Posts

Showing posts from April, 2021

पुस्तकं : झांटिपी_आणि_बोका

झांटिपी: अरे हे बघ interesting app. हे अ ‍ ॅप पुस्तकांचा सारांश काढून देतं, तेवढं वाचलं की झालं बोका: काय भयंकर कल्पना आहे! हॅम्लेटचा सारांश, शेवटी सगळे मरतात असा! माणसाचा सारांश शेवटी तो मेला असा काढता येईल. झांटिपी: अरे ते सेल्फ हेल्प, व्यवस्थापकीय पुस्तकांसाठी आहे. बोका: ह्या! त्या पुस्तकांना पुस्तकं म्हणणे हिमेश रेशमीया ला संगीतकार म्हणण्यासारखं आहे! झांटिपी: oh the Irony! Much wit eh Sarja! बोका: अगं, एखादं पुस्तक अभ्यासाचं उपदेशाचं झालं ना की मजाच निघून जाते सगळी. चांगली पुस्तकं रॅपीड रिडींगला लावल्यानं नावडती होतात. मुळात classics मुलांना का वाचायला लावतात? चौथीत असताना ययाती वाचायचं म्हणजे परत irony च! म्हणजे यायातीचं वार्धक्य - पुरू घेतो त्या अर्थानं. झांटिपी: अरे चालतंय रे. मी पार संपूर्ण चातुर्मास ते रशियन कथा काय पण वाचायचे लहानपणी. बोका: तू आहेसच चक्रम, अक्षर दिसलं की वाच असंय तुझं. माणसानं कसं मोजकंच पण दर्जेदार वाचावं झांटिपी: पण काय दर्जेदार हे बाकीचे ठरवणार का? मग माझ्या वाचन स्वातंत्र्याचं काय? झांटिपी: अरे आता तर वाचायची गरज च नाही, पुस्तकं श्राव्य झाली आहेत. ta...

माया : झांटिपी_आणि_बोका

सगळीकडे एक गंभीर शांतता. बोका, सगळ्या दुनियेकडे पाठ फिरवून भिंतीला नाक लावून बसलेला होता. नुसत्या स्तब्ध बसण्यात ही त्याच्या शरीरातून नाराजीच्या लाटाच्या लाटा उसळत होत्या. झांटिपी: काय रे, का चिडलायंस, आज कॅटफूड पुरेसं नव्हतं की ताटली नीट स्वच्छ नव्हती? शांतता... झांटिपी: (कृष्णधवल मराठी चित्रपटातल्या, एक बट कपाळावर बरोबर डोकावेल, असा लहरिया फेटा बांधलेल्या चंद्रकांत च्या रोमॅंटिक(!) आवाजात): एक माणूस रागावलंय वाटतं आमच्यावर! शांतता... झांटिपी: (शफ़ाकत अमानत अलींची क्षमा मागून) मोरा बोका मोसे बोलेना! मैं लाख जतन कर हारी! मोरा बोका मोसे बोलेनाऽऽ बोका:(अंतत: मौन सोडून पण भिंतीकडेच बघत) ए बाई कितीवेळा सांगितलं तू गाऊ नकोस! हो मी रागावलोय तुझ्यावर. तू खाली गेली होतीस तेंव्हा त्या रॉक्याचे लाड करत होतीस. झांटिपी: ओह! म्हणून चिडलायंस होय! अरे गोड आहे तो भुभु बच्चा! बोका: काय पण प्रेम त्या बिनडोक कुत्र्यावर! एकमेकावर आपटायला सुद्धा दोन विचार नसतील त्याच्या डोक्यात! झांटिपी: कसंय ना सर्जा, ती बौद्धिक चमक वगैरे ठीक आहे, पण, कोणीतरी - फक्त तुम्ही तुम्ही आहात म्हणून, तुम्ही दिसलात म्हणून खूश ह...

निसर्गनियम - झांटिपी_आणि_बोका

  निसर्गनियम वसंत संपात समय प्राप्त झाला होता. झांटिपीच्या छज्जावरच्या चिमुकल्या फुलबागेत फुलेच फुले फुलली होती. रंगबिरंगी गुलाब, जास्वंद आणि बरेच काही..(अचानक बरेच काही, बरेच काही झालंय .. मिसळ आणि बरेच काही ते चुर्मुरे आणि बरेच काही पर्यंत असो..). झांटिपी कडक कॉफीचे घुटके घेत हे कौतुकाने बघत होती. छज्जाजवळच एक भलं मोठं शोभेचं खोटं हुबेहुब झाड पण धुळ खात उभं होतं. बाहेर फुलांवर येणारं एखादी चुकार फुलचुसी, एखादा शिपाई बुलबुल ह्या झाडाकडे पण चक्कर टाकत असत. आणि आज तर एका बुलबुल जोडीने त्या झाडात घरटं बांधायला काढलं आहे. बुल आणि बुली मोठ्या लगबगीने कुठून कुठून काड्या, पानं, एखादं प्लस्टीक कागद आणत घरबांधणी करत होते. जणू निसर्ग मोठ्या जोमाने झांटिपीचं अवकाश काबीज करत होता. आणि ह्या हक्काच्या चढाईने, बुलबुलांना तिच्यावर वाटलेल्या विश्वासाने झांटिपी एकदम सुखावली. ती गाणं गाऊ लागली. झांटिपी: 'केतकी गुलाब जुही चंपक बन फूले ... ऋतु बसंत अपनो कंथ गोरी गरवा लगाये... केतकी गुलाब जुही..' बोका: नको ग बये नको गाऊस. नको त्या सुंदर गाण्याचा खून करूस. (बोका एकटक घरट्याकडे बघत, एकीकडे बोलता झ...

टांगासवारी : झांटिपी_आणि_बोका

  #टांगासवारी झांटिपी(चलध्वनीवर(मोबाईल) पानं उलटत): सर्जा, तुला संगीतकार ओ. पी. नय्यर माहित आहेत का? बोका(पहुडल्या जागी एक डोळा किलकिला करत): "मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार" वाले ना? हो. माहित आहेत. पण तुला आत्ता का आठवले? तुला whatsapp वर त्यांच्याबद्दल एखादी सुरस आणि चमत्कारिक गोष्ट पाठवली का कोणी? 'पान खाऊन थुंकताना कशी एखाद्या खांसाहेबांनी त्यांची धुनसमस्या सोडवली होती, किंवा, लहानपणी साक्षात सरस्वतीने त्यांना आपली वीणा प्रसाद म्हणून दिली होती असं काही?' झांटिपी: च्यक, नाही रे! अश्या एक दोन प्रक्षेपणांच्या सत्यतेबद्दल मी जाहीर शंका व्यक्त केली. तेंव्हा त्या प्रक्षेपकांनी "माझ्या मैत्री आणि भावनांपेक्षा तुला सत्य जास्त मोलाचे वाटते?"असा भावनिक आक्षेप घेतला, तरीही अधिक लाउन धरल्याने मला त्या मंडळींमधुन डच्चू मिळाला. आता मी अश्या सुरस कथांना कायमची मुकले. बोका: अरे, अरे! तुला ना लोकांना कसे हाताळावे ह्याचे संकेत अजिबात कळत नाहीत. झांटिपी: हे तू मला म्हणावंस! बोका: हे बघ, स्वत:ची तुलना तू माझ्याशी करू नकोस. मी बोका आहे. I can afford to be what...