Posts

Showing posts from August, 2005

तरुणाई एक निरीक्षण

पुण्याच्या फ़र्ग्युसन रोडवर तरुणाईचा सागर नेहमी उचंबळत असतो. रोस डे, फ़्रेंड डे वगैरेला तर ह्या सागराला उधाण येते. परवा परवा पर्यंत या तरुणाईचा बालेकिल्ला होता, वैशाली. SPDP, cold coffeeआणि गप्पा छाटण्याचे "एकमेव" ठिकाण, इतरत्र कोठेहि शाखा नसलेले. पण सध्या मात्र या तरुण गटात फ़ूट पडली आहे. "अभी तो मैं जवान हूं" असे म्हणणारे Not so young अश्क्या आणि मध्या अजून वैशलीत भेटतील, पण नची आणि शची मात्र Cafe coffee dayत पडीक असतात. नुसते टाईम पास करायला अलेले टपोरी CCDच्या बाहेर घुटमळत आहेत आणि आहेरे गट - ज्याला य़प्पी म्हणतात, (म्हणजे बापकमाई ऐवजी आपकमईवर माज करणारा), बरिस्तात ब्लॅक कोफ़ी घेत असतो... जाता जाता: जाणकार असे म्हणतात की बरिस्ताची hot coffeeआणि desertsतर CCDची cold coffeeचांगली असते. तुमचे मत जरूर नोंदवा

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

एवढ्यात वाचलेली काही पुस्तके: Before I say goodbye - Mary Higgins Clark A whodunit with a dash of supernatural added to it. Over all an avarage book. Competently written. But I was not too impressed by it. One thing I always notice about the books written by women is that they write more details about the house hold items and men write more about the surroundings. Women tend to add sentimental touches to the book, even to a whodunit. रजनीश द नौटी भगवान - कुलकर्णी. लेखक ओशो सन्यासी असुन, त्याने ह्या पुस्तकात ओशोंच्या प्राध्यापकीपासुन ते १९९० साली त्यांच्या अंतापर्यंतच्या कारकीर्दीचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ओशोंची कारकीर्द एखाद्या धुमकेतुसारखी आहे. नेत्रदीपक अणि notorious. ओशोंनी तत्वज्ञानावर, अध्यात्मावर आणि वेगवेगळ्या धर्मांच्या शिकवणीवर मोठे मार्मीक विवेचन केले आहे. त्यांची वाङ्गमयसंपदा भली मोठी आहे. परंतु या सर्वाचा त्यांच्या आचरणाशी अजिबात मेळ जुळत नाही. असे वाटते की जणु हे लिहिणारे रजनीश आणि सतत विवादाच्या, controvesiesच्या जाळ्यात अडकलेले भगवान या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. कदाच...

रामूस्त्रिया

म्हणती "हो जा रंगीला रे" रामूस्त्रिया ... नृत्यामिषे विचित्र अंगविक्षेप रामूस्त्रिया ... लाडे लाडे "आम्मी नाई जा गडे" रामूस्त्रिया ... कंपनीचा एकच छाप रामूस्त्रिया ... अभिनेत्री की कठपुतळ्या रामूस्त्रिया ...