संगम साहित्य

थोरांची चरित्रे, दांडी मार्च, चौरीचुरा आणि चलेजाव 3 वेळा, महायुद्धांची कारणे व परिणाम शिकता शिकता प्राचीन भारताचा इतिहास शिकायचा राहून गेला. हराप्पा मोहेंजोदारो नंतर एकदम कृष्णदेवराय व्हाया थोडेसे चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य आणि किंचीत चक्रवर्तिन अशोक - देवानां पिय पियदस्सी! बाकी अंधार परशुराम - अगस्ति नंतर nothing "happening"!
गुगल बाबांच्या कृपेने आता जेंव्हा  गतकाळाबद्दल चौकश्या करते तेंव्हा काय काय "happening" हाती लागते.
- with a disclaimer - that this is the info that I gathered on net, and have not verified -

हे हाती लागलेले माहितीचे कण परत विरुन जाऊ नयेत म्हणून ही टिपणे ...

पावसाच्या कवितांचा स्वैर मागोवा घेताना,  तामीळ साहित्याचा एक भाग आहे संगम साहित्य. त्यामध्ये डोकावले. इ स पूर्व दुसरे शतक ते इ स दुसरे शतक, हा संगम साहित्याचा काळ. चोल, चेर आणि पांड्य राज काल. तामीळ कवींचे तीन संघ (संगम) या काळात बनले. त्यांनी उत्तम साहित्य संकलित केले. ते आहे संगम साहित्य. पहिला संगम अगस्ति ऋषींच्या अध्यक्षतेत. ज्याचे आता काहीच उपलब्ध नाही. दुसरा संगम तोलकाप्पीयरांचा त्याच्यात एक व्याकरण कोष आहे. तिसरा संगम - नक्कीरारांचा. ज्यात २ महाकाव्ये, आठ लघुकवितासंग्रह आणि दहा दीर्घकाव्ये आहेत. आगम कवितांमध्ये नाव नाही घेत, त्यामुळे, जो वाचेल त्याची ती कविता आहे.ह्या कविता पाच भागात विभागलेल्या आहेत. डोंगर कविता(Kurinji), जंगल कविता(Mullai), माळ कविता(Marutham), सागर कविता(Neithal) आणि अधल्यामधल्याकविता(Palai).

प्रत्येक विभागात, त्या त्या भागतल्या लोकांचे, निसर्गाचे वर्णन  आहे. त्या भागांची नावे ही तिथल्या फुलांची आहेत.प्रत्येक भागाला स्वत:चा ताल, वाद्य, काल आहे. ह्या कवितांचे आठ संग्रह आणि दहा दीर्घ कविता मिळून बनते संगम साहित्य.
ज्या कवीची नावं माहित नाहीत, त्यांना त्यांच्या कवितेच्या सिग्नेचर ने ओळखले जाते.
जसे SembulaPeyaneerar (The poet name means “he of water that has rained on red fields.”)
and his poem is

My mother and yours,
what were they to each other?
My father and yours,
how were they kin?
I and you ,
how do we know each other?
and yet
like water that has rained on red fields,
our hearts in their love
have mixed together.

ही कुरुन्थकोई संग्रहातली चाळीसावी कविता आहे.
लंडन च्या अंडरग्राऊंड मेट्रोत,  वेगवेगळ्या नव्या जुन्या कवितांची पोस्टर लावायचा एक उपक्रम होता ऐंशीच्या दशकात.
त्यातलं एक पोस्टर ह्या कवितेचं होतं. भाषांतर मात्र ए.के. रामानुजन यांचं.  (Poems of Love and War)

आणि एक संदर्भ - विक्रम चंद्राच्या पुस्तकाचं नाव आहे - "Red earth and Pouring Rain"

अशीच एक सुंदर कविता - पावसाची आणि प्रेमाची ...
ही Ainkurunooru संग्रहातली 206 कविता Kurinjikoi प्रकारची

 "Long live my friend! Listen!
 Look at him who has come!
Shining sword wet with raindrops,
Striped belt cool with dewdrops;
As a sentinel of the rainy hills
 Anklets of valor covered with moss;


  “ऐक सखे,
बघ तर कोण आलंय  ते,
पावसानं ओली लखलखती तलवार,
तुषारांनी भिजलेला कमरबंद
 आलाय पावसाळी डोंगरांचा शिलेदार,
पायीच्या इनामी कडं शेवाळानं  माखत"


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
इस पूर्व आणी इस नंतर सगळं सेम असतं "  ही माझी नरोटी ...

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक