ्या गॅंगला बस - लोकलने सुखरुप पार्ल्याला नेणे आणणे, हे सगळे आमचे आई बाबा हौसेने करायचे. पार्ले ईस्टला उतरुन भाजी मार्केट पार केलं की दीनानाथ. रुबाबदार नाट्यगृह. गुबगुबीत खुर्च्या, मखमली पडदे, सगलं कसं राजबिंडं, त्या मनाने बालगंधर्व, यशवंतराव गरीब वाटतात मला. सोय वाटतात, चैन नाही वाटत. वयाचा फरक असेल कदाचित. तिथे सर्व खुर्च्यांच्या रांगात बाल प्रेक्षकांची किलबिल आणि लगबग चाललेली असायची. नाट्यगृहालाही मजा वाटत असेल. इतर वेळी ठेवणीतल्या साड्या- ग...