हाक

'व्यवस्थापकीय' पदवी मिळवुन व्यावसायिक जगात वावरणा-यांची एक जमात असते. म्हणजे 'एम बी ए' माणसं हो! ते एक विशिष्ठ परिभाषा वापरतात आणि ती सतत बदलतात. काही दिवसापुर्वी 'Facilitatorअसेल तर आता तो 'Enabler' झालेला असतो. तर अश्या मंडळींची तुमच्याशी बोलण्याची ढब असते. प्रत्येक वाक्यच्या सुरवातीला ते तुम्हाला संबोधतात. 'मंजिरी Let us first aim for the low lying fruit मंजिरी,and then we can see what is the common synergy मंजिरी' जणु काही संभाषणात इतक्यांदा हाक मारली नाही तर तो किंवा मी माझं नाव विसरुन जाउ अशी त्याला भिती वाटत असावी!
ही हाक, संबोधन मोठी मजेशीर गोष्ट आहे. कोणी, कोणत्या नावाने किंवा नाव न घेता हाक मारली अश्या गोष्टी काय काय सुचवुन जातात नाही? मग ते `अहो! ऐकलं का?' असो, नटसम्राटांचं `सरकार' असो की नातीनं आजोबांना बोलावलेलं `ए विनायक आबा' असो. प्रत्येकाची वेगळी खुमारी.
तशी बाळाची पहिली ट्यॅंह्यॅं - ही सुद्धा हाकच नाही का, 'अरे कोणी आहे का इकडे?' पासुन 'मला भुक लागलीय आणि तुम्ही लक्ष पण देत नाही!' सगळी बाळं आपल्या आईला आपल्या हाकेला ओ द्यायला अगदी `कंडीशन' करुन टाकतात. मला आठवतं माझी मुलगी तान्ही होती तेंव्हा, कोणत्याही बाळाच्या रडण्याचा आवाज आला की माझी डावी मांडी हलायला लागायची बाळाला थोपटायला घेतल्यासारखी! सोसायटीत खालुन 'आई" अशी हाक आली की सगळ्याजणी खिडकीशी जमा होतात की नाही?
कोणत्या नावाने हाक मारली जाते आणि आवाजाचा पोत काय आहे यावरुनच पुढच्या संभाषणाचं सुतोवाच असतं. 'नंदु ग!' म्हणजे ..'ये ग राणी खाउ देउ का?' आणि 'नं - दि - नी' म्हणजे `मुकाट्याने अभ्यासाला बसतेस का घालु दोन धपाटे?' काय श्रुतीचित्र उभं राहिलं की नाही कानात?
जाणकार नव-यांना म्हणे, `अहो ऐकलं का' किंवा 'मी काय म्हणते,' एवढ्यावरुनच आपल्या खिश्याला पडणा-या भोकाच्या आकारमानाचा बरोबर अंदाज येतो. अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते.
काही हाका बिन नावाच्या असतात. `विशेष' खिडकीखालुन रस्त्याने सायकल ने जाताना घातलेली शीळ काय आणि उन्हाळ्यात आमराईतुन येणारी कोकीळाची शीळ काय भाव एकच नाही का?
त्याही पलीकडे काही हाका बिन-आवाजी असतात. थेट आत्म्याला भिडणा-या. काही वेडे, सर्व संकेत, सर्व शिष्टसंमत शहाणपण झुगारुन देउन या हाकांना ओ देतात आणि इतिहास घडतो.
हा लेखन खटाटोप तरी काय आतल्या अस्वस्थ उर्मींना दिलेली ओ च असते.
आणि हो तुमच्या हाकांचीही आम्ही वाट बघतो बरं, कधी कधी आळशीपणामुळे ओ द्यायला उशीर होतो खरा पण ...
पुकारो हमे नाम लेकर पुकारो,
हमे तुमसे अपनी खबर मिल रही है।

Comments

Sneha Kulkarni said…
Ekdum mast lihila aahe tumhi!! Tumchya hakela "o" deun comment takli lagech!! :D
Manjiri said…
Thanks Sneha!
Anonymous said…
"'नंदु ग!' म्हणजे ..'ये ग राणी खाउ देउ का?' आणि 'नं - दि - नी' म्हणजे `मुकाट्याने अभ्यासाला बसतेस का घालु दोन धपाटे?' काय श्रुतीचित्र उभं राहिलं की नाही कानात? "

मस्त वर्णन केले आहे 'मंजिरी'. तुमच्याकडून आशाच अजून काही लेखांची अपेक्षा करतो 'मंजिरी'.
छान लिहीलंय! :)

इथली माझी एक कलीग एरवी ३ वर्षांच्या तिच्या मुलाला लाडाने 'जॉश' म्हणून हाक मारते, पण चिडली की 'Mr. Proctor' अशी हाक असते... मग he knows he's in trouble! :)
Manjiri said…
'कृष्णाकाठ',

जरुर, :) पण तुमचं हाक मारायचं नाव काय?

प्रिया,
अगदी खरंय, मला अशी सवय लागत होती चिडलं की आडनावाने मुलीला हाक मारायची पण सास-यांनी मोडता घातला, म्हणाले तु मलाच ओरडतेयस असं वाटुन मी दचकतो! :)
Anand Sarolkar said…
Too good! Such a simple topic but you have made it absolutely beautiful...te mhnatat na...Char chand laga diya...agdi tasa:)
Anonymous said…
लोक मला 'राहुल' या नवाने हाक मारतात.
फार छान लिहिलं आहे. आपली सहज-सुंदर शैली आवडली.
Monsieur K said…
mast lihila aahe ekdam :)
Manjiri said…
धन्यवाद, आनंद, राहुल, खोडसाळ, मॉस्य के!
ArSh said…
TP karayachya mood madhe asale mhanaje mi majhya mulala ADnAvAne hAk mArate!

bAki tumachya likhANAchI wAT baghat asate mI. rojachyA, nehemichyA goShTInchA ek wegaLAch perspective asato tumchyA likhANAt!
Manjiri said…
Thanks Arsh!

Majhya angavar ekdam moothbhar maas chadhala :) thanks a lot!
Anonymous said…
Too good Manjiri!

Sadhya sadhya goshtincha dekhil tumhi kiti barkaine vichar karta...tumchi udaharne dekhil rojachyatilach ahet..

Keep writing..
Nandan said…
wa! chhan zaalay lekh. aavaDalaa.
Manjiri said…
Thanks!
Anonymous said…
खुप छान लिहीलेस. मी पण वाट बघत असतो काय लिहीणार आहेस त्याची. काम चालू द्या..जोरात.

-रणजीत
Manjiri said…
Thanks Ranjeet!
सुशांत भागवत said…
अहो मंजिरी
तुमची लिहायची पद्धत खूप साधी, सरळ आणि सुबोध आहे.
वाचताना डोळ्यांसमोर शब्दचित्र उभे करता तेही सुरेख छोटेसे वर्णन करून !!!
अचानकच तुमच्या ह्या ब्लॉगवर अडखळलो, पण वाचून खूपच आनंद झाला :)
हे वाचून चेहऱ्यावर स्मितहास्य आले
तर मंजिरी पुन्हा भेटेपर्यंत खूप खूप धन्यवाद
Manjiri said…
धन्यवाद सुशांत!
aboli said…
अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते >>

अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची 'तप'श्चर्या लागते... kharach mhanaycha :)
aboli said…
अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते>>

अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची 'तप'श्चर्या लागते..
kharach mhanaycha :)

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १