पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यानं नजिकच्या काळात कात टाकली आहे. चतुश्रुंगी जवळ निर्माण होत असलेल्या संगणकीय संकुलात टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. त्या इमारती नव्या नव्या भरजरी दुकानांनी झगमगु लागल्या आहेत. आघाडीची व्यापारी संकुले, रेस्तरॉं आणि पुण्यातले सगळ्यात मोठे क्रॉसवर्ड - पुस्तके विकत घेण्याचा अनुभव भरजरी करणारी दुकानांची साखळी. अमेरिकन धर्तीवर, पुस्तके चाळायला, वाटल्यास जेठा मारुन वाचायला वाव देणारी. त्या मुळे त्या दुकानाला भेट देणे 'मष्ट' झाले. दुकान प्रशस्त होते पण एकंदर 'मझा' नव्हता येत. एकतर जागा भरायची म्हणुन लांबलांब मांडलेले शेल्फ्स. ते शेल्फ्स भरायचे म्हणुन ठेवलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच पाच प्रती. पुस्तकंही सगळी फॅशनेबल आणि अधिक खपाची. आणि कवितांच्या पुस्तकांचा दीड खण. आणि त्या खणातली निम्मी पुस्तकं जीएंच्या भाषेत संक्रातीच्या भेटकार्डावर लायकीच्या कवितांची. हे मी इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगते आहे हं मराठी पुस्तकांची आशाच नव्हती. तर अशी नाक मुरडत मी त्या पुस्तकांच्या सुगंधी गर्दीत भटकत होते. ही सुगंधी - तथाकथित बुद्धीजीवी - जमात तशी मजेशीर. पण त्याबाबत