सांग सांग भोलानाथ!

आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या बाहेर का असते?
सौंदर्यप्रसाधने विकणा-या पोरी नेहमी आगाऊ आणि गि-हाइकांकडे पुर्ण दुर्लक्ष करणा-या का असतात?
शेजारच्या बाईच्या हातातली साडी आपल्याला कायम का आवडते?
आपल्याला अवडलेल्या चदरीचा, अभ्र्याचा, टॉवेलचा एकच पीस का शिल्लक असतो?

Comments

Monsieur K said…
मंजिरी,
भोलानाथ एक वेळेस पाउस कधी पडेल सांगु शकेल, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याला देखिल कदाचीत माहित नसतील. :)))

तुम्ही माझ्या ब्लॉग वर दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! तुमचा ब्लॉग आधी वाचला नव्हता, मला 'गप्पा' आणि 'शब्दकोश' विशेष आवडले.

लॉ कॉलेज रोड वरिल बुचाच्या झाडांवरुन एकदम घराची आठवण झाली (मी भांडारकर रोड वर रहात असल्यामुळे) - आमच्या बिल्डिंगच्या कम्पाउंड मध्ये देखिल बुचाचे झाड आहे, त्याची आठवण झाली.

तुम्ही असंच छान लिहित रहा, आणि हा मोगरा फुलु द्या. :)
Dk said…
तुझ्या पहिल्या(च) प्रश्नाच उत्तर आहे माझ्याकडे. आपल्याला आवडलेली साडी नेहमी आपण ठरवलेल्या रेंजच्या >>> अगं हा जो काही रेंज प्रकार असतो ना तो लक्षात घ्यायचाच नसतो. ( फक्त वर्षातून एकदाच! कारण दिवाळीही एकदाच येते) अर्थात खिसा ढिला कितीही सोडला ना तरी आपल्याला आवडलेली साडी नेसणार्‍याला आवडतेच असं नाही क्या करें अंदाज अपना अपना

बाकीची खरेदी मीच करतो अन् तेंव्हा शेजारी अजिबात बघत नाही

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण