Posts

बागेश्री २

तर अश्या ह्या बागविशारद स्त्रिया नर्सरीतुन आणलेलं झाड छान वाढतंय ह्याला कौतुक समजतच नाहीत. तर कटींग्स आणि बियांपासुन स्वत: रोपं तयार करून झाडं वाढवली तरच समाधान मानतात. माझ्या आईचीच गोष्ट घ्याना. तिच्या बागेत लावायला मी मैत्रिणीकडून कमळाचं कटींग आणून दिलं (कमळ म्हणजे Nelumbo nucifera, सगळीकडे कमळ म्हणून मिरवणाऱ्या common water lilies (Family Nymphaeaceae) नाही बरं!) ते तर अर्थात तरारलंच पण तेवढ्यानं गप्प कश्या बसतील ना या? तिनं मला सांगितलं कमळाच्या बिया हव्यात, बिया कुठं मिळतात तर पुजा साहित्याच्या दुकानात, जिथं कुंकु गंध आणि तुळशीच्या माळा मिळतात तिथं. मी म्हणाले अग तिथं का असतील? तर म्हणे त्याच्या माळा करतात देवला वहायला, पण मला वेज पाडलेल्या नको. मी नर्मदाकाठच्या ओंकारेश्वराबाहेर अनेक कमळ आणि पुजा साहित्य विकणाऱ्या दुकानात विचारलं. तर त्या सर्वांनी “मराठी काकवा चक्रम असतातच पण हा त्यातला वीड प्यायलेला नमुना दिसतो अश्या नजरेने मला झटकले. मग असं काय नसतं असं मी आईला सांगितलं. त्यानंतर आठवडाभरानं तिच्याकडे गेले तर कट्ट्यावर एका बरणीत पाण्यात काळ्या बिब्ब्याएवढ्या बिया तरंगत होत्या. ह...

बागेश्री १

आमच्याकडे बाग लागवडीची आवड जणू आईकडून मुलीकडे वारसाहक्काने येते.   माझी आज्जी, आई, मावशी आणि धाकटी बहीण पट्टीच्या माळीणी आहेत. त्यांच्या बागांच्या, त्यातल्या झाडांच्या आख्यायिका आहेत. आमच्या आज्जीच्या बागेत एवढी मोगऱ्याची फुलं यायची की आई मावशी रोज त्यांचे गजरेच्या गजरे करून   शेजारी पाजारी वाटायच्या!   ( हो गजरे बिजरे करायचा उरक पण ह्यांच्याकडे पिढीजात आहे!) माझ्या मावशीच्या बागेतल्या सोनचाफ्याला रोज शंभर एक फुले येतात! आसमंत दरवळतो. माझी मावसबहिण पत्ता सांगताना असा सांगते – “विवेकानंदाच्या पुतळ्यानंतर उजवीकडे वळा की चाफ्याचा घमघमाट येऊ लागेल,   त्याच्यापुढे 200 मीटरवर आमचं घर! तुम्हाला disaster recovery माहित आहे ना? महत्वाच्या data ची एक प्रत सुरक्षित जागी ठेवलेली असते? तर सहारा वाळवंटातल्या महत्वाच्या निवडूंगाचा DA मावशीकडे आहे. इसी श्रुंखला की अगली कडी असलेल्या माझ्या बहिणीला कळलं की पिंपरी चिंचवड बागकाम विभाग एक स्पर्धा आयोजित करतोय. हे कळताच, ती तडक आयुक्तांना भेटायला गेली.  ते आधी चपापले की आपण पाटील बाईंचा सल्ला न घेता ही स्पर्धा आयोजित करायची च...

