लालीची गोष्ट
गोरेगावला पाच नंबरच्या ब्लॉकमध्ये मल्याळी कुटुंब राहायचं . दोन वर्षाची लाली आणि तिचे आई बाबा . दोघे नोकरी करायचे . आई घराबाहेर असायची तेवढ्या वेळ लालीला सांभाळायला एक बाई घरी यायची व्यवस्था केली होती त्यांनी . एका रविवारी लालीच्या आईने तिला सफरचंद भरवायला घेतले . लालीला समोर बसवुन , फोडी केल्या , सालं काढली , आणि फोड लालीसमोर धरली , तर लालीने नेहमीचं असल्याप्रमाणे , साल उचललं आणि खायला सुहरवात केली . आईने परत फोड पु ढे केली . लाली म्हणाली , ' ते नाही , हे खायचं असतं ' . आईला ब्रम्हांड आठवलं , तपासाअंती कळलं की सांभाळणारी बाई तिला सालं खायला द्यायची आणि स्वत : फोडी खायची . एखाद्या च - यासारखी ती आठवण राहिली आहे माझ्या मनात … सध्या आपल्या समाजाचं लाली सारखं झालंय . आपण ही नुसत्या सालीच खातोय . खेळ खेळत नाही बघतो . बातम्या नाही मतं ऐकतो . देशाभिमानाचं भरतं आलं तर पोस्ट्स बनवतो नाहीतर फॉरवर्ड / लाईक करुन आपण किती देशाभिमानी अशी स्वत : ची पाठ थोपटतो ....