फास्टर फेणेचे बाबा
म्हणजे आपले भा. रा. भागवत हो! काय सॉलीड लिहिलय ना भागवत काकांनी? फुरसुंगीचा चँपियन सायकल स्वार बन्या आणि त्याच्या धडपडी. मोठी धमाल यायची वाचायला. ते फक्त फा फे चे बाबा नव्हते पण ह्या कार्ट्याची प्रसिद्धी जास्त असल्याने ते त्याचे बाबा म्हणवले जाणार. दर बालवाडी दिवाळी अंकात, त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कथा असायची. इतर बाबतीत 'किशोर' पुढे लिंबुटिंबु वाटणारा बालवाडी या एका गोष्टीने बाजी मारुन जायचा. भागवतांचे बिपीन बुकलवार ( book lover?) आणि त्याची दोस्त मंडळी आहाहा - ती दिवाळीची सुट्टी ... एका हाताने फराळचे बकाणे मारत वाचलेल्य त्या गोष्टी ... कोणी १० निकारागुआ चे स्टॅम्प दिले तरी नसते एक्स्चेंज केले मी ते क्षण. भा रां नी दिलेला आणि एक मोठा आनंदाचा ठेवा म्हणजे त्यांनी अनुवादित केलेल्या ज्युलस् वर्न च्या विज्ञान कथा. चंद्रावर स्वारी आणि इतर तर आहेतच पण सगळ्यात बेस्ट, मुक्काम शेंडेनक्षत्र आणि सुर्यावर स्वारी. 'Off on a comet' चा अनुवाद दॊन भागात. साधारणतः भाषांतरात येणारा बोजडपणा, या पुस्तकात अजिबात नाही. जणु मराठीत जन्माला आलेले कथानक. वातावरणसकट शेंडेनक्षत्रावर बसुन स...