सत्य : झांटिपी_आणि_बोका

  स्थळ – बैठकीची खोली. झांटिपी हसू आवरायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. बोका ‘मला फरक पडत नाही’ असं अवसान आणत आहे, पण खूप चिडलाय. त्याच्याकडे बघितलं की झांटिपीला अजुन हसू फुटत आहे. बोका: मला सत्य माहितंच होतं अर्थात, मी तुला एक उदाहरण दाखवत होतो. झांटिपी: कोणतं सत्य? आणि कस्लं उदाहरण? बहाणे नको बनवू! अरे ह्या वर्षीचा सगळ्यात विनोदी क्षण होता तो! रोबेर्तो द रोबो ला बघुन तू जो दोन फूट उडालास ना भूत दिसल्यासारखा! (हास्यफवारे) बोका: हे बघ त्या यंत्राला उगीच pet name द्यायचा लाडीकपणा करू नकोस,शोभत नाही तो तुला! केर फर्शी करणारं यंत्र आहे ते, फारतर केरूनाना म्हण. आणि मला माहित होतं तो रोबो आहे, पण सध्या तू वेदांत वाचते आहेस ना, त्यातल्या रज्जु-सर्प न्यायाचं उदाहरण देत होतो. अज्ञ माणूस रज्जु अर्थात दोरीला सर्प समजतो ते. झांटिपी: ह्या! हा ‘मी पडलो नाय, मला असंच खाली जायचं होतं’ असा खास मार्जार न्याय आहे! घाबरलो आपण बावळटासारखे तर कबूल कर ना! म्हणे रज्जु-सर्प! वेदांत वाङमयात, अद्वैत सिद्धांत- ब्रम्ह हेच एक सत्य ,जग मिथ्या- असं प्रतिपादन करतो. अंधारात, दोरी जणु सापच आहे असा भास होतो, तसा आपल्या ...

त्रिमधू : झांटिपी_आणि_बोका

लेखिका: बोक्यापेक्षाही जास्त भाव खाऊन शेवटी झांटिपीने पुढचा भाग लिहिला एकदाचा! तुम्हाला कसा वाटला हे नक्की लिहा, म्हणजे झांटिपीला हुरूप येऊन ती जरा लवकर लवकर लिहिल. ----- बोका: अग झी, परवा तुझी ती लेखकीण बाई दिसली होती. तू कुठे आहेस, तिचा फोन का नाही उचलत असं विचारत होती. झांटिपी(मोबाईलवरच डोळे खिळवून): मग तू काय म्हणालास तिला? बोका: मी? मी समोर असताना, माझी चौकशी न करता तुझ्याबद्दल विचारणाऱ्या बाईला मी का उत्तर देईन? तसंही तिला कुठे माहिती आहे की मी बोलू शकतो? ती आपली तमाम मनुष्यजात प्राण्यांशी लहान मुलांसारखी बोलते तशी बोलत होतीउच्च स्वरात, "तुजी ममा कुटे आहे माउ? दिश्लिच नाइ!" ह्याला उत्तर देणे माझ्या सन्मानाविरुद्ध (below my dignity) आहे. झांटिपी: अरे आपले इतके भाग लिहून दिले तरी तिला असं वाटतं की मीच तुझे संवाद लिहिते. बोका: ती जाऊ दे, तशी नगण्य आहे ती आपल्या मालिकेत, तिला नको एवढं फुटेज द्यायला. पण बोका also wants to know, कुठे आहेस तू? काय करतेस? झांटिपी: अरे सगळ्या संवाद माध्यमांवर इतका मतामतांचा गल्बला चालू असतो ना, की त्यात आपण काही लिहावं असं वाटत नाही गड्या! बोका...

काळी : झांटिपी_आणि_बोका

झांटिपी खिडकीतून शोधक नजरेने बघत आहे, बोका दिवसातली साडेआठवी गोलकुक्षी संपवून अंग ताणत खिडकीपाशी येतो. बोका: काय ग, काय एवढी वाकून बघतेस खिडकीतून? झांटिपी: अरे, ती लेखकीण कुठे दिसतेय क बघत होते. बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही आपल्यावर, आणि दिसली पण नाही मला कुठे! बोका: अग, लाईक्स - शेरे मिळेनासे झाल्याने थांबवलं असेल तिनं, माझं तरल आणि हुशार बोलणं सामान्यांना कुठे समजणार? बरं ते जाऊ दे, तू खिडकीतून बघत होतीस, तेंव्हा तुला काळी जाताना दिसली का? झांटिपी: सर्जा! असं कोणाच्या कमीपणावर नये बोट ठेवू! असं काळी म्हणू नये कोणाला! बोका: ए माणूस बाये! एकसक्यूज मीच बरका! कोणाचा कमीपणा? सगळ्या मांजरात देखणी आहे माझी काळी! माझी दिल की धडकन! इतर एकाही भाटीला तिच्या मागच्या पंजाच्या नखाची सर नाहीये! झांटिपी; ओह, ती डेस्डेमोना कॅट होय समोरच्यांची? मला वाटलं शर्वरी नाहीतर निकिताला काळी म्हणतोयस तू! बोका: झांटिपे, तुम्हा माणसांसारखी दांभिक जात नाही बघ जगात! मनात सगळ्यांच्या असतं पण "काय बोलायचं नाही" ह्याचे शिष्टाचार बनवतात लेकाचे. बुटकं म्हणायचं नाही, काळं म्हणायचं नाही! अरे! बुटके ही आकर्ष...

पावसाच्या कविता : झांटिपी_आणि_बोका

Image
झांटिपी: कसा मस्त पाऊस लागलाय बघ! सरीवर सरी बोका: हो, ओली झाडं आणि हवेला पावसाळी वास. झांटिपी: तुला माहितेय बोक्या, प्रत्येक गावातला पाऊस वेगवेगळा असतो. मुंबईचा पाऊस हत्तीधारांनी कोसळतो, एकदा लागला की दिवस दिवस खंड नाही. पुण्यातला पाऊस आबदार सरींनी पडतो, मध्येच पटकन सायकलवर जाऊन एक वडापाव - कटींग जमवायची उसंत ही देतो. तर महाबळेश्वरी, आपण ढगातच असतो. आपल्या आसपास चे ढग पाण्याने अधिक अधिक संपृक्त होतात, आणि भरली घागर ओसांडावी तसा पाऊस सुरू होतो, थांबतो, थोडे रिते ढग परत भरू लागतात. बोका: जसा लंडनचा पाऊस जाणवत नाही पण कोट मात्र ओला होतो, म्हणून Shakespere लिहितो The quality of mercy is not strained; It droppeth as the gentle rain from heaven करूणा ही देवाघरच्या अल्वार पावसासारखी आहे, घेणाऱ्याला नकळत ती भिजवते. आता विल्यमपंत भारतातल्या पावसात भिजत असते तर त्यांना ही 'नकळत' प्रतिमा सुचलीच नसती. न्याय़ हा पावसासारखा असतो असं म्हणाले असते कदाचित ते. झांटिपी: संगम साहित्यात ही अश्याच छान पावसाच्या कविता आहेत. बोका: संगम म्हणजे तामिळ साहित्याचं सांगते आहेस तू? झांटिपी:इ स पूर्व दुसरे ...

नामकरण : झांटिपी_आणि_बोका

झांटिपी: तुला महितेय बोक्या, आपल्याकडे वर्षातल्या प्रत्येक पोर्णिमा, आमावस्या आणि एकादशीला वेगळं नाव आहे? जसं मधु पोर्णिमा किंवा देवशयनी एकादशी. बोका: तशीही माणसं नावं ठेवण्यात एकदम पटाईतच असतात! झांटिपी: तुझा बोकार्झम बाजुला ठेवला तरी खरंय ते. मनुष्यजात जेंव्हा एक विषय जाणू इच्छिते तेंव्हा ती त्याला नावं देते, त्याला मोजते, त्याचं वर्गीकरण करते आणि तो विषय आपल्याला समजला अशी समजूत करून घेते. जसं एवरेस्ट. त्याची उंची किती, त्याचं नाव काय ह्यावरून वाद, जणू असं केल्यानं त्यांना एवरेस्ट समजणार आहे. अर्थात, कारागिरीमध्ये नाव देणं महत्वाचं आहे, कारण ती त्या त्या craft ची परिभाषा आहे. साड्यांच्या बुट्यांचे पंचवीस पेक्षा जास्त प्रकार आहेत. पान बुट्टा, कोयरी, डॉलर बुट्टा आणि कांजिवरम मधला मल्ली मोगु म्हणजे मोगऱ्याच्या कळीचा बुट्टा. बोका: नेबुकादनाझेर! झांटिपी: कसला वाईट शिंकलास तू! बोका: ए बावळट. नेबुकादनाझेर हा बाबिलोनिया चा दुसरा सम्राट होता. झांटिपी: त्याचा इथे काय संबंध? बोका: आहे ना! अग शॅंपेनच्या बाटल्यांना, त्यात किती लिटर शॅंपेन आहे त्याप्रमाणे वेगवेगळी नावं आहेत. आणि मोठ्या बुधल्या...