Posts

Showing posts from May, 2018

राजविवाह आणि कविता

प्रिन्स हॅरी आणि मेगन चा लग्नसोहळा  जगाच्या साक्षीनं थाटात पार पडला. ह्या सोहळ्यातल्या भावलेल्या काही गोष्टी ... 1. हॅरीच्या पणजीने (Queen mother)  सुरु केलेली परंपरा - वधुच्या हातातला पुष्पगुच्छ सोहोळ्यानंतर, अनाम वीराच्या समाधीवर ठेवला जातो. 2. खिदळणारा निरागस दातपडका पेजबॉय 3. राजकवयित्री कॅरॉल ऍन डफीची ह्या प्रसंगानिमित्त लिहिलेली कविता, मी केलेला हा त्याचा स्वैर अनुवाद ... खाजगी असावी, खडकाळ लांब वाटचाल अंतिम ताटातूटीची; वाटेतल्या माणसांनी हात उंचावलेच, तर ते मोबाईल फोन नसावेत, ना त्यांचे चेहरे, कॅमेरे; म्हणून चढवला तुझ्या काळजाने आपला युनिफॉर्म चल तर, एक आशिर्वचन, एक शुभचरण आणि लांब वाट संपली जिथे मायेची अळूमाळू पुष्पवृष्टी   घंटानी निनादत नजराणा, हो, त्या सगळ्यांनी  पाहिले - आणि घेतले तुझे नाव. डायनाच्या अंतयात्रेत चालणारा लहानगा हॅरी, त्याच्या वाटेत आता एक खुबसुरत मोड आला आहे. The original poem It should be private, the long walk on bereavement’s hard stones; and when people wave, their hands should not be mobile phones, n