Posts

Showing posts from June, 2017

वाळवण

भारतीय मनामध्ये - आपला नंबर पहिला लागणार नाही - ही सगळ्यात मोठी असुरक्षितता असते. सगळ्या ठिकाणी आपले भारतीयत्व ह्या असुरक्षिततेमुळे सिद्ध होत राहते. सिग्नल सुटल्यावर, आगगाडी फलाटात शिरल्यावर, विमान जमिनीला टेकल्यावर ... सगळीकडे. पण ह्या खालोखाल भारतीय मनातली दुसरी असुरक्षितता कुठली आहे माहीत आहे का?  ती आहे आपले धुतलेले कपडे न वाळण्याची!  घरातल्या कोणीही वाळत घातलेले कपडे काढताना ते दमट असल्यची शंका जरी व्यक्त केली तर तो गृहिणीला  आपला अपमान वाटतो. आत्तापर्यंत मी स्वतःला या असुरक्षिततेपासुन मुक्त समजत होते. पण परवा परदेशी, परकं वॉशिंग मशीन, बेभरवशाचा ड्रायर यामुळे, अपार्टमेंट सोडायला चारच तास राहिले आणि कपडे अजून दमट आहेत, हे लक्षात येताच, माझ्या मनातल्या भारतीय गौरीची दुर्गांबा झाली! तिने रणांगणाचा सर्वे केला, खिडक्या, गज, असणारं उन्ह, दहाव्या मजल्यावर वाहणारे वारे, याची दमट छोट्या आणि मोठ्या कपड्यांशी सांगड घातली, आणि त्या रैनबसेर्‍याच्या सर्व पृष्ठभागांचा योग्य वापर सुरू  केला. कपडे वाळले का हा प्रश्न तुम्हाला पडू नयेच. त्या बसेर्‍याचा मालक त्याक्षणी तिथे उगवला असता तर त्याला मा