Posts

Showing posts from June, 2018

संगम साहित्य

Image
थोरांची चरित्रे, दांडी मार्च, चौरीचुरा आणि चलेजाव 3 वेळा, महायुद्धांची कारणे व परिणाम शिकता शिकता प्राचीन भारताचा इतिहास शिकायचा राहून गेला. हराप्पा मोहेंजोदारो नंतर एकदम कृष्णदेवराय व्हाया थोडेसे चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य आणि किंचीत चक्रवर्तिन अशोक - देवानां पिय पियदस्सी! बाकी अंधार परशुराम - अगस्ति नंतर nothing "happening"! गुगल बाबांच्या कृपेने आता जेंव्हा  गतकाळाबद्दल चौकश्या करते तेंव्हा काय काय "happening" हाती लागते. - with a disclaimer - that this is the info that I gathered on net, and have not verified - हे हाती लागलेले माहितीचे कण परत विरुन जाऊ नयेत म्हणून ही टिपणे ... पावसाच्या कवितांचा स्वैर मागोवा घेताना,  तामीळ साहित्याचा एक भाग आहे संगम साहित्य. त्यामध्ये डोकावले. इ स पूर्व दुसरे शतक ते इ स दुसरे शतक, हा संगम साहित्याचा काळ. चोल, चेर आणि पांड्य राज काल. तामीळ कवींचे तीन संघ (संगम) या काळात बनले. त्यांनी उत्तम साहित्य संकलित केले. ते आहे संगम साहित्य. पहिला संगम अगस्ति ऋषींच्या अध्यक्षतेत. ज्याचे आता काहीच उपलब्ध नाही. दुसरा संगम तोलकाप्पीयरांचा