Posts

त्रिमधू : झांटिपी_आणि_बोका

लेखिका: बोक्यापेक्षाही जास्त भाव खाऊन शेवटी झांटिपीने पुढचा भाग लिहिला एकदाचा! तुम्हाला कसा वाटला हे नक्की लिहा, म्हणजे झांटिपीला हुरूप येऊन ती जरा लवकर लवकर लिहिल. ----- बोका: अग झी, परवा तुझी ती लेखकीण बाई दिसली होती. तू कुठे आहेस, तिचा फोन का नाही उचलत असं विचारत होती. झांटिपी(मोबाईलवरच डोळे खिळवून): मग तू काय म्हणालास तिला? बोका: मी? मी समोर असताना, माझी चौकशी न करता तुझ्याबद्दल विचारणाऱ्या बाईला मी का उत्तर देईन? तसंही तिला कुठे माहिती आहे की मी बोलू शकतो? ती आपली तमाम मनुष्यजात प्राण्यांशी लहान मुलांसारखी बोलते तशी बोलत होतीउच्च स्वरात, "तुजी ममा कुटे आहे माउ? दिश्लिच नाइ!" ह्याला उत्तर देणे माझ्या सन्मानाविरुद्ध (below my dignity) आहे. झांटिपी: अरे आपले इतके भाग लिहून दिले तरी तिला असं वाटतं की मीच तुझे संवाद लिहिते. बोका: ती जाऊ दे, तशी नगण्य आहे ती आपल्या मालिकेत, तिला नको एवढं फुटेज द्यायला. पण बोका also wants to know, कुठे आहेस तू? काय करतेस? झांटिपी: अरे सगळ्या संवाद माध्यमांवर इतका मतामतांचा गल्बला चालू असतो ना, की त्यात आपण काही लिहावं असं वाटत नाही गड्या! बोका...

काळी : झांटिपी_आणि_बोका

झांटिपी खिडकीतून शोधक नजरेने बघत आहे, बोका दिवसातली साडेआठवी गोलकुक्षी संपवून अंग ताणत खिडकीपाशी येतो. बोका: काय ग, काय एवढी वाकून बघतेस खिडकीतून? झांटिपी: अरे, ती लेखकीण कुठे दिसतेय क बघत होते. बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही आपल्यावर, आणि दिसली पण नाही मला कुठे! बोका: अग, लाईक्स - शेरे मिळेनासे झाल्याने थांबवलं असेल तिनं, माझं तरल आणि हुशार बोलणं सामान्यांना कुठे समजणार? बरं ते जाऊ दे, तू खिडकीतून बघत होतीस, तेंव्हा तुला काळी जाताना दिसली का? झांटिपी: सर्जा! असं कोणाच्या कमीपणावर नये बोट ठेवू! असं काळी म्हणू नये कोणाला! बोका: ए माणूस बाये! एकसक्यूज मीच बरका! कोणाचा कमीपणा? सगळ्या मांजरात देखणी आहे माझी काळी! माझी दिल की धडकन! इतर एकाही भाटीला तिच्या मागच्या पंजाच्या नखाची सर नाहीये! झांटिपी; ओह, ती डेस्डेमोना कॅट होय समोरच्यांची? मला वाटलं शर्वरी नाहीतर निकिताला काळी म्हणतोयस तू! बोका: झांटिपे, तुम्हा माणसांसारखी दांभिक जात नाही बघ जगात! मनात सगळ्यांच्या असतं पण "काय बोलायचं नाही" ह्याचे शिष्टाचार बनवतात लेकाचे. बुटकं म्हणायचं नाही, काळं म्हणायचं नाही! अरे! बुटके ही आकर्ष...

पावसाच्या कविता : झांटिपी_आणि_बोका

Image
झांटिपी: कसा मस्त पाऊस लागलाय बघ! सरीवर सरी बोका: हो, ओली झाडं आणि हवेला पावसाळी वास. झांटिपी: तुला माहितेय बोक्या, प्रत्येक गावातला पाऊस वेगवेगळा असतो. मुंबईचा पाऊस हत्तीधारांनी कोसळतो, एकदा लागला की दिवस दिवस खंड नाही. पुण्यातला पाऊस आबदार सरींनी पडतो, मध्येच पटकन सायकलवर जाऊन एक वडापाव - कटींग जमवायची उसंत ही देतो. तर महाबळेश्वरी, आपण ढगातच असतो. आपल्या आसपास चे ढग पाण्याने अधिक अधिक संपृक्त होतात, आणि भरली घागर ओसांडावी तसा पाऊस सुरू होतो, थांबतो, थोडे रिते ढग परत भरू लागतात. बोका: जसा लंडनचा पाऊस जाणवत नाही पण कोट मात्र ओला होतो, म्हणून Shakespere लिहितो The quality of mercy is not strained; It droppeth as the gentle rain from heaven करूणा ही देवाघरच्या अल्वार पावसासारखी आहे, घेणाऱ्याला नकळत ती भिजवते. आता विल्यमपंत भारतातल्या पावसात भिजत असते तर त्यांना ही 'नकळत' प्रतिमा सुचलीच नसती. न्याय़ हा पावसासारखा असतो असं म्हणाले असते कदाचित ते. झांटिपी: संगम साहित्यात ही अश्याच छान पावसाच्या कविता आहेत. बोका: संगम म्हणजे तामिळ साहित्याचं सांगते आहेस तू? झांटिपी:इ स पूर्व दुसरे ...

नामकरण : झांटिपी_आणि_बोका

झांटिपी: तुला महितेय बोक्या, आपल्याकडे वर्षातल्या प्रत्येक पोर्णिमा, आमावस्या आणि एकादशीला वेगळं नाव आहे? जसं मधु पोर्णिमा किंवा देवशयनी एकादशी. बोका: तशीही माणसं नावं ठेवण्यात एकदम पटाईतच असतात! झांटिपी: तुझा बोकार्झम बाजुला ठेवला तरी खरंय ते. मनुष्यजात जेंव्हा एक विषय जाणू इच्छिते तेंव्हा ती त्याला नावं देते, त्याला मोजते, त्याचं वर्गीकरण करते आणि तो विषय आपल्याला समजला अशी समजूत करून घेते. जसं एवरेस्ट. त्याची उंची किती, त्याचं नाव काय ह्यावरून वाद, जणू असं केल्यानं त्यांना एवरेस्ट समजणार आहे. अर्थात, कारागिरीमध्ये नाव देणं महत्वाचं आहे, कारण ती त्या त्या craft ची परिभाषा आहे. साड्यांच्या बुट्यांचे पंचवीस पेक्षा जास्त प्रकार आहेत. पान बुट्टा, कोयरी, डॉलर बुट्टा आणि कांजिवरम मधला मल्ली मोगु म्हणजे मोगऱ्याच्या कळीचा बुट्टा. बोका: नेबुकादनाझेर! झांटिपी: कसला वाईट शिंकलास तू! बोका: ए बावळट. नेबुकादनाझेर हा बाबिलोनिया चा दुसरा सम्राट होता. झांटिपी: त्याचा इथे काय संबंध? बोका: आहे ना! अग शॅंपेनच्या बाटल्यांना, त्यात किती लिटर शॅंपेन आहे त्याप्रमाणे वेगवेगळी नावं आहेत. आणि मोठ्या बुधल्या...

प्रभातफेरी : झांटिपी_आणि_बोका

( सकाळच्या प्रहरी झांटिपी बाहेरचं दार उघडून गुणगुणत आत येते ) बोका: वाह! छान झालेली दिसतेय प्रभात फेरी. झांटिपी: अरे मस्त! लवकर उठायचे कष्ट सोडलेना, तर पहाटे टेकडीवर फिरायला जायला मजाच येते. ताजी हवा, झाडं पक्षी तर असतातच, शिवाय फिरायला येणारी माणसं ही भारी असतात. बोका: ती कशी? झांटिपी: अरे कितीतरी गोष्टी सांगू शकते मी तुला. नेहमी फिरायला येणारी मंडळी साधारण मध्यमवयीन असतात. आणि ते सगळेजण आपल्या कमाल वेगाने चालत असतात, अथवा त्यांना असं वाटत असतं की ते कमाल वेगाने चाललेत. काहीजण त्या वेगात वाढ करण्यासाठी हाताच्या, डोक्याच्या मजेदार हालचाली करत असतात. तर त्याच्या बरोबर उलट, नुकतीच कुमारभारती वयात पोचलेली म्हणजे अकरावी-बारावीतल्या मुलामुलींची टोळी टेकडीवर टाईमपास करायला आलेली असते, त्यांना अजिबात काका दिसायचं नसतं, त्यामुळे ते अतिशय संथ गतीने चालतात. अजुन एक भारी दृष्य असतं प्री वेडींग शूटसाठी आलेली जोडपी, आणि फोटोग्राफर्स! येता जाता कानावर पडणारे संभाषणांचे तुकडे कधी अगदी टिपीकल तर कधी खूप ज्ञानात भर घालणारे असतात. आता आजचंच बघ ना बोका: काय झालं आज? झांटिपी: आज शुक्रवार असल्याने लेवल ...

शायरी : झांटिपी_आणि_बोका

(झांटिपी पुस्तक वाचत होती. तिनं पुस्तक मिटलं आणि एक लिरिकल निःश्वास सोडला.) बोका: काय संपलं का पुस्तक? झांटिपी: अरे, काव्यसंग्रह आहे हा. तो जपून आस्वाद घेत अनुभवायचा असतो. एखाद्या जुन्या प्रियकराच्या प्रेमपत्रासारखा. बोका: ते कविता प्रकरण काय जमत नाही बा आपल्याला. कविता वाचताना असं वाटतं की कवीला काहीतरी समजलय, असं त्याला आपल्याला दाखवायचंय पण काय ते समजू द्यायचं नाहीये. झांटिपी: हाय कंबख्त तुने तो पी ही नही! शायरी समझने की नही महसूस करने की चीज है, या तो आप महसूस करतें हैं या नही| मी काही तुला convince or convert करणार नाही. प्रतिभावंत कवी आपली कल्पनासृष्टी काळाच्या पलिकडे जाऊन तुमच्या पर्यंत पोचवू शकतो. खरं अक्षर वाङमय आहे ते. आपले आवडते कवी असे मनात असावेत, आपल्या मूडला साजेश्या ओळी आपल्या मनात तरंगतात, आणि हाताशीच असलेला संग्रह उघडून आपण ती कविता परत अनुभवावी. बोका: आत्ता तुझ्या मनात कुठली ओळ आली? झांटिपी: बाजीचा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे होता है शब-ए-रोज तमाशा मेरे आगे. बोका: वाह! वाह! वाह वाह! झांटिपी: कळलं का तुला, गालीब काय म्हणतोय ते? बोका: नाही ना, म्हणून तर वाह वाह केलं! ...

निरागस : झांटिपी_आणि_बोका

बोका खिडकीतून आत येणाऱ्या उन्हाच्या त्रिकोणात पहुडलेला आहे. मधूनच बोकेरी आवाज काढत आहे. झांटिपी: काय रे असा गुदगुल्या केल्यासारखा हसतो आहेस? like the Cheshire Cat! बोका (एक पलटी मारून अजुनही हसतच) अग इथल्या Common Drongo ला भेटायला त्याचा जंगलातला चुलतभाऊ Greater Racket-tailed Drongo आलाय. त्याच्या सुरस गोष्टी ऐकतोय. मजेशीर आहेत मोठ्या. झांटिपी: Common Drongo म्हणजे कोतवाल पक्षी ना रे. त्याची भाषा कळते तुला? (इथे बोक्याने तिला Obviously! असे म्हणणारा लूक दिला) काय म्हणतोय तो? बोका: तो जंगल सफारीला येणाऱ्या माणसांच्या गमती सांगतोय. कसे सगळे लष्करी कपडे (camouflaged) घालून, तोफेएवढ्या भिंगाचे कॅमेरे, दुर्बिणी घेऊन येतात. त्यांना फक्त वाघ बघण्याची घाई असते. आजुबाजुला एवढं सुर्यप्रकाशाने लखलखलेलं, इतक्या तऱ्हेच्या प्राण्या-पक्ष्यांनी भरलेलं जंगल असतं, त्याकडे त्यांचं लक्षच नसतं! पाऊण जंगल तर त्यांच्या क्षीण नजरेला दिसतच नाही म्हणे. कहर म्हणजे माणसांच्या मते ते अजिबात आवाज करत नसतात, जेणेकरून वन्यजीवांना त्यांची चाहूल लागू नये! Drongo bhaau is like "Please!! एकतर ते त्या रणगाड्यांम...

मटार उसळ का दुधीची भाजी : झांटिपी_आणि_बोका

(नेहमीची वर्दळ नसल्याने शांतता पसरेलेली होती. झांटिपी आणि बोका खिडकीतून बाहेर बघत बसले होते. एक रुग्णवाहिका, भेसूर सायरन वाजवत रस्त्यावरून गेली. दोघांनी त्या वाहिकेचं जाणं दिसलं तोवर follow केलं. बोका: स्टॉईसिजम (Stoicism) नावाची ग्रीक तत्वज्ञानाची एक शाखा आहे. Stoic तत्वज्ञान असं प्रतिपादन करतं की चांगले दिवस असो की वाईट दिवस असो, माणसाने धीरोदात्तपणे वागावं. भावनांच्या आहारी न जाता नीतिपूर्ण चांगले आचरण ठेवावे. माणसाच्या तत्वज्ञानाची ओळख तो काय बोलतो, ह्याने होत नसून तो कसा वागतो, विशेषत: कठीण प्रसंगात कसा वागतो याने होते. येणारी परिस्थिती माणसाच्या हातात नाही, पण त्या परिस्थितीचा सामना सदाचार न सोडता, gracefully करणं त्याच्या हातात आहे. त्याने आपल्या आचरणावर लक्ष द्यावे. स्टॉईक हे नुसतं सांगून थांबत नाहीत, तर ते आचरणात आणण्याची साधना करतात, म्हणजे चांगले दिवस असतानाही austerities म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत राहायचा सराव करतात. झांटिपी: म्हणजे मटार उसळ असो वा दुधीची भाजी, माणसाने सारख्याच समाधानाने जेवावे. एवढेच नव्हे तर याचा सराव म्हणून आठवड्यात एकदा दुधीची भाजी करावी! हे त...