राजविवाह आणि कविता

प्रिन्स हॅरी आणि मेगन चा लग्नसोहळा  जगाच्या साक्षीनं थाटात पार पडला.
ह्या सोहळ्यातल्या भावलेल्या काही गोष्टी ...
1. हॅरीच्या पणजीने (Queen mother)  सुरु केलेली परंपरा - वधुच्या हातातला पुष्पगुच्छ सोहोळ्यानंतर, अनाम वीराच्या समाधीवर ठेवला जातो.
2. खिदळणारा निरागस दातपडका पेजबॉय
3. राजकवयित्री कॅरॉल ऍन डफीची ह्या प्रसंगानिमित्त लिहिलेली कविता,
मी केलेला हा त्याचा स्वैर अनुवाद ...

खाजगी असावी, खडकाळ लांब वाटचाल
अंतिम ताटातूटीची;
वाटेतल्या माणसांनी हात उंचावलेच,
तर ते मोबाईल फोन नसावेत,
ना त्यांचे चेहरे, कॅमेरे;
म्हणून चढवला
तुझ्या काळजाने आपला युनिफॉर्म
चल तर,
एक आशिर्वचन, एक शुभचरण
आणि लांब वाट संपली
जिथे मायेची अळूमाळू पुष्पवृष्टी  
घंटानी निनादत नजराणा,
हो, त्या सगळ्यांनी  पाहिले -
आणि घेतले तुझे नाव.

डायनाच्या अंतयात्रेत चालणारा लहानगा हॅरी, त्याच्या वाटेत आता एक खुबसुरत मोड आला आहे.

The original poem
It should be private, the long walk
on bereavement’s hard stones;
and when people wave, their hands
should not be mobile phones,
nor their faces lenses;
so your heart dressed in its uniform.
On. Then one blessed step
and the long walk ended
where love had always been aimed,
her arrows of sweet flowers gifting
the air among bells- yes, they all looked-

and saying your name.

Comments

Popular posts from this blog

पुस्तकांच्या आठवणी

बागेश्री १

हाक