Posts

Showing posts with the label निरीक्षण विनोद

बागेश्री २

तर अश्या ह्या बागविशारद स्त्रिया नर्सरीतुन आणलेलं झाड छान वाढतंय ह्याला कौतुक समजतच नाहीत. तर कटींग्स आणि बियांपासुन स्वत: रोपं तयार करून झाडं वाढवली तरच समाधान मानतात. माझ्या आईचीच गोष्ट घ्याना. तिच्या बागेत लावायला मी मैत्रिणीकडून कमळाचं कटींग आणून दिलं (कमळ म्हणजे Nelumbo nucifera, सगळीकडे कमळ म्हणून मिरवणाऱ्या common water lilies (Family Nymphaeaceae) नाही बरं!) ते तर अर्थात तरारलंच पण तेवढ्यानं गप्प कश्या बसतील ना या? तिनं मला सांगितलं कमळाच्या बिया हव्यात, बिया कुठं मिळतात तर पुजा साहित्याच्या दुकानात, जिथं कुंकु गंध आणि तुळशीच्या माळा मिळतात तिथं. मी म्हणाले अग तिथं का असतील? तर म्हणे त्याच्या माळा करतात देवला वहायला, पण मला वेज पाडलेल्या नको. मी नर्मदाकाठच्या ओंकारेश्वराबाहेर अनेक कमळ आणि पुजा साहित्य विकणाऱ्या दुकानात विचारलं. तर त्या सर्वांनी “मराठी काकवा चक्रम असतातच पण हा त्यातला वीड प्यायलेला नमुना दिसतो अश्या नजरेने मला झटकले. मग असं काय नसतं असं मी आईला सांगितलं. त्यानंतर आठवडाभरानं तिच्याकडे गेले तर कट्ट्यावर एका बरणीत पाण्यात काळ्या बिब्ब्याएवढ्या बिया तरंगत होत्या. ह...

बागेश्री १

आमच्याकडे बाग लागवडीची आवड जणू आईकडून मुलीकडे वारसाहक्काने येते.   माझी आज्जी, आई, मावशी आणि धाकटी बहीण पट्टीच्या माळीणी आहेत. त्यांच्या बागांच्या, त्यातल्या झाडांच्या आख्यायिका आहेत. आमच्या आज्जीच्या बागेत एवढी मोगऱ्याची फुलं यायची की आई मावशी रोज त्यांचे गजरेच्या गजरे करून   शेजारी पाजारी वाटायच्या!   ( हो गजरे बिजरे करायचा उरक पण ह्यांच्याकडे पिढीजात आहे!) माझ्या मावशीच्या बागेतल्या सोनचाफ्याला रोज शंभर एक फुले येतात! आसमंत दरवळतो. माझी मावसबहिण पत्ता सांगताना असा सांगते – “विवेकानंदाच्या पुतळ्यानंतर उजवीकडे वळा की चाफ्याचा घमघमाट येऊ लागेल,   त्याच्यापुढे 200 मीटरवर आमचं घर! तुम्हाला disaster recovery माहित आहे ना? महत्वाच्या data ची एक प्रत सुरक्षित जागी ठेवलेली असते? तर सहारा वाळवंटातल्या महत्वाच्या निवडूंगाचा DA मावशीकडे आहे. इसी श्रुंखला की अगली कडी असलेल्या माझ्या बहिणीला कळलं की पिंपरी चिंचवड बागकाम विभाग एक स्पर्धा आयोजित करतोय. हे कळताच, ती तडक आयुक्तांना भेटायला गेली.  ते आधी चपापले की आपण पाटील बाईंचा सल्ला न घेता ही स्पर्धा आयोजित करायची च...

जन हित मे जारी

💥💢💥💦💢💥💢💥💦 सर्व विवाहित व अविवाहित स्त्रियांनी आणि पुरुषांनी वाचली पाहिजे अशी बातमी, संवेदनाशील असाल तर लगेच फॉरवर्ड कराल. बघूया कोणाकोणाला फॉरवर्ड करायची हिम्मत आहे! 💥💢💥💦💢💥💢💥💦 भारतीय जनतेपासून लपवून ठेवलेले हे एक खळबळजनक आणि अतिशय गुप्त असे सत्य, केवळ भाग्यवानांना उघड होत आहे. तुम्हाला माहित आहे का?  व्हॉट्सऍप वर फॉरवर्ड होणारे मौल्यवान मेसेजेस "जनहितमेजारी" नावाची एक गुप्त संस्था टंकलिखित करते. तिची स्थापना प्रत्यक्ष वेदव्यासांनी केली आहे. मौलिक ज्ञान आम जनतेला पोहोचावे हे या संस्थेचे ध्येय आहे.  या संस्थेची कर्मचारी भरती तीन वर्षातून एकदाच होते, त्याबद्द्ल अतिशय गुप्तता बाळगण्यात येते. ह्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा मेसेज कोटा देण्यात येतो. त्यांनी लिहिलेल्या मेसेजेस ची संख्या, त्यांचा दर्जा  व त्यांचा व्हॉट्सऍप वर होणारा प्रसार ह्यावर कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला मूल्यमापन करण्यात येते.  जसजशी कर्मचाऱ्यांची प्रगती होते तसतशी त्यांची जनहितेच्छुक, जनहितवादी, जनहितकुशल (ह्या पदाच्या 1, 2, 3 अश्या सबग्रेड्स आहेत), जनहितपारंगत अश्या पदांवर बढत...

एकावर एक फुकट!

आज कामावरुन परत येत होते. सिग्नलपाशी थांबले होते. तर समोरच्या रिक्शाच्या पाठीमागे लिहिलेली जाहिरात वाचली - "धबधबे विकत व भाड्याने मिळतील!!" माझ्या डोक्यात संवादांची एक बाजु लिहुन तयार ... "मी तळेकर बोलतोय, नायगराचे किती पडतील हो? नाही म्हणजे तुम्ही पाण्याच्या हिशोबाने तो भाड्याने देणार का रूंदीच्या? एक्सॅक्ट डायमेन्शन्स काय आहेत हो नायगराचे? काय म्हणता कॅनेडियन नायगाराचे वेगळे पैसे? ही म्हणजे शुद्ध लूट चालवलीय तुम्ही!" "अहो धबधबे - एक गिरसप्पा पाठवुन द्या आज सांजच्याला. आं देउ की पैसे ते काय कुठे वाहुन चाललेत होय? काय चार्ज लावताय? काय मे महिन्यात एवढे? त्या गिरसप्याला पाणी तरी असतं का मे महिन्यात? पंचासुद्धा भिजत नाही हो! काय म्हणता? भिजतो? काय चावटपणा आहे हा? तुम्हाला धबधबे विकायचेत की नाहीत? बर जाउ द्या! तुमचं पण राहिलं आमचं पण! बरोबर भिलार फुकट देउन टाका!" "अहो धबधबे, म्हणजे मला असं विचारायचं होतं, अहो किती जोरात बोलताय? काय म्हणता? फार आवाज आहे धबधब्यांचा? अस्सं. तर काय हो, पॅकेज ऑफर म्हणुन काश्मीर धबधब्याबरोबर मंदाकिनी पण देता का तुम्ही?" म...

देहबोलीचे ठोकताळे

कल्पना करा की तुम्ही बाजाराच्या रस्त्याने चालला अहात. समोरुन साठीच्या, सावळ्या वर्णाच्या, सुरकुतल्या कातडीच्या, कमरेत थोड्या वाकलेल्या, हिरवी नऊवारी नेसलेल्या, गळ्यात पोत, कानाच्या ओघळलेल्या भोकात बुगड्या, हातात चार काचेच्या बांगड्या घातलेल्या आजी तुमच्या समोरुन आल्या आणि तुम्हाला म्हणाल्या, "Could you please direct me to the post office nearby?" in Oxford English, एकदम तुम्ही कसे दचकाल की नाही? आपण सगळे सतत, नकळत, आपल्या आजुबाजुच्या व्यक्ती, वस्तु, घटना यांच्याबाबतीत आडाखे बांधत असतो. कच्चे आडाखे पक्के करत असतो. ९९% ते आडाखे अगदी बरोबर निघतात आणि जेंव्हा नाही निघत तेंव्हा त्या प्रसंगांचे किस्से बनतात. प्राणिमात्रांच्याबाबत आडाखे बांधायला सर्वात मदतीची ठरते ती त्यांची देहबोली. अहो प्राणीमात्र म्हणजे द्विपाद, चतुष्पाद सगळे बरका! खरं सांगा तुम्ही, समोरुन येणा-या कुत्र्याला बघुन, हा कुत्रा निरुपद्रवी आहे का आपल्याला रस्ता ओलांडायला हवा, ह्याचा अंदाज एका कटाक्षात त्याची चाल, शेपूट आणि दात बघुन घेउ शकता की नाही? (इथे जर तुम्ही नाही म्हणाला असाल तर तुम्हाला भारतात वास्तव्याचे भ...