हे वाचले ...
पद्मगंधा दिवाळी अंकात मारुती चितमपल्लींची सुरेख दीर्घ मुलाखत वाचली. त्यांनी सांगितलेल्या अरण्यकथा वाचुन कुतुहल वाढलॆ आहे. लवकरच त्यांचे आत्मचरीत्र वाचायला हवे. पद्मगंधा ही वाचनीय होता. रवीमुकुल यांना धन्यवाद द्यायला हवेत. इरावतींचे गंगाजळ परत वाचले. इरावती, दुर्गाबाई, गौरी, जी.ए, हे सर्व माझे नित्य पाठाचे लेखक आहेत. त्यांचे लेखनाच्या मधुन मधुन आवृत्या करायच्या. कारण काही काळानॆ त्यांच्या लेखनातलॆ काही पदर हरवतात माझ्याकडुन. आणि काही वेळा मी अजुन थॊडी शहाणी(!) झालॆ असल्याने नवीन पदर सापडतात. या वेळी प्रकर्षानॆ जाणवलॆ ते त्यांचॆ म्हातारपणावरचॆ विचार. त्यांच्या तार्कीक विचारांनी अंगावर एकदम काटा आला. मिलींद बॊकील यांची शाळा आणि झेन गार्डन. शाळा इतकी वास्तवाला धरुन होती की ते पुस्तक वाटेच ना मला. माझ्याच वर्गातल्या एखाद्या बावळट मुलाने ( शाळेत सगळीच मुलॆ अगदी चवळटबा असतात हे आद्य सत्य आहे!) ते लिहीलॆ असे वाटले मला! झेन गार्डन रेखीव आहे. डॉ. राम भोसले यांच्यावरचे, "दिव्यस्पर्शी". ह्या पुस्तकाचा एक उतारा मी एका दिवाळी अंकात वाचला होता, मग सगळे पुस्तक वाचले. अद्भुत आहे. एका व्यक्तीच...