पुस्तकनिष्ठांची मांदियाळी - माझी खेळी

प्रियभाषिणी, मला खो दिल्याबद्द्ल आभार. वाचन ही जिवनावश्यक गरज असल्याने पुस्तकांबद्द्ल लिहीणॆ म्हणजॆ पर्वणीच.
नंदननॆ चपखल शीर्षकासकट सुरु केलेला हा खेळ खेळायला आणि मुख्य इतराच्या खेळ्या वाचायला खूप मजा यॆतॆ आहे. धन्यवाद नंदन!
आता माझी खॆळी ..

१. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
झेन गार्डन - मिलींद बोकील

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहीती
झेन गार्डन हा मिलींद बोकील चा कथा संग्रह मला आवडला पण शाळा एवढा नाही.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके
स्वामी - रणजीत दॆसाई
जावॆ त्यांच्या देशा - पु.ल. देशपांडे
जी. एं. ची पत्रे - श्री. पु. भागवत आणि सुनिता देशपांडेंना लिहिलेली
एक एक पान गळावया - गौरी देशपांडे
मितवा - ग्रेस

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
* - मारुती चितमपल्ली
* - जयवंत दळवी
समग्र कविता - मर्ढेकर
किमया - माधव आचवल
जी. ए. यांची माधव आचवल यांना लिहिलॆली पत्रे (माझ्या माहितीप्रमाणे ती प्रसिद्ध झालेली नाहीत पण मला वाचायला आवडतील ती!)

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
गौरीचॆ एक एक पान गळावया ही माझी खुप आवडती कथा आहे. गौरीचा लेखनाचा घाट खुप वेगळा आहे. तुम्हाला त्याची सवय व्हायला लागतॆ. तिच्या गोष्टीतील विचारप्रक्रियॆत सक्रिय सहभाग घ्यावा लागतॊ. मर्ढॆकरांच्या कवितेपाशी येउन संपणारी ही कथा वेगवेगळ्या नात्यांबद्दल बरेच काही सांगते. आईबाप आणि मुलांच्या एकमॆकांकडुन असणा-या ठरीव साच्यातल्या अपेक्षा, कुठ्ल्याच साच्यात न बसणारॆ फ़रहद बरोबर चे नाते. या सर्वांना असणारी राधा माधव च्या बरॊबरीच्या प्रेमाची पार्श्वभुमी. अप्रतीम.

माझा खॊ ...

पराग (Start!)
चक्रपाणि (खूप काही थोडक्यातच)
सोनाली (लिहायचं म्हणुन)

Comments

Vishal Khapre said…
खोखोचा खेळ लहानपणी खुप खेळलो. पण हा पुस्तकांचा खो नवीन बरा.
सगळी पुस्तके मनाला भावणारी, मन रमवणारी. तुमचे विचार ऐकून बरे वाटले. अमेरीकेत कमी जाणवते ती मराठी पुस्तकांची. कोणी भारतातून आला की आणतो.. वाचले की कसे बरे वाटते. तुम्ही सांगितलेली घेईन आणि वाचेन पुढच्यावेळी.

तुमचा ब्लॉग बरेचदा वाचतो.

लोभ असावा,

विशाल खापरे.
Shantanu said…
गौरीचा लेखनाचा घाट खुप वेगळा आहे. तुम्हाला त्याची सवय व्हायला लागतॆ. तिच्या गोष्टीतील विचारप्रक्रियॆत सक्रिय सहभाग घ्यावा लागतॊ.

Ekdam zakaas vishleshan....
Ani ho mala 'Ahe he ase ahe' jast avadate.... :)
Manjiri said…
वसंत, विशाल, शंतनु,
धन्यवाद,

अशी छान दाद मिळाली की लिहायला हुरुप येतो!.
Parag said…
http://esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Saptarang&category=Saptarang_Prasangik

Third volume of G.As letters has been published and I believe, letters to Madhav Gadkari have been included
Parag said…
I mean Madhav Achaval, not Gadkari :)
Manjiri said…
Thanks Parag for the info. I had read about the 3rd book coming out but was not sure about the Madhav Achaval letters. Thanks again I will def. try to get it.

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

हाक

वर्गीकरण