त्रिमधू : झांटिपी_आणि_बोका
लेखिका: बोक्यापेक्षाही जास्त भाव खाऊन शेवटी झांटिपीने पुढचा भाग लिहिला एकदाचा! तुम्हाला कसा वाटला हे नक्की लिहा, म्हणजे झांटिपीला हुरूप येऊन ती जरा लवकर लवकर लिहिल. ----- बोका: अग झी, परवा तुझी ती लेखकीण बाई दिसली होती. तू कुठे आहेस, तिचा फोन का नाही उचलत असं विचारत होती. झांटिपी(मोबाईलवरच डोळे खिळवून): मग तू काय म्हणालास तिला? बोका: मी? मी समोर असताना, माझी चौकशी न करता तुझ्याबद्दल विचारणाऱ्या बाईला मी का उत्तर देईन? तसंही तिला कुठे माहिती आहे की मी बोलू शकतो? ती आपली तमाम मनुष्यजात प्राण्यांशी लहान मुलांसारखी बोलते तशी बोलत होतीउच्च स्वरात, "तुजी ममा कुटे आहे माउ? दिश्लिच नाइ!" ह्याला उत्तर देणे माझ्या सन्मानाविरुद्ध (below my dignity) आहे. झांटिपी: अरे आपले इतके भाग लिहून दिले तरी तिला असं वाटतं की मीच तुझे संवाद लिहिते. बोका: ती जाऊ दे, तशी नगण्य आहे ती आपल्या मालिकेत, तिला नको एवढं फुटेज द्यायला. पण बोका also wants to know, कुठे आहेस तू? काय करतेस? झांटिपी: अरे सगळ्या संवाद माध्यमांवर इतका मतामतांचा गल्बला चालू असतो ना, की त्यात आपण काही लिहावं असं वाटत नाही गड्या! बोका...