Posts

बागेश्री २

तर अश्या ह्या बागविशारद स्त्रिया नर्सरीतुन आणलेलं झाड छान वाढतंय ह्याला कौतुक समजतच नाहीत. तर कटींग्स आणि बियांपासुन स्वत: रोपं तयार करून झाडं वाढवली तरच समाधान मानतात. माझ्या आईचीच गोष्ट घ्याना. तिच्या बागेत लावायला मी मैत्रिणीकडून कमळाचं कटींग आणून दिलं (कमळ म्हणजे Nelumbo nucifera, सगळीकडे कमळ म्हणून मिरवणाऱ्या common water lilies (Family Nymphaeaceae) नाही बरं!) ते तर अर्थात तरारलंच पण तेवढ्यानं गप्प कश्या बसतील ना या? तिनं मला सांगितलं कमळाच्या बिया हव्यात, बिया कुठं मिळतात तर पुजा साहित्याच्या दुकानात, जिथं कुंकु गंध आणि तुळशीच्या माळा मिळतात तिथं. मी म्हणाले अग तिथं का असतील? तर म्हणे त्याच्या माळा करतात देवला वहायला, पण मला वेज पाडलेल्या नको. मी नर्मदाकाठच्या ओंकारेश्वराबाहेर अनेक कमळ आणि पुजा साहित्य विकणाऱ्या दुकानात विचारलं. तर त्या सर्वांनी “मराठी काकवा चक्रम असतातच पण हा त्यातला वीड प्यायलेला नमुना दिसतो अश्या नजरेने मला झटकले. मग असं काय नसतं असं मी आईला सांगितलं. त्यानंतर आठवडाभरानं तिच्याकडे गेले तर कट्ट्यावर एका बरणीत पाण्यात काळ्या बिब्ब्याएवढ्या बिया तरंगत होत्या. ह...

बागेश्री १

आमच्याकडे बाग लागवडीची आवड जणू आईकडून मुलीकडे वारसाहक्काने येते.   माझी आज्जी, आई, मावशी आणि धाकटी बहीण पट्टीच्या माळीणी आहेत. त्यांच्या बागांच्या, त्यातल्या झाडांच्या आख्यायिका आहेत. आमच्या आज्जीच्या बागेत एवढी मोगऱ्याची फुलं यायची की आई मावशी रोज त्यांचे गजरेच्या गजरे करून   शेजारी पाजारी वाटायच्या!   ( हो गजरे बिजरे करायचा उरक पण ह्यांच्याकडे पिढीजात आहे!) माझ्या मावशीच्या बागेतल्या सोनचाफ्याला रोज शंभर एक फुले येतात! आसमंत दरवळतो. माझी मावसबहिण पत्ता सांगताना असा सांगते – “विवेकानंदाच्या पुतळ्यानंतर उजवीकडे वळा की चाफ्याचा घमघमाट येऊ लागेल,   त्याच्यापुढे 200 मीटरवर आमचं घर! तुम्हाला disaster recovery माहित आहे ना? महत्वाच्या data ची एक प्रत सुरक्षित जागी ठेवलेली असते? तर सहारा वाळवंटातल्या महत्वाच्या निवडूंगाचा DA मावशीकडे आहे. इसी श्रुंखला की अगली कडी असलेल्या माझ्या बहिणीला कळलं की पिंपरी चिंचवड बागकाम विभाग एक स्पर्धा आयोजित करतोय. हे कळताच, ती तडक आयुक्तांना भेटायला गेली.  ते आधी चपापले की आपण पाटील बाईंचा सल्ला न घेता ही स्पर्धा आयोजित करायची च...

Autumn Evening

Image

संगम साहित्य

Image
थोरांची चरित्रे, दांडी मार्च, चौरीचुरा आणि चलेजाव 3 वेळा, महायुद्धांची कारणे व परिणाम शिकता शिकता प्राचीन भारताचा इतिहास शिकायचा राहून गेला. हराप्पा मोहेंजोदारो नंतर एकदम कृष्णदेवराय व्हाया थोडेसे चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य आणि किंचीत चक्रवर्तिन अशोक - देवानां पिय पियदस्सी! बाकी अंधार परशुराम - अगस्ति नंतर nothing "happening"! गुगल बाबांच्या कृपेने आता जेंव्हा  गतकाळाबद्दल चौकश्या करते तेंव्हा काय काय "happening" हाती लागते. - with a disclaimer - that this is the info that I gathered on net, and have not verified - हे हाती लागलेले माहितीचे कण परत विरुन जाऊ नयेत म्हणून ही टिपणे ... पावसाच्या कवितांचा स्वैर मागोवा घेताना,  तामीळ साहित्याचा एक भाग आहे संगम साहित्य. त्यामध्ये डोकावले. इ स पूर्व दुसरे शतक ते इ स दुसरे शतक, हा संगम साहित्याचा काळ. चोल, चेर आणि पांड्य राज काल. तामीळ कवींचे तीन संघ (संगम) या काळात बनले. त्यांनी उत्तम साहित्य संकलित केले. ते आहे संगम साहित्य. पहिला संगम अगस्ति ऋषींच्या अध्यक्षतेत. ज्याचे आता काहीच उपलब्ध नाही. दुसरा संगम तोलकाप्पीयरांचा ...

राजविवाह आणि कविता

प्रिन्स हॅरी आणि मेगन चा लग्नसोहळा  जगाच्या साक्षीनं थाटात पार पडला. ह्या सोहळ्यातल्या भावलेल्या काही गोष्टी ... 1. हॅरीच्या पणजीने (Queen mother)  सुरु केलेली परंपरा - वधुच्या हातातला पुष्पगुच्छ सोहोळ्यानंतर, अनाम वीराच्या समाधीवर ठेवला जातो. 2. खिदळणारा निरागस दातपडका पेजबॉय 3. राजकवयित्री कॅरॉल ऍन डफीची ह्या प्रसंगानिमित्त लिहिलेली कविता, मी केलेला हा त्याचा स्वैर अनुवाद ... खाजगी असावी, खडकाळ लांब वाटचाल अंतिम ताटातूटीची; वाटेतल्या माणसांनी हात उंचावलेच, तर ते मोबाईल फोन नसावेत, ना त्यांचे चेहरे, कॅमेरे; म्हणून चढवला तुझ्या काळजाने आपला युनिफॉर्म चल तर, एक आशिर्वचन, एक शुभचरण आणि लांब वाट संपली जिथे मायेची अळूमाळू पुष्पवृष्टी   घंटानी निनादत नजराणा, हो, त्या सगळ्यांनी  पाहिले - आणि घेतले तुझे नाव. डायनाच्या अंतयात्रेत चालणारा लहानगा हॅरी, त्याच्या वाटेत आता एक खुबसुरत मोड आला आहे. The original poem It should be private, the long walk on bereavement’s hard stones; and when people wave, their hands should not be...

तुमचा स्कोर किती आहे?

सध्या इंग्रजी पुस्तकप्रेमी वर्तुळात एक शंभर पुस्तकांची यादी फिरत आहे. वाचायला हवीत अश्या पुस्तकांची यादी.  आपण किती वाचली आहेत हे ताडून बघण्यासाठी.  इंग्रजी पुस्तकांचा स्कोर तयार झाल्यावर, प्रियाच्या डोक्यात मराठी पुस्तक यादीची कल्पना उगवली. प्रिया यादीपटू आहे. पुस्तकांची, गाण्यांची वगैरे यादी करुन त्यांचा फडशा पाडण्यात ती वाकबगार आहे. तो वारसा तिला आमच्या आई-बाबांकडून मिळाला असणार. माहेरी आमच्याकडे, वाण्याची यादी करायला वापरायची आमच्यासाठी कस्टमाईज्ड मास्टर लिस्ट आहे!   तर, प्रियाने चॅलेंज केल्याने, तिने आणि मी मराठी पुस्तकांची यादी केलीय.   त्याआधी यादी करायच्या नियमांची यादी केली, ती येणेप्रमाणे:  १. ही यादी आमची आहे, आम्हाला जी पुस्तके वाचलीच पाहिजे असे वाटते त्या पुस्तकांची यादी आहे.  २. एका लेखकाचे १ फार फार तर २ पुस्तके या यादीत घेतली आहेत. नाहीतर, पु.लं ची सगळी, लंपनची सगळी अशी यादी वाढत गेली असती. ३. संत  वाड़्मय याद्यांच्या पलिकडले आहे, त्यामुळे ते ह्या यादीत नाही ४. पुस्तकांचा यादीतला क्रम यादृच्छिक (random) आहे.   ५...

जन हित मे जारी

💥💢💥💦💢💥💢💥💦 सर्व विवाहित व अविवाहित स्त्रियांनी आणि पुरुषांनी वाचली पाहिजे अशी बातमी, संवेदनाशील असाल तर लगेच फॉरवर्ड कराल. बघूया कोणाकोणाला फॉरवर्ड करायची हिम्मत आहे! 💥💢💥💦💢💥💢💥💦 भारतीय जनतेपासून लपवून ठेवलेले हे एक खळबळजनक आणि अतिशय गुप्त असे सत्य, केवळ भाग्यवानांना उघड होत आहे. तुम्हाला माहित आहे का?  व्हॉट्सऍप वर फॉरवर्ड होणारे मौल्यवान मेसेजेस "जनहितमेजारी" नावाची एक गुप्त संस्था टंकलिखित करते. तिची स्थापना प्रत्यक्ष वेदव्यासांनी केली आहे. मौलिक ज्ञान आम जनतेला पोहोचावे हे या संस्थेचे ध्येय आहे.  या संस्थेची कर्मचारी भरती तीन वर्षातून एकदाच होते, त्याबद्द्ल अतिशय गुप्तता बाळगण्यात येते. ह्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा मेसेज कोटा देण्यात येतो. त्यांनी लिहिलेल्या मेसेजेस ची संख्या, त्यांचा दर्जा  व त्यांचा व्हॉट्सऍप वर होणारा प्रसार ह्यावर कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते.  जसजशी कर्मचाऱ्यांची प्रगती होते तसतशी त्यांची जनहितेच्छुक, जनहितवादी, जनहितकुशल (ह्या पदाच्या 1, 2, 3 अश्या सबग्रेड्स आहेत), जनहितपारंगत अश्या पदांवर बढत